शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

आमच्याही पावसाची नोंद घ्या.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 06:05 IST

गेल्या काही दिवसांत राज्यात पावसानं थैमान घातलं. त्याची दखल घ्यायलाच पाहिजे होती, तशी ती घेतलीही गेली. मात्र हे भाग्य दुर्गम भागांतील  ना पावसाला मिळत, ना आदिवासींना.. या गच्च ओल्या वातावरणात  त्यांच्या चुली कशा पेटत असतील?  ते काय खात, काय कमवत असतील? उघड्या रानात या पावसाला कसे झेलत असतील?

ठळक मुद्देआदिवासी पट्टय़ांतील भटक्या विमुक्त पालांवरची मूक कहाणी..

- हेरंब कुलकर्णी   

गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि राज्यांतील इतर ठिकाणच्या रौद्र पावसाच्या बातम्या सुरू आहेत. 26 जुलैच्या पावसाच्या वेळी फार कॅमेरे नव्हते. आता या पावसाला कॅमेरे आणि सोशल मीडिया असल्याने हा पाऊस राज्यभर पोहोचतोय. बंद पडलेली मुंबई आणि थांबलेली रेल्वेची चाके हे सारे दाखवताना त्याला जबाबदार कोण हे दडपणही मीडिया निर्माण करू शकते. बातम्यांची सततची झड प्रशासनाला हुडहुडी भरायला लावू शकते; पण हे भाग्य आमच्या दुर्गम भागातील पावसाला नाही. या पावसाचे तपशील पोहोचत नाहीत. त्याची भीषणता समाजापर्यंत जात नाही. त्यामुळे त्या वेदनेला पैलतीर उगवत नाही. आदिवासी भागातला पाऊस हा भात, खाचरे लावण्यापुरताच परिचित असतो, कारण पाऊस सुरू झाला की हमखास त्याचे फोटो यायला लागतात. ते चित्न मोठे सुंदर दिसते; पण झड लागलेला पाऊस काय हाहाकार उडवतो त्याची कल्पना कोणालाच येत नाही.कोणत्याही आदिवासी पट्टय़ात सलग आठ किंवा 15 दिवस पाऊस सुरू राहातो. हवामानबदलानंतर तर हे प्रमाण जास्तच वाढले आहे. एक एक धरण भरेल इतका प्रचंड पाऊस आदिवासी भागात होत राहातो. अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणात केवळ एक महिन्याच्या पावसात 11 टीएमसी पाणी जमा होते, यावरून त्या कोसळणार्‍या पावसाची तीव्रता लक्षात यावी. मुंबईसारख्या ठिकाणी रुळांवर पाणी येणे यासारख्या लक्षणांनी ती तीव्रता मोजता येते; पण आदिवासी भागात ते कसे मोजणार? ती तीव्रता कुपोषण आणि बालमृत्यूंनीच मोजली जाते. एकदा पावसाची झड सुरू झाली की सगळे जनजीवन ठप्प होऊन जाते. अघोषित संचारबंदी लागू होते. अशा पावसात भातलावणी करावी लागते. त्यानंतर सगळ्यात वाईट उपासमार सुरू होते. ज्यांची जरा बरी स्थिती आहे त्यांच्याकडे धान्य साठवलेले असते. ते तग काढतात; पण हातावर पोट असणार्‍यांची दैना होते. लहान मुले बारीक तोंड करून बसलेले असतात. पावसाळ्यात नदीतल्या किंवा शेतातल्या रानभाज्या खाऊन दिवस काढावे लागतात. अनेक दिवस वादळामुळे लाइट नसल्याने धान्य दळून मिळत नाही, की खरेदीला जास्त दूर जाता येत नाही. त्यासाठी रोख चलनही फार नसते. घरात पुन्हा चलन यायला काम मिळायला हवे. भातलावणी झाली की पुढे अनेक दिवस काम निघत नाही शेतात. इतक्या पावसात काम मिळत नाही. त्यामुळे पैसा नाही. ऐन पावसाळ्यात कामासाठी दूर जिल्ह्यात स्थलांतर करणारे मजूरही बघितलेत. ‘दारिद्रय़ाची शोधयात्रा’ या अहवालाच्या निमित्ताने आदिवासींच्या पाड्यापाड्यांवर फिरलो, तेव्हाही एक वेगळाच भारत दिसला होता. महिनाभरात फारतर दहा दिवस काम मिळाल्याचे लोक सांगायचे. गढूळ पाण्यात नदीत मासे वाहत येतात ते पकडून दिवस काढणारे आदिवासी भेटले.सतत पाऊस सुरू झाला की तापमान खाली जाते. हुडहुडी भरते. घराजवळ साठवून ठेवलेल्या लाकडांनी चूल दिवसरात्न सुरू ठेवली जाते; पण संपूर्ण घराला ऊब फार मिळत नाही. पोटभर अन्न नसल्याने थंडी जास्तच वाजते, माणसांच्या भुकेची आपण बात करतो, पण खरी उपासमार होते ती जनावरांची. साठवलेला चारा संपला तरी जोरदार पावसात जनावरांना डोंगरावर नेणे मुश्कील असते. त्यामुळे जनावरे उपाशीच राहातात. घराच्या आजूबाजूला उगवलेले खुरटे गवत खाऊन काही दिवस काढतात. थंडीने तेही कुडकुडत राहातात. थंडीने ते मरू नयेत म्हणून गोठा नसलेले आदिवासी त्या जनावरांना राहत्या घरात घेतात. तिथेच त्यांचे मलमूत्न विसर्जन आणि सगळे काही. या दिवसात ही माणसे आणि जनावरे जिवंत राहातात कशी, हाच प्रश्न पडतो. या काळात आजारी पडले तरी पावसाचे कारण दाखवून बर्‍याच ठिकाणी दवाखाने बंद ठेवले जातात. मेळघाटात बालमृत्यू याच दिवसात होतात, या प्रश्नाला आताशा वाचा फुटल्याने आणि सरकार आणि मैत्नीसारखे प्रकल्प सजग झाल्याने जीव वाचतात. रेल्वे रूळ किंवा पुणे, मुंबई रस्त्याच्या कोंडीला किमान बातमी होण्याचे तरी भाग्य लाभते; पण आदिवासी गावातील रस्ते वाहून जातात आणि चिखलातून पुढे कितीतरी दिवस जा-ये करावी लागते. आजही अनेक ठिकाणी पेशंटला डोली करून मुख्य रस्त्याला आणावे लागते. रस्ते मंजूर होतात, पण ‘इकडे कोण येणार बघायला?’,  म्हणून ठेकेदार निकृष्ट बांधकाम करून चेक घेतात, नेते आपले हात ओले करून घेतात आणि पावसाळ्यात हे रस्ते वाहून जातात. पण प्रशासनाला जाब विचारणारा मीडिया आणि सोशल मीडिया इथे नसतो.आर्शमशाळा याच परिसरात असतात. त्यांचे हाल तर विचारू नका. एकदा वीज खंडित झाली की अनेक दिवस परत येत नाही. अंधारात राहावे लागते. विजेअभावी दळण मिळत नाही. अनेकवेळा भात खावा लागतो. वादळी पावसात पत्ने वाजत असतात. ते जागेवर राहतील की नाही याची भीती असते. कपडे वाळत नाही. खिडकीतून पाणी आत येऊन ओल असते. अशा स्थितीत झोपावे लागते. हे चार महिने शिक्षण भिजून जाते. आदिवासी इतक्या पावसाचा अत्याचार सहन  करताना त्याच पाण्यावर धरणे भरतात. पाणलोट क्षेत्न या एका शब्दात त्यांची ओळख पुसून टाकली जाते. धरण भरायला लागले की, पर्यटक गर्दी करतात, ज्या गावांना या पाण्याचा लाभ मिळणार आहे ते लाभक्षेत्नातील लोक क्रि केटचा स्कोर मोजावा तसे आज किती पाणी वाढले ते मोजत राहतात, स्थानिक मीडिया ती उत्सुकता पुरवत राहते. जसजसे आकडे फुगत जातात तसतसे लाभक्षेत्नाच्या आनंदाला उधाण येते, पण इतके प्रचंड पाणी जिथून येते त्या माणसांचे, जनावरांचे काय होत असेल? एकाच दिवशी एक टीएमसी पाणी धरणात येताना त्या पाचट घातलेल्या घरांचे काय होत असेल, हा प्रश्नसुद्धा कुणाला पडत नाही. आणि क्रूर विनोद हा की सगळे पाणी वाहून गेल्यावर या आदिवासी गावांना उन्हाळ्यात हंडे घेऊन टॅँकरमागे फिरावे लागते. धरणाखाली साखर कारखाने आणि शेतात ऊस उभा राहतो; ज्यांनी तो पाऊस अंगावर झेलला आणि ज्यांच्या मागच्या पिढय़ांनी धरणासाठी जमिनी दिल्या ते मात्न पावसाळ्यात भिजलेले आणि उन्हाळ्यात तहानलेले असे आदिवासींचे भागधेय आहे. आदिवासी भागात रस्ते वाहून गेल्यावर पुलावर पाणी असल्यावर अनेकदा कित्येक किलोमीटरची पायपीट करावी लागते. चंद्रपूर जिल्ह्यात सावली तालुक्यात एका गावाची ग्रामपंचायत शेजारच्या गावात; पण पावसाने पाणी भरले की अतिदूर प्रवास करून जावे लागते. काही गावांना धरणातील बोटीने त्यांच्या गावात जावे लागते. पण पाऊस वाढला की बोट बंद होते आणि कित्येक किलोमीटर चालत जावे लागते. इतर ठिकाणी पावसामुळे दरड कोसळून रस्ता बंद झाला तरी लोक अस्वस्थ होतात. पण हे लोक शांतपणे चालू लागतात. काही वर्षांपूर्वी आमच्या तालुक्यात एका गावातून एक आदिवासी आपल्या मुलाला आर्शमशाळेत सोडायला निघाला. पुलावर पाणी होते. नदीला पूर. त्यामुळे पलीकडे जाण्यासाठी पाणी किती खोल म्हणून बघायला तो पाण्यात उतरला. जोरात लाट आली आणि वाहून गेला. ते लहान पोरगं वडिलांना हाक मारते आहे आणि बाप दिसेनासा झाला पाण्यात. त्या मुलाची मन:स्थिती कशी, कोणाला रेखाटता येईल?   मुंबईच्या आणि शहरी भागातल्या पावसात फुटपाथवर राहाणारे, झोपडपट्टीतले लोक कसे जगत असतील, याची कल्पना हातात चहाचा कप घेऊन टीव्हीवर पावसाच्या बातम्या बघताना येत नाही. आमचे भटके-विमुक्त पालावर राहाताना या पावसाला कसे झेलत असतील? पालात पाणी घुसत असेल तेव्हा लहान लेकरांना घेऊन कुठे झोपत असतील? या ओल्या वातावरणात चुली कशा पेटत असतील? काय खात असतील? या दिवसात पैसे कसे मिळवत असतील? एक एक प्रश्न पावसाच्या पाण्यासारखा मनात ओघळत राहतो.कोणताही ¬तू झेलणे हे शेवटी आर्थिक कुवतीवर अवलंबून असते. ज्याची ऐपत आहे तोच या ¬तूंचा आनंद घेऊ शकतो, अन्यथा गरिबांसाठी हे तीव्र ¬तू जीवघेणे ठरतात. उन्हाळा गरिबांना उष्माघाताने मारतो. हिवाळ्यात त्यांना फुटपाथवर कुडकुडत मारतो आणि पावसाळ्यात बालमृत्यू आणि घरे कोसळून मारतो. उन्हाळा तोच झेलू शकतो, जो पंखा आणि एसी लावू शकतो. हिवाळा तोच झेलू शकतो, जो घरात शेगडी लावू शकतो, गरम कपडे घालू शकतो आणि पक्के घर बांधू शकतो; त्याचप्रमाणे पावसाळा तोच झेलू शकतो, जो बाहेर प्रपात असला तरी पोटभर खाऊ शकतो आणि पक्क्या घरात राहू शकतो. ¬तू आणि आर्थिक परिस्थिती यांचे हे वेगळेच नाते आहे. कोसळत्या पावसात कॉफी घेत गझल ऐकायला एक उन्नत आर्थिक स्थिती ही पूर्वअट असते. बाकी गरिबांना निसर्गाच्या प्रत्येक ¬तूत होणार्‍या हल्ल्यांना तोंड द्यावे लागते. सामाजिक वर्ग आणि ¬तू यांचे हे नाते किती विचित्न आहे. मी एकदा पावसाळ्यात भंडारदरा धरणाकडे गेलो होतो. धरण भरल्यामुळे ते पाहण्यासाठी पर्यटक मोठय़ा संख्येने होते. पाऊस थांबला होता व पुन्हा येण्याची शक्यता होती. मुंबईच्या काही महिला एका छोट्या धबधब्यात पाय सोडून वर आकाशात पाहात पाऊस कधी येईल याची वाट बघत होत्या.  त्याचवेळी पाऊस थांबला म्हणून एक आदिवासी महिला आजूबाजूला पडलेली लाकडे गोळा करीत होती..herambkulkarni1971@gmail.com                                        (लेखक प्रयोगशील शिक्षक आणि शिक्षण चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत.)