- मयूर पठाडे
इंचा-इंचाची लढाई सुरू आहे.
कोणीच तसूभरही मागे हटायला तयार नाही.
पहिल्या आणि दुस:या महायुद्धातही ‘मित्र देश’ एका बाजूला तर ‘शत्रू देश’ दुस:या बाजूला होते.
यावर्षी तापत चाललेल्या या नव्या महायुध्दात मात्र जगातले सारेच देश जणू परस्परांचे ‘मित्रराष्ट्र’ झाले आहेत. आणि सगळे मिळून ‘एकाच शत्रूशी’ लढताहेत!
- हा ‘शत्रू’ तसा ‘अंतर्गत’ आहे : तंबाखू उत्पादक कंपन्या आणि निर्माते! क्यूबा, युक्रेन, होंडुरास आणि डॉमिनिकन रिपब्लिक. यासारखे बोटावर मोजता येण्यासारखे चिल्लेपिल्ले देश सोडले तर या कंपन्यांशी सगळ्याच देशांनी युध्द पुकारलं आहे. आणि तरीही या बडय़ा कंपन्या या जागतिक दबावापुढे नमायला तयार नाहीत.
- आधीच (सिगारेटच्या पाकिटावरची) शक्य होती तेवढी जास्तीत जास्त जागा आम्ही ‘तंबाखूचं सेवन किती हानिकारक आहे’ हे ओरडून सांगणा:या इशा:यांसाठी सोडली आहे, आता आणखी पाव इंचसुध्दा देणार नाही असा या कंपन्यांचा निर्धार आहे.
या ‘जागतिक धूम्रयुद्धा’ची सुरुवात तशी अगदी अलीकडची. फार र्वष नाही झालीत त्याला.
1965.
अमेरिकेनं या युद्धाला तोंड फोडलं.
‘सिगारेट ओढणो आरोग्यास घातक आहे’ अशी वैधानिक चेतावणी पाकिटावर (एका कोप:यात) छापणं सिगारेट उत्पादक कंपन्यांना बंधनकारक केलं गेलं, पण तेवढंच. त्यानंतर फार काही झालं नाही.
आणि आता डिसेंबर 2क्12मध्ये ऑस्ट्रेलियानं सिगारेट कंपन्यांना आदेश दिला आहे, ‘आजपासून पाकिटावर तुमचं काहीही असणार नाही. बारीक अक्षरात तुमच्या ब्रॅण्डचं नाव तेवढं छापायला परवानगी असेल!’
- जगभरातले सारेच तंबाखू विक्रेते आणि उत्पादक याविरुद्ध आता चवताळून उठले आहेत.
विविध देशांत सिगारेट पाकिटांवरील वैधानिक इशा:यांचा आकार वाढत गेला, तसा कंपन्यांनीही आपला विरोध वाढवत नेला, पण त्याचबरोबर त्यांनी आपल्या खपासाठी इतरही नामी युक्त्या शोधून काढल्या. सिगारेट पाकिट हेच त्यांचं आयुध होतं, त्यांनी या पाकिटाचेच आकार असे बदलवत नेले की ‘ग्राहकां’च्या नजरेला हे इशारे पडणारच नाहीत किंवा कमीत कमी पडतील!
सिगारेटच्या पाकिटांवर ‘चित्रमय’ धोक्याचा इशारा छापायला पहिल्यांदा सुरुवात केली ती कॅनडानं. सन 2क्क्क्मध्ये. त्यानंतरही पाच र्वष फारसं काहीच घडलं नाही. पण तंबाखूचे धोके लक्षात आल्यानं अनेक देशांनी असे इशारे पाकिटांवर छापणं कंपन्यांना बंधनकारक केलं. त्याचा आकारही हळूहळू वाढत गेला. आता 2क्16र्पयत जवळजवळ शंभर देशांमध्ये मोठय़ा आकारातला हा इशारा बंधनकारक झालेला असेल!
तरीही त्यातली मेख अशी की, आजही सुमारे 55 देशांत सिगारेट पाकिटांवर धोक्याचा इशारा छापणं कंपन्यांना बंधनकारक नाही!
भारतानं हा इशारा छापण्याची जागा पाकिटावरल्या उपलब्ध जागेच्या 85 टक्क्यांर्पयत वाढवण्याचं सूतोवाच केलं आणि आपल्याकडे ‘राज्यकत्र्या’मध्येच जाहीर मारामारी सुरू झाली!
पाकिटांवरच्या वैधानिक इशा:यांचा आकार जसजसा वाढत गेला, तसतसं जगभरातील अनेक कंपन्यांनी कोर्टात कज्जे-खटले सुरू केले. जवळजवळ सारेच त्यात तोंडघशी पडले, पण त्याचवेळी त्यांनी आपला गनिमी कावाही सुरू ठेवला.
‘या बंधनांमुळे आमच्या बौद्धिक संपदा अधिकारांवर गदा येते’ असाही दावा तंबाखू उत्पादक कंपन्यांनी करून पाहिला. ऑस्ट्रेलियन न्यायालयानं त्यांना घरचा रस्ता दाखवला.
या लढाईत आजही सिगारेट उत्पादक कंपन्या कोटय़वधी डॉलर्स ओतताहेत. न्यायालयीन लढाईत आपण जिंकणार नाही हे लक्षात येताच त्यांनी आता जागतिक व्यापार संघटनेकडे (डब्ल्यूटीओ) तक्रार करून ‘द्विपक्षीय गुंतवणूक कराराचं हे उल्लंघन आहे’ असा कांगावा सुरू केला आहे.
या निकालाकडे आता जगभरातले देश डोळे लावून बसले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या पावलावर पाऊल टाकण्यास बरेच देश उत्सुक आहेत, पण या कज्जे-ेखटल्यांमुळे सध्या त्यांनी ‘थंडा कर के खाओ’चं धोरण स्वीकारलं आहे. हा निकाल जर ऑस्ट्रेलियाच्या बाजूनं लागला तर तोच कित्ता गिरवायला जगभरातले अनेक देश तयारीतच आहेत. हा ‘डॉमिनो इफेक्ट’ मग लवकरच युरोपात आणि नंतर जगभरात पाहायला मिळेल!
पण अमेरिकेचं काय?
त्यांनी सुरुवात तर करून दिली.
त्यानंतर 2क्क्9मध्ये अमेरिकेनं सिगारेट उत्पादक कंपन्यांना ‘चित्रमय वैधानिक इशारा’ पाकिटावर छापणं बंधनकारक केलं. अर्थातच कंपन्यांनी त्याला आव्हान दिलं. अमेरिकन न्यायालयानं ‘‘सिगारेट उत्पादक कंपन्यांच्या ‘राइट टू फ्री स्पीच’ या घटनात्मक हक्काचा हा भंग आहे’ असं सांगून उत्पादकांची बाजू उचलून धरली. 1984मध्ये वैधानिक इशा:यांचा (केवळ लिखित मजकूर) जेवढा आकार होता, तेवढाच आकार आजही अमेरिकेत आहे!.
अर्थात तंबाखूच्या इशा:याबाबतचं जागतिक महायुद्ध आता पेटलं आहे. त्यात फक्त ‘चिंगारी’ लावून बाजूला बसणं अमेरिकेलाही फार काळ शक्य होणार नाही!.
आपल्याकडे काय होईल?.
- बघूया.
सिगारेट कंपन्यांचा गनिमी कावा!
1 एक अभ्यास सांगतो, दररोज धूम्रपान करणारी व्यक्ती वर्षभरात किमान सात हजार वेळा आपलं सिगारेटचं पाकीट (किंवा ते पाकीट असलेली हॅण्डबॅग) उघडते! ‘सिगारेटचं पाकीट हे धूम्रपान करणा:या व्यक्तीच्या पोशाखाचा एक भाग आहे!’ असं अनेक कंपन्या तर आजही मानतात, त्यामुळे हा पोशाखच आणखी ‘टापटीप’ करण्याचा प्रयत्न सिगारेट कंपन्यांनी आजवर केला आहे.
2 वैधानिक इशारे छापले जाण्यापूर्वी बहुतांश सिगारेट पाकिटं वरच्या बाजूने उघडली जात असत. 2क्क्6 पासून कंपन्यांनी या पाकिटांचं ओपनिंग पाकिटाच्या एका बाजूनं केलं! स्ट्रक्चरल पॅकेजिंगमधलं हे ‘इनोव्हेशन’ होतं. इंग्लंडमध्ये त्या विशिष्ट बॅ्रण्डचा खप तब्बल 75 दशलक्ष पाउंडनी वाढला!
3 साइड ओपनिंगमागे आणखी एक छुपा हेतू होता. जेव्हा ही पाकिटं उघडली जायची, तेव्हा त्यावरच्या इशा:यांना आपोआपच कमी जागा उपलब्ध व्हायची!
4 कंपन्यांनी केलेला आणखी एक इनोव्हेटिव्ह बदल म्हणजे त्यांनी आपल्या पाकिटांचं डिझाइन चक्क पुस्तकांसारखं केलं. आपण पुस्तक उघडतो तसं हे पाकीट कण्यातून उघडतं. आत सिगारेटी तर असतातच, शिवाय कंपन्यांना ‘जे हवं ते’ छापायला जागाही मिळते. हे पाकीट उघडलं की झालं, बाहेरचे इशारे आपोआपच गायब!
5 या पाकिटात आणखी एक सोय होती, हे पाकीट मध्यभागातून फाडलं की झाली दोन पाकिटं तयार! (इशा:यांची लागली का वाट!) शिवाय हे पाकीट दोन जणांमध्ये शेअर करण्याची आणि एका वेळचा खर्च कमी करण्याचीही सोय! (ऑस्ट्रेलियानं अशा पाकिटांवरही आता बंदी घातली आहे!)
6 सिगारेट कंपन्यांनी आता ‘स्लिम’ आणि परफ्यूम बाटल्याच्या आकाराची पाकिटं तयार करून महिलांना लक्ष्य करायला सुरुवात केली आहे.
7 अनेक कंपन्यांनी सिगारेट पाकिटांवर ‘माइल्ड’, ‘लाइट’, ‘लो टार’ असं छापायला सुरुवात केली आहे, जेणोकरून धूम्रपान करणा:यांचा समज व्हावा, ‘ही सिगारेट कमी घातक आहे!
धोक्याचे ‘वाढते’ इशारे
जगभरातील विविध देशांत सिगारेटच्या पाकिटावरील किती टक्के जागा ‘तंबाखू हानिकारक आहे’ हे छापण्यासाठी वापरली जाते याचे प्रमाण.
असा इशारा अजिबातच न छापण्याची मुभा असलेले देश (अजूनही)
55 आहेत आणि सहा देशांमध्ये हे प्रमाण तब्बल 75 टक्क्यांहून जास्त असणो बंधनकारक आहे.
(सौजन्य : कॅनडा कॅन्सर सोसायटी)