शहरं
Join us  
Trending Stories
1
'धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन', मंत्री होताच छगन भुजबळांचे मोठे विधान
2
Karun Nair : रोहित-विराटच्या टेस्ट निवृत्तीनंतर आठवला 'त्रिशतकवीर'! आठ वर्षांनी कमबॅकची संधी
3
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
4
बंदूक नाही पण निलेश चव्हाणचा लॅपटॉप पोलिसांच्या हाती, आत सापडले… 
5
Mohammed Shami: इंग्लंड दौऱ्यासाठी मोहम्मद शमीची निवड का झाली नाही? अजित आगरकर म्हणाले...
6
मोठी अपडेट : वैष्णवी हगवणे प्रकरणात निलेश चव्हाण सहआरोपी, पोलिसांच्या हाती लागण्याची प्रतिक्षा कायम
7
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व
8
एक कोटी ८४ लाखांचे प्रकरण दाबवण्यासाठी गृह खात्याचे गुप्त आदेश; अनिल गोटेंचा आरोप
9
सिंधमध्ये पाकिस्तान सरकारला विरोध तीव्र, बेनझीर भुत्तोंच्या लेकीच्या ताफ्याला घेराव, लाठ्या काठ्यांनी हल्ला   
10
IND vs ENG : इंग्लंड दौऱ्यासाठी कठोर मेहनत; १० किलो वजनही कमी केलं! पण... सरफराजला ते प्रकरण भोवलं?
11
धक्कादायक! ४० हजारांसाठी देशाशी गद्दारी; गुजरातच्या कच्छमधून पाकिस्तानी गुप्तहेराला अटक
12
फायद्याची गोष्ट! रिकाम्या औषधांच्या रॅपरचा मोठा उपयोग; गृहिणी करतात किचनमध्ये क्रिएटिव्ह वापर
13
इंटरनेटची सुविधा नाही, फोनही लागत नाही; भुयारी मेट्रोचा प्रवास ठरतोय त्रासदायक!
14
Varlin Panwar : वडील आर्मी ऑफिसर, लेकही होती IAF स्क्वाड्रन लीडर; आता प्रसिद्ध बॉलिवूड स्टार्सना देतेय ट्रेनिंग
15
वडिलांची झाली हत्या, मारेकऱ्यांना शिक्षा देण्यासाठी 'तो' झाला IPS; फी भरण्यासाठी विकलं धान्य
16
IND vs ENG : तो चांगला खेळतोय; पण...श्रेयस अय्यर कसोटी संघात का नाही? अजित आगरकर यांनी असं दिलं उत्तर
17
Rohit Pawar: समविचारी पक्ष सोबत आले तर ठिक, नाही तर...; रोहित पवार स्पष्टच बोलले
18
बिपाशाच का ही? अभिनेत्रीचा व्हिडिओ पाहून नेटकरी शॉक; एकेकाळची 'फिटनेस दिवा' आता...
19
Covid-19: चिंता वाढली! कळव्यात २१ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू
20
लग्नादरम्यान भर मंडपातून वराचं अपहरण, समोर आलं धक्कादायक कारण, कुटुंबीयांच्या तोंडचं पळालं पाणी  

मित्र

By admin | Updated: August 1, 2015 15:56 IST

तेव्हा गूगल नव्हतं, अर्थातच यू टय़ूब नव्हतं आणि टोरँटवरून सिनेमे डाउनलोड करून हवं तेव्हा बघायची काहीच सोय नव्हती.

 चंद्रमोहन कुलकर्णी

 
तेव्हा गूगल नव्हतं, अर्थातच यू टय़ूब नव्हतं आणि टोरँटवरून सिनेमे डाउनलोड करून हवं तेव्हा बघायची काहीच सोय नव्हती.
टीव्ही होता, पण जेमतेमच. डीडी नॅशनल हे एकमेव आणि तेसुद्धा ब्लॅक अॅण्ड व्हाइट चॅनेल. अर्थात त्यावरूनसुद्धा ब्लॅक अॅण्ड व्हाइटचा अभ्यास होतच असे. खरा, जास्त, सगळ्या दृष्टीनं अभ्यास करायचा झाला तर थिएटरला जाऊन सिनेमा बघणं हा एकमेव पर्याय होता.
त्यामुळे माझा मित्र आणि मी, फार सिनेमे पाहिले आम्ही एकत्र.
चित्र्रं काढायला यायला पाहिजे असतील, तर सिनेमे पहायला हवेत; अशी आमची पक्की धारणा होती. एखादं इलस्ट्रेशन करताना लाँग शॉट, मिडल शॉट वगैरेसारख्या गोष्टींची योजना करणं एकवेळ जमत असे, पण क्लोजअपच्या बाबतीत अडचण असायची. आम्हाला अगदी काही फार मोठी कॉमिकची कामं मिळत होती आणि निरनिराळे हावभाव दर्शविणारे चेहरे काढण्याची वेळ आमच्यावर रोज उठून येत होती अशातला काही भाग नव्हता. पण आम्हाला किडा फार!
एखादा मनुष्य किंवा बाई किंवा बाळ रडताना त्याच्या चेह:यावरचे हावभाव नेमके कसे असतात हे सिनेमात ब:याचवेळा क्लोजअपमध्ये बघायला मिळतात. अशा रडतेवेळी कपाळावर आठय़ा येतात का? डोळे बारीक होतात का? गालावर नेमक्या चुण्या कोणत्या ठिकाणी पडतात? दात दिसतात का? डोळ्यातले अश्रू दाखवले तरच चेहेरा रडवेला वाटतो का? की अश्रू ओघळताना दाखवावेत? कितीतरी लोक हसताना रडताहेत असं वाटतं किंवा रडताना हसताहेत असं वाटतं. अशा वेळी काय केलं म्हणजे चेह:यावरच्या अपेक्षित अशा नेमक्या भावनेचं जास्तीत जास्त दर्शन घडवता येईल? असंच हसण्याच्या बाबतीत. हसण्याच्या बाबतीतही माणसांच्या अनेक त:हा असतात. हास्याचे अनेक प्रकार. स्मित हास्य, खो खो हसणं, खदाखदा हसणं वगैरे वगैरे!!
ओठांच्या रेषा किती वाकवल्या म्हणजे ते स्मितहास्य वाटतं आणि किती मर्यादेपर्यंत त्या ताणल्या की ते दिलखुलास हसणं वाटेल? एखादी व्यक्ती हसताना तिचे दात ठळकपणानं दिसणं साहजिकच आहे. या हास्याचं चित्र काढताना मात्र दात जेवढे ठळकपणो दिसतात तेवढे ते चित्रत काढून का चालत नाहीत? नेमकं काय बिघडतं, की ज्यामुळे चित्रतलं हास्य कृत्रिम वाटू लागतं?
याशिवाय काम, क्र ोध, लोभ, चिंता, काळजी अशा एक ना दोन हजारो प्रकारची एक्सप्रेशन्स एरवी कुठे आणि कशी बघायला मिळणार? फार थोडय़ा पैशांमध्ये हे सगळं आम्हाला सिनेमातच फक्त बघायला मिळायचं. पण, वेळ कमी पडायचा, अभ्यासाला वेळ पुरायचा नाही. मग तोच सिनेमा दोनदोनदा तीनतीनदा बघावा लागायचा. 
नाटक आम्हाला परवडायचं नाही, शिवाय लोकेशन्स, कॅरेक्टर्स, ड्रेपरी या सगळ्याचंही तुफान आकर्षण होतं. तसली व्हरायटी सिनेमाव्यतिरिक्त कुठेच बघायला मिळायची नाही. शिवाय कलरस्कीम्स, फोटोग्राफीचा अभ्यास व्हायचा. कॅमे:याचे निरनिराळे अँगल्स आणि परस्पेक्टिव्ह! 
सिनेमाला स्टोरी वगैरे असते, डायलॉग असतात, त्यातली गाणी, त्यातले शब्द, संगीत इत्यादी गोष्टीसुद्धा त्यात असतात हे सगळं आमच्या गावीही नसायचं. खरं तर त्या स्टोरी वगैरे प्रकरणात आम्हाला यत्किंचितही रस नसायचा आणि ती समजून घ्यायची आमची फारशी इच्छाही नसायची. स्टोरीकडे लक्ष दिलं तर चांगल्या चांगल्या शॉट्सकडे दुर्लक्ष होईल, भारी भारी कलरस्कीम बघायच्या राहून जातील आणि मग अभ्यास होणार नाही असं आम्हाला वाटायचं. स्टोरीचं बंधन नसल्यामुळे पिक्चरसुद्धा कोणत्याही भाषेतला असला तरी फारसा फरक पडायचा नाही. पण पर्याय उपलब्ध असतील, आणि निवड करायचीच झाली तर त्यातल्या त्यात इंग्लिशची निवड व्हायची. उच्चार कळायचे नाहीत, भाषा समजायची नाही, तरी उच्च दर्जाचे सीन्स, कलरस्कीम्स, कॅरेक्टर्स, ड्रेपरी, कॉश्च्यूम या सगळ्या गोष्टी इंग्रजी सिनेमातच भारी असतात अशी आमची तेव्हापासूनची जी खात्री होती ती आजतागायत टिकून आहे.
सिनेमा बघायचा कार्यक्रम मोठा. हिंदीचा एवढा प्रॉब्लेम नसायचा. कोणत्याही थेटरला लागायचा. मराठीत दादा कोंडके सोडून दुसरं काही पाहिलं नाही, आईनं लहानपणी हाताला धरून नेऊन प्रचंड दाखवले, आईचं बोट सुटायची आणि मराठीत रद्दी पिक्चर यायला लागायची वेळ एकच आली. प्रॉब्लेम इंग्लिश पिक्चरचा होता. त्यासाठी सर्वात जवळचं थिएटर म्हणजे अलका. अलकाला काहीच प्रॉब्लेम नसायचा. खिशात पैसे असले तर समोरच्या दरबार हॉटेलात चहा पीत बसल्या बसल्यासुद्धा निर्णय व्हायचा आणि पुढच्या दहाच मिनिटांत आम्ही थिएटरमध्ये असायचो. पण राहुल वेस्टएंड, कॅपिटॉल असल्या ठिकाणी ऐन वेळी जाऊन सिनेमे बघायचे म्हणजे फार धावपळीचं आणि कष्टाचं काम होतं. सायकल स्टॅण्डच्या खर्चापासून चहा, बिडी आणि वडापावच्या खर्चाचं त्याचबरोबर वेळेचं बजेट तयार करण्यात आम्ही माहीर होतो. सायकल स्टॅण्डचे पैसे वाचवण्यासाठी एकाच सायकलवर डबलसीट जाणं, दोघात एक चहा, एक सिगरेट आणि एकच वडापाव असा मोठा त्याग करावा लागत असे.
अर्थातच सिनेमाचा प्रभाव चित्रंवर होत असे. कधीकधी गरज नसताना चित्रत मग हट्टाने निरनिराळे अँगल येत. कधी खालून कॅमेरा लावल्यासारखा अँगल, तर कधी वरून! उगाचच! अनाठायी!! स्टोरी इलस्ट्रेशन हा एक अभ्यासाचा स्वतंत्र विषय आहे, याची तोपर्यंत तरी कल्पना नव्हती. त्यामुळे विषयाचं भान, कथेचा आशय, इंटरप्रिटेशन आणि त्यानुसार अभिव्यक्ती वगैरे भानगडी तेव्हा ऐकल्यासुद्धा नव्हत्या.! चित्र नुसतीच, वरवरची राहात. चित्रकारानं स्वत:चं म्हणून काही एक भाष्य करणं अपेक्षित असतं वगैरे भानगडी ऐकिवात नव्हत्या.
परस्पेक्टिव्हचा आम्ही दोघांनी फार अभ्यास केला, त्याला प्रत्येक गोष्ट खूप उंचावरून पाहिल्यावर वरच्या अँगलनं, कशी दिसेल हे काढून पाहण्यात फार इंटरेस्ट, आणि मला वाटायचं, आपण समजा मुंगी झालो तर आपल्याला कसं दिसेल? मग परस्पेक्टिव्ह  काही यथार्थ रहायचं नाही, फारच वाईड अँगल व्हायचं, पण अभ्यास मात्र व्हायचा. आर्ट स्कूलमध्ये आपण खूप गोष्टी शिकतो, ते शिक्षण तुम्हाला तुमच्या क्षेत्रत एका पायावर उभं करतं. पण आर्ट स्कूलच्या भिंतीबाहेर मित्रंबरोबर मुक्तपणानं घेतलेलं शिक्षण तुम्हाला दोन्ही पायांवर उभं करतं.
मी फार फार शिकलो माङया या मित्रकडून. आपले मित्र हे आपले गुरुसुद्धा असतात हे आपल्याला फार उशिरा समजतं.
आजही स्टुडिओत काम करताना, एखादं चित्रप्रदर्शन पाहताना, सिनेमा पाहताना, एखादी कलरस्कीम न्याहाळताना, एखादा शॉट एखादं एक्सप्रेशन बघताना, तो सोबत असतो माङया, आजही!
मध्यंतरी मी रोमला गेलो होतो. ज्यांची चित्रं, शिल्पं पहात पहात आपण लहानाचे मोठे झालो, कलेचा इतिहास शिकताना ज्यांच्या कलाकृतींचा अभ्यास केला, त्या भल्याभल्या चित्र-शिल्पकारांच्या कलाकृती पाहताना एका बोटानं अचंबा करत होतो, तर दुसरं बोट होतं या माङया मित्रच्या हातात. रोमन फिगर्सबद्दलचं त्याला अफाट वेड ! कुरळ्या केसांचे, पाणीदार डोळ्यांचे, बलदंड शरीरयष्टीचे देखणो पुरुष, घोळदार, असंख्य चुण्याचुण्यांची वस्रे ल्यायलेल्या कमनीय देहाच्या तितक्याच देखण्या स्त्रिया, त्यांचे ते वळणावळणाचे मोहक केशसांभार, ग्रीक शिल्पात हटकून येणारी बालकं,  कुरळ्याच केसांची आयाळ असलेले बलवंत, स्नायुवंत अश्व..
अनंताच्या प्रवासाला केव्हाच निघून गेलेल्या माङया मित्रचं अदृश्य बोट धरून मी ती अद्भुत नगरी पहात होतो, एक एक शिल्प न्याहाळत होतो, एक एक चित्र न्याहाळत होतो. मोठमोठय़ा हवेल्या, राजवाडे आणि चर्चेस बघत होतो, स्थापत्यशास्त्रला सलाम करत होतो. 
हस्तमुद्रा ही त्याची एक अत्यंत आवडती गोष्ट होती, तर मानवी पावलांचा अभ्यास, ही माझी! पावलं, घोटय़ाभोवतीचे  प्रदेश, बोटं, बोटांच्या त:हा, नखं, त्यांचे आकार, तळवे, इतकंच नव्हे तर पाय म्हटलं की, ओघानंच येणारी पादत्रणं! चपला, बूट, सॅण्डल्स या गोष्टींचा अभ्यास करण्याची माझी मूळची आवड त्याच्या त्या हस्तमुद्रांच्या अभ्यासामुळे वाढीस लागली.
स्त्रियांच्या हस्तमुद्रांचा त्याचा विशेष अभ्यास  होता. विशेषत: सुंदर स्त्रियांच्या हाताच्या ठेवणीबाबत त्याचं विशेष निरीक्षण असायचं किंवा खरं तर स्त्रियांच्या सौंदर्याचे मापदंड तो त्या स्त्रीच्या हातावरनं ठरवत असे. अगदी रस्त्यानं जातायेता, बसमध्ये, प्रवासात, बाजारात एखाद्या सुंदर स्त्रीचे हात, भाजी घेताना, पिशवी पकडताना, केसांवरून हात फिरवताना वगैरेंसारख्या गोष्टी करताना त्या स्त्रीच्या मोहक हस्तमुद्रा नजरेसमोरून क्षणार्धात विलीन होत. याच्या मन:चक्षूसमोरून मात्र त्या दिवसेंदिवस हलत नसत. मग मधेच कधीतरी अचानक त्याचा तो आवडता शब्द वापरून म्हणायचा,
‘‘कासावीस वाटतंय..!’’ 
कारण विचारल्यावर कळायचं की, एका अनोळखी बाईचा सुंदर हात केवळ काही क्षण पाहिल्यामुळे हे महाशय गेले आठवडाभर कासावीस आहेत! 
स्त्री-पुरुषांच्या हातापायांच्या बरोबरच कुत्री, गाय, पाल, कावळा असल्या प्राण्या-पक्ष्यांच्या पायांच्या बोटांचं निरीक्षण करण्याची सवय मला परागनं बक्षीस दिली.
आम्हा दोघांच्या कलेबाबतच्या विचारसरणीत फार मोठी एकवाक्यता होती, असा मात्र गैरसमज या गोष्टींमुळे होऊ शकेल.
त्याबाबत परिस्थिती फार वेगळी होती.
**    (क्र मश:)
 
(लेखक ख्यातनाम चित्रकार आहेत.)