शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC Result 2025: दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार! विद्यार्थ्यांना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या
2
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
3
7 मे रोहित अन् 12 मे विराट; टेस्ट क्रिकेटमधून 'ROKO' युगाचा अंत, अशी होती दोघांची कारकीर्द
4
हैदराबादच्या प्रसिद्ध 'कराची बेकरी'ची तोडफोड; पाकिस्तानविरोधी घोषणा देत केली 'ही' मागणी
5
Suicide Blast: पाकिस्तानात दहशतवाद्यांचा पोलिसांच्या गाडीजवळ आत्मघाती बॉम्बस्फोट, २ ठार
6
पाकिस्तानवरील कारवाईदरम्यान बंद केले होते ३२ विमानतळ, आता सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या
7
अभिनेता स्टेजवर अचानक बेशुद्ध होऊन कोसळला! तातडीने रुग्णालयात दाखल, नेमकं काय घडलं?
8
निष्काळजीपणाचा कळस! आई आजारी, लेकाच्या हातात रक्ताची बॉटल; नवऱ्याने ओढला स्ट्रेचर अन्...
9
सचिन तेंडुलकर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' बघतात! समीर चौघुलेंनी सांगितला किस्सा, म्हणाले- "त्यांनी माझं स्कीट.."
10
पायऱ्या चढा किंवा उतरा आणि हार्ट ॲटॅकची भीती विसरा; गंभीर आजारही होतील छूमंतर
11
Numerology: ७, १६ आणि २५ जन्मतारीख असलेल्यांना जन्मतः मिळते चाणाक्ष बुद्धी आणि तीक्ष्ण नजर!
12
Video: 'आय लव्ह यू यार... प्लीज उठ जा...'; हुतात्मा सुरेंद्र कुमार यांच्या पत्नीचा मन हेलावून टाकणारा आक्रोश
13
'या' मॉडेलला आता आयुष्यभर जेलमध्ये राहावं लागणार; ग्लॅमरस ते खुनी 'असा' होता प्रवास
14
पाकला पाठिंबा देणाऱ्या चीनला भारताने शिकवला धडा; ड्रॅगनला ५ वर्षे सहन करावा लागणार तोटा
15
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३२,०४४ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
16
ना कोणी आले, ना गेले! केरळच्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरात 'चमत्कार'; गायब झालेला सोन्याचा रॉड सापडला
17
किंमत २३९ कोटी रुपये, जगात फक्त ३ लोकांकडे आहे ही कार; कोणती आहे ही गाडी? पाहा डिटेल्स
18
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर भारताच्या 'या' 10 डोळ्यांची करडी नजर, ISRO प्रमुखांची माहिती
19
मैत्रिणीच्या मेहंदीला गेला अन्..; प्रसिद्ध अभिनेत्याचं ३४ व्या वर्षी निधन, मनोरंजनविश्वावर शोककळा
20
९०च्या स्पीडने येत होती वंदे भारत, अचानक जोडप्याने घेतली ट्रॅकवर उडी अन्...    

हाँगकाँगने असा रोखला भ्रष्टाचार

By admin | Updated: July 12, 2014 14:41 IST

टेबलाखालून काही दिल्याशिवाय कामच होत नाही, ही आपल्या अंगवळणी पडलेली सवय; पण या समजाला धक्का दिला हाँगकाँगने! तिथेही होताच की भ्रष्टाचार, अगदी आपल्यासारखाच. मग काय अशी जादू केली त्यांनी?

 हृषीकेश कुलकर्णी

 
प्रत्येक गोष्टीला पैसे मोजावे लागतात. सरकारी ऑफिसात चिरीमिरी दिल्याशिवाय काम होतच नाही, आग लागली तर अग्निशमनवाल्यांना, आजारी पडलात तर रुग्णवाहिकांना, रुग्णालयात तर संपर्कात येणार्‍या प्रत्येक कर्मचारी, सेवक, डॉक्टर, अधिकार्‍याला वरचे पैसे दिल्याशिवाय काहीच होणार नाही. सर्व गोष्टींचे अनधिकृत दर ठरलेले आहेत. सरकारी कोट्यातून घर हवे? बांधकामाचे कंत्राट हवे? घराची खरेदी-विक्री नोंदवायची आहे? नोकरी हवी? टॅक्सी चालवायची आहे? नळजोडणी, वीजजोडणी हवी आहे? कस्टममधून माल सोडवायचाय? कोणते हात ओले करायचे आहेत, ते माहीत करून घ्या. गुन्हेगारांवर तर कसलाच वचक नाही. सर्वांनी आपापले भाग वाटून घेतले आहेत आणि पोलीस त्यांना पूर्णपणे हप्ते बांधील आहेत. कित्येक पोलिसांची तर गैरधंद्यात भागीदारी आहे आणि नियमित हप्ते सर्वांनाच मिळतात, अगदी सर्वांनाच. जे घेत नाहीत, ते नोकरीत अडगळीत तरी पडतात किंवा त्यांचा यथावकाश ‘बंदोबस्त’ होतो. हा भ्रष्टाचार संपणे शक्य नाही.’
आज भ्रष्टाचारमुक्ततेत जगात १५व्या क्रमांकावर असणार्‍या हाँगकाँगचे हे चाळीस वर्षांपूर्वीचे हे वर्णन. इंग्लंडकडून चीनकडे मालकी गेल्यावर आताशा ‘हळूहळू सगळं बदलतंय,’ अशी दबकी चर्चा ऐकू यायला लागली आहे. पण, गेल्या तीस-पस्तीस वर्षांत हाँगकाँगच्या नागरिकाने रोजच्या आयुष्यात भ्रष्टाचार जवळजवळ पाहिलेलाच नाही. आजही तिथे कुठल्याच सरकारी कामाला लाच द्यावी लागत नाही. कामे तरीही वेळेवर आणि व्यवस्थित होतात. बहुतांश कामे फोनवर किंवा ऑनलाईन करता येतात. सरकारी रुग्णालयात जागतिक दर्जाची सेवा कोणालाही हसतमुखाने आणि जवळजवळ फुकट मिळते. डॉक्टर लोक ‘कट प्रॅक्टिस’ करत नाहीत, औषधकंपन्या डॉक्टरांना लाच देत नाहीत. कोणी साधा सिग्नलसुद्धा तोडत नाहीत. दंगली होत नाहीत. निदर्शने होतात, पण कोणाची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेऊन. शाळा- महाविद्यालयांमध्ये प्रवेश अवघड असतो, पण तो मिळतो केवळ गुणवत्तेवर. शिक्षणसंस्थेत भली मोठी प्रतीक्षायादी असेल, पण शिपायापासून प्राचार्यांपर्यंत कोणीच विद्यार्थ्यांशी किंवा पालकांशी उद्धटपणे वागत-बोलत नाही. मुख्याध्यापक वेळ देऊन भेटतात, चहासुद्धा विचारतात. जागा उपलब्ध  असेल, तर विनादेणगी प्रवेश मिळतो. सुतार-इलेक्ट्रिशियन-प्लंबर लोकसुद्धा वेळेवर येतात आणि स्वच्छ, सुंदर काम करतात. सार्वजनिक वाहतूकव्यवस्था दृष्ट लागण्याइतकी चांगली आहे. बहुतांश लोकांना गरज म्हणून वाहन कधीच बाळगावे लागत नाही. पंधरा दिवसांनी कर वाढणार आहे, हे माहीत असताना आज वाहनखरेदी करून काही हजार रुपये कर वाचवला म्हणून, स्वत:च्या घराच्या तळघरात बेकायदा भिंत बांधली म्हणून, कोण्या उद्योगपतीच्या आलिशान बोटीवर दीड तास सपत्नीक पाहुणचार घेतला म्हणून, अशा कारणांनी हाँगकाँगमध्ये आजही सरकारी अधिकारी व राजकारणी लोकांची कारकीर्द धोक्यात येते किंवा चक्क संपते.
एका अविश्‍वसनीय अशा जगात नोकरीनिमित्त गेली दहा वर्षे राहायची मला संधी मिळाली आणि त्या वास्तव्यात एका गोष्टीचा मला राहून राहून आनंद होत होता, की भ्रष्टाचार संपवता येतो. बरोबर चाळीस वर्षांपूर्वी, १९७४मध्ये हाँगकाँगचे तत्कालीन गव्हर्नर मुरे मॅक्लिहोज यांनी भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी कल्लीिस्रील्लीिल्ल३ उ्रे२२्रल्ल अँं्रल्ल२३ उ११४स्र३्रल्ल (कउअउ) ही अत्यंत स्वतंत्र लोकपाल यंत्रणा उभी करून तिला प्रचंड अधिकार बहाल केले. तेव्हाची तिथली आणि आज आपल्या देशात आपण जी बजबजपुरी बघतो आहोत, त्यांत फार फरक नव्हता. असलाच तर माहिती अधिकार कायद्यामुळे आपली परिस्थिती किंचित बरी आहे, असे म्हणता येईल.
कउअउचा इतिहास अत्यंत रंजक आणि थरारक असा आहे आणि आपल्याला त्यातून खूप शिकण्यासारखे आहे. मूठभर आदशर्वादी लोकांना घेऊन कामाला लागलेल्या कउअउला सुरुवातीला फक्त अपयश आणि निराशेचे धनी कसे व्हावे लागले, त्यांच्या कर्मचार्‍यांना, त्या कर्मचार्‍यांच्या कुटुंबीयांना कसा दहशत, अपमान, प्रसंगी हत्या यांचा सामना करावा लागला, तरी त्यांनी चिकाटी न सोडता लढा कसा चालू ठेवला, भ्रष्ट अधिकार्‍यांमधल्या परस्पर लाथाळीत अपमानित होऊन कचर्‍यात पडलेल्यांच्या मदतीने चोरांची पावले ओळखून, त्यांच्यातूनच माफीचे साक्षीदार तयार करून  कउअउ  ने अनेक मोठे मासे कसे गळाला लावले आणि तुरुंगात पाठवले, याच्या रोमांचकारक कथांवर कित्येक लेख, पुस्तके, चित्रपट आहेत आणि बहुतांश साहित्य चिनी भाषेत असले, तरी इंग्रजीतही पुष्कळ माहिती उपलब्ध आहे. या विषयावरचा क उ११४स्र३ अ’’ उस्र२ हा चित्रपट मी पुन:पुन्हा पाहिला. या सर्वांतून माझ्या लक्षात एक गोष्ट आली,
भ्रष्टाचारविरोधी कायदे, त्यांची अंमलबजावणी, त्यातल्या बड्या धेंडाना तुरुंगवास, लोकशिक्षण, प्रतिबंधक उपाय वगैरे गोष्टी महत्त्वाच्या आहेतच; पण त्याचबरोबर जर भ्रष्टाचार खरोखर संपवायचा असेल, तर एक आणखी अस्त्र आवश्यक आहे. एक असे अस्त्र, की ज्याविना बाकीचे सर्व  उपाय अक्षरश: वाया जातील. ते म्हणजे मोठय़ा प्रमाणावर, एका विशिष्ट दिवसापर्यंत झालेल्या भ्रष्टाचाराला पूर्णपणे आणि जाहीररीत्या माफ करून टाकायचे. विचार धक्कादायक वाटेल, पण तो योग्य आहे; कारण त्याला इतिहास साक्ष आहे. हाँगकाँग मध्ये हेच, अगदी हेच घडलं.
सुरुवातीचे अपयश पचवूनही, खचून न जाता, त्यातून बोध घेऊन, नवीन मार्गांनी साक्षीपुरावे उभे करून कउअउने अनेक सरकारी आणि पोलीस अधिकार्‍यांना गजाआड केले खरे; पण त्यातून नोकरशाहीमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला. कारण उघड होते. नव्वद टक्के सरकारी अधिकारी, त्यात पोलीसही आलेच, लाच घेणारे. त्यातले सगळेच मूलत: लाचखोर नव्हते; पण उच्चपदस्थांचे अनुकरण हा सरकारी कर्मचार्‍यांचा स्वभाव असतो. त्यातून कधी नोकरी मिळवताना द्याव्या लागलेल्या लाचेची वसुली, कधी परिस्थितीजन्य अगतिकता, मोह, पाण्यात राहून माशांशी वैर धरण्याची असर्मथता, कधी नाइलाज, तर कधी सगळेच घेतात, तर मी का नाही? असा विचार. या सर्वांमुळे हाँगकाँगची लाचसंस्कृती कशी सुदृढ, सर्वव्यापी, स्वावलंबी, स्वपरिपोषक आणि सर्वशक्तिमान झाली होती; अगदी आपल्याकडे आज आहे तशीच. एकदा लाच घेतली, की एकवेळ देणारा त्यातून सुटत असे; पण घेणारा कायमचा एका दुष्टचक्रात अडके. स्वत: आणि आपल्यासारखे इतर यांच्या संरक्षणासाठी त्याला पोलीस, राजकारणी, गुन्हेगार, बिल्डर यांच्या अतूट साखळीत एकमेकां साह्य करू..चा जप करीत सामील व्हावेच लागे. लाच खातोस की लाथ? एवढेच पर्याय त्याला उपलब्ध होते. 
अशा सगळ्या निरुपायाने भ्रष्ट लोकांचे धाबे दणाणले. कउअउ विरुद्ध आधी छुपे आणि कालांतराने उघड हल्ले होऊ लागले. ७ नोव्हेंबर १९७७ रोजी एक मोठा जमाव कउअउच्या कार्यालयावर चाल करून गेला. तिथल्या फर्निचरची नासधूस, कर्मचार्‍यांना अमानुष मारहाण, गैरवर्तन वगैरे सर्व, अगदी आपल्याकडचे वाटावेत असे सर्व प्रकार झाले. या सगळ्यांवर कडी म्हणून तीन दिवस कायदा आणि सुव्यवस्था वार्‍यावर सोडून संपावर जायची धमकी खुद्द पोलिसांनी दिली! सामान्य माणूस भयभीत झाला, भ्रष्टाचारी अत्यंत खूश झाले. बघा, आमच्या राज्यात यापेक्षा बरे होते, अशा प्रकारची वक्तव्ये करू लागले. कउअउ चा प्रणेता हाँगकाँगचा गव्हर्नर मॅक्लिहोज याची मन:स्थिती तेव्हा काय झाली असेल? करायला गेलो एक आणि झाले भलतेच! भ्रष्टाचाराला संपवू पाहिले, तर यादवी उसळली. ज्यांचे कल्याण करू पाहिले, तेच सामान्य लोक सर्वनाशाच्या भीतीने विरोधात जाऊ लागले. आता करायचे तरी काय? इकडे आड, तिकडे विहीर. लढा चालू ठेवावा, तर अराजक माजेल; बंद करावा, तर भ्रष्टाचार जिंकेल. 
आतापर्यंत प्राण पणाला लावून लढणार्‍या, धारातीर्थीही पडलेल्या त्या कउअउच्या बहाद्दरांच्या उरस्फोडीचं काय? त्यांच्या बलिदानाचं काय? भ्रष्टाचाराविरुद्धची ही लढाईसुद्धा विफल जाणार की काय? सुदैवाने मॅक्लिहोज हा विवेकी होता. त्यात त्याला त्या वेळच्या ब्रिटिश संसदेने पूर्ण साथ दिली. अत्यंत सखोल विचार करून, मनाचा हिय्या करून, ९ नोव्हेंबर १९७७ रोजी त्याने घोषणा केली, की १ जानेवारी १९७७ पूर्वी घडलेल्या भ्रष्टाचार प्रकरणांबाबत चौकशी किंवा कारवाई होणार नाही!
 
 
भ्रष्टाचारविरोधी लढाईतील एक अत्यंत धाडसी आणि युगप्रवर्तक असेच या निर्णयाचे मूल्यमापन करावे लागेल. अपेक्षेप्रमाणे या निर्णयाने अभूतपूर्व खळबळ माजली. खुद्द कउअउ च्या लोकांना हा निर्णय साहजिकच झोंबला, प्रसारमाध्यमांतून भ्रष्टांचा पाठीराखा समजून मॅक्लिहोजवर प्रचंड टीका झाली, भ्रष्टाचारी बहुसंख्येने आनंदले. आतापर्यंत खाल्लेले सर्व पैसे पचवून, त्यावर तृप्तीची ढेकर देऊन त्यांना समाजात उजळ माथ्याने वावरायला त्यांना कोणताच अडथळा उरला नाही.
मात्र, यातली ग्यानबाची मेख बहुतेकांच्या पुष्कळ नंतर लक्षात आली. एक तर जाहीर केलेली माफी ही पूर्णत: सरसकट नव्हती. यातून भयमुक्त होणार होते ते किरकोळ अपराधी, जे की संख्येने खूप होते आणि सरकारमध्ये बहुधा कनिष्ठ पदांवर होते. मात्र, ज्यांच्यावर अगोदरच चौकशी/ कारवाई चालू होती असे, ज्यांचे १९७७ पूर्वीचे, परंतु मोठे गुन्हे होते असे आणि जे त्या वेळी हाँगकाँग सोडून पळून गेले होते असे, अशा तीन प्रकारच्या गुन्हेगारांना अजिबात माफी जाहीर करण्यात आली नाही. शिवाय, ज्यांना भ्रष्टाचार करणे थांबवायचे होते, पण होऊ घातलेल्या शिक्षेच्या भीतीने जे स्वत: व साथीदारांसाठी बचावात्मक भ्रष्टाचार करत होते, त्यांना पूर्वीच्या पापांची भीती आणि त्याचबरोबर भ्रष्टाचार सुरू ठेवण्याची गरज उरली नाही. त्याहून महत्त्वाचे म्हणजे १ जानेवारी १९७७ नंतरच्या भ्रष्टाचाराला मात्र कोणतीच सूट नव्हती. थोडक्यात, चिरीमिरी खाणार्‍या बाबू आणि पोलीस लोकांना संदेश मिळाला, की बाबांनो आणि महिलांनो, आतापर्यंत जे खाल्ले, ते खाल्ले. ते सर्व माफ; पण यापुढे पैसे खाल, तर तुमची धडगत नाही. तेव्हा वेळीच शहाणे व्हा आणि यापुढे प्रामाणिक राहा.
आणि तसेच झाले. अर्थात, हा निर्णय घेताना हे असे होईल, याची खात्री तेव्हा कोणीच देऊ शकला नसता आणि या माफीचा गैरफायदा कित्येकांना झाला. किती तरी भ्रष्टाचारी निर्दोष मुक्त झाले. अनेक जण आपली गैरमार्गार्जित अमाप संपत्ती घेऊन उजळ माथ्याने हाँगकाँग आणि परदेशात नवृत्त झाले; परंतु त्याचबरोबर नवीन भ्रष्टाचाराची निर्मिती थांबल्यात जमा झाली. हळूहळू हाँगकाँग भ्रष्टाचारमुक्त झाले.
आपल्याकडे या घडीला तीच परिस्थिती आहे. सर्व भ्रष्टाचार्‍यांना शिक्षा करणे शक्य नाही म्हणून त्या सगळ्यांचं फावतंय. एकदाच आपण जर सर्व किरकोळ भ्रष्टाचार्‍यांना एकदम माफ करू शकलो, तर त्यांना कारवाईची भीती दाखवून स्वत: शेकडो, हजारो कोटी गडप करणारे, धरणे, रस्ते, शेतकर्‍यांची मदत मधल्या मध्ये हडपणारे उघड्यावर पडतील. त्यातले काही परदेशी पळतील, काही तसेच सुटतील; पण भविष्यात पैसे खाताना कारकुनापासून मंत्र्यापर्यंत सर्वांना जरब बसेल, अशी यंत्रणा नक्कीच उभारता येईल
.(लेखक हाँगकाँग येथील बहुराष्ट्रीय कंपनीत कार्यरत आहेत.)