शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
3
एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
4
सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार
5
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
6
Viral Video : प्रियकराचं लागत होतं लग्न, ऐन मुहूर्तावर झाली प्रेयसीची एंट्री; पुढं काय झालं बघाच!
7
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?
8
सर्वोच्च न्यायलयाने फेटाळला दिल्लीतील व्यावसायिकाचा जामीन अर्ज,ड्रग्ज आणि लष्कर-ए-तोयबाशी आहे कनेक्शन!
9
बारावी नापास डॉक्टर! रुग्णांच्या जीवाशी खेळ; क्लिनिक उघडून मोठे आजार बरे करण्याचा दावा
10
पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली...
11
डिफेन्समध्ये का आहे तेजी? घसरत्या बाजारातही HAL आणि BEL मध्ये खरेदीदारांची रांग; कारण आहे खास
12
'भूत बंगला'मध्ये अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करणार 'हा' अभिनेता, फोटो पोस्ट करत म्हणाला...
13
चिनी क्षेपणास्त्रांनी आधी मैदानात मार खाल्ला, आता शेअर बाजारातही लाज निघाली
14
शत्रुला शांतपणे झोप का लागत नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'त्या' फोटोद्वारे दिला थेट संदेश...
15
Rambabu Singh : अवघ्या ४ महिन्यांपूर्वी लग्न झालेले जवान रामबाबू सिंह शहीद; पत्नीला अजून सांगितलंच नाही...
16
१० तारखेला वाढदिवस साजरा केला अन् दुसऱ्याच दिवशी...; आईसह २ मुलांचा दुर्दैवी अंत
17
धक्कादायक! अचानक तोल गेला अन् खासदार अजय मंडल पडले खाली; पायाला झालं फ्रॅक्चर
18
₹२३९२ चा 'हा' शेअर आपटून आला ₹५१ वर; सोमवारी दोन मोठे राजीनामे, गुंतवणूकदारांना झटका
19
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
20
Astro Tips: गाडीच्या डॅशबोर्डवर कोणत्या देवतेची मूर्ती ठेवणे ठरते अधिक लाभदायी?

बँडएडचा शोध कसा लागला?

By admin | Updated: May 24, 2014 13:26 IST

सेहवागची बँडएडची जाहिरात आता आपल्याला चांगलीच परिचित आहे. पण, बँडएडच्या शोधाचं श्रेय कुणा एका व्यक्तीकडे जात नाही. वैद्यकीय व्यवसायातील अनेक जणांचा बँडएड निर्मितीस हातभार लागलेला आहे.

सेहवागची बँडएडची जाहिरात आता आपल्याला चांगलीच परिचित आहे. पण, बँडएडच्या शोधाचं श्रेय कुणा एका व्यक्तीकडे जात नाही. वैद्यकीय व्यवसायातील अनेक जणांचा बँडएड निर्मितीस हातभार लागलेला आहे. फिलोडेल्फिया मेडिकल र्जनलमध्ये सॅम्युअल डी. ग्रॉसन १८३0मध्ये वैद्यकीय चिकटपट्टय़ांचा मोडलेली हाडं सांधण्यासाठी उपयोग होतो, हे दाखवून दिले. ८४५मध्ये डॉ. होरेस डे आणि विल्यम विल्यम शूट या डॉक्टरद्वयीनं रबराच्या द्रावणाचं रोगण देऊन तयार केलेल्या चिकटपट्टीचे एकाधिकार मिळवले. 

जर्सीसिटी न्यूजर्सीततल्या या डॉक्टरांनी त्यांच्या या चिकटपट्टीचे स्वामित्व हक्क डॉ. थॉमस ऑलकॉक यांना विकले. डॉ. ऑलकॉकने ऑलकॉक पोरस प्लॅस्टर घाऊक प्रमाणात बाजारात आणले. इ. स. १८४८मध्ये डेडहॅम ह्या मॅसॅच्युसेटसमधल्या गावातले डॉ. जॉन पार्कर मे नार्ड यांना एक वेगळीच कल्पना सुचली. त्यांनी सल्फ्युरिक इथरच्या द्रवात गनकॉटन विरघळू दिला. हे चिकट द्रावण त्वचेवर फासायचं आणि त्यावर कापड चिकटवायचं, अशा तर्‍हेची एक चिकटपट्टी त्यांनी तयार केली होती.
इस्ट ऑरेंज, न्यू जर्सी इथल्या रॉबर्ट डब्ल्यू जॉन्सन आणि जॉर्ज जेबीबरी यांनी रबरी मातृकेवर आधारित एक नवी चिकटपट्टी  इ. स. १८७४मध्ये तयार केली होती. बारा वर्षांनंतर जॉन्सननं स्वत:चीच जॉन्स अँड जॉन्सन नावाची एक कंपनी सुरू केली. वैद्यकीय साधनं आणि मलम तयार करणार्‍या या कंपनीमध्ये अर्लडिप्सन हा कंपनीसाठी कापूस खरेदी करायचं काम करायचा. त्याच्या पत्नीला सतत बारीकसारीक दुखापती व्हायच्या. बोटं कापणे, हात भाजणे असं या स्वयंपाकघरातील जमखांचे स्वरूप असे. 
दरवेळी नवरा तिच्या जखमांवर मलम लावायचा. त्यावर कापूस बसवून वर चिकटपट्टी लावायचा. या उद्योगाला खरं तर तो कंटाळला होता. त्यामुळं त्यानं वैतागून एक दिवस चिकटपट्टीचे बारीक बारीक लांबट तुकडे तयार केले. त्यांची चिकट बाजू वरती करून ते टेबलावर ठेवले. त्यावर बँडेजच्या जाळीदार कापडाचे अगदी छोटे तुकडे मधोमध चिकटवले. त्यावर एक पुतिरोधक द्रवाचा थेंब टाकला. हे सगळं जलाभेद्य कागदात गुंडाळलं (बटर पेपर) अशा बर्‍याच पट्टय़ा त्यानं पत्नीला दिल्या आणि काही कंपनीमध्ये नेल्या. 
- निरंजन घाटे 
(लेखक ज्येष्ठ विज्ञान अभ्यासक आहेत.)