शंकर महादेवन
‘ब्रेथलेस’, ‘-हिधून नाइन’ असे अनवट अल्बम तसेच ‘सिल्क’, ‘शक्ती’ अशा बॅण्डच्या माध्यमातून आणि सिनेसंगीतातही वेगवेगळे यशस्वी प्रयोग करणारे गायक-संगीतकार शंकर महादेवन यांची
खास मुलाखत.
सततचा प्रवास, विविध कार्यक्रम, मीटिंग्ज्, चाहत्यांचा न संपणारा गराडा. शिवाय नंतर स्टेजवरचा इतका उत्साह. एवढी ऊर्जा येते कुठून? वेळेचं गणित कसं साधता?
- अगर आपकी दिलसे, स्ट्राँग इच्छा हो तो आप ये कर सकते हो! ‘मला वेळ नाही, जमणार नाही’ म्हटलं तर काही होणार नाही. एकदा कमिटमेण्ट केली की ती मी पाळतोच. सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून एखादा कार्यक्रम घेतला आणि त्याच तारखेला एखादी ‘मोठी’ ऑफर आली तरी मी ते प्रलोभन टाळतो. आयोजकांना सांगून तारीख बदलण्याच्या फंदात मी पडत नाही. प्रत्येक कलाकारानं समाजाप्रती आपली काही कर्तव्ये आहेत याचं भान ठेवलंच पाहिजे. ब:याचदा कार्यक्रम छोटा असला तरी मी करतो. श्रोत्यांसाठी, संगीतप्रसारासाठी आपण हे केलं पाहिजे असं मला मनापासून वाटतं आणि मी करतोही.
वीणावादक, शास्त्रीय सुगम गायक, सॉफ्टवेअर इंजिनिअर ते पाश्र्वगायक-संगीतकार हा प्रवास कसा झाला?
- मी चार- पाच वर्षाचा असेन. एकदा आम्ही नातेवाइकांकडे गेलो होतो. त्यांच्याकडे असलेली वीणा मी उत्सुकतेने वाजवून पाहिली. माङया त्या उत्सुकतेचं आई-बाबांना आश्चर्य वाटलं आणि त्यांनी माझी आवड ओळखून मला ललिता व्यंकटरामन यांच्याकडे वीणा शिकायला पाठवलं. त्यानंतर टी. आर. बालमणी यांच्याकडे मी शास्त्रीय गायन शिकलो. स्व. श्रीनिवास खळे यांच्याकडून सुगम संगीताचंही मार्गदर्शन घेतलं. अर्थात हे सारं मी पाश्र्वगायक, संगीतकार वगैरे व्हायचं असं ठरवून केलं नव्हतं. ठरवून संगीत शिकणं योग्यही नाही. एकीकडे इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यावर ओरॅकलमध्ये जॉबही सुरू झाला. याच सुमारास संगीत की नोकरी हा पेच निर्माण झाला. आयुष्याचा महत्त्वाच्या वळणावर मी उभा होतो. त्यावेळी माझी भावी पत्नी संगीतानंही माङया निर्णयाला पाठिंबा दिला. सगळा गुंताच मग अलगद सुटला. तेव्हापासून ‘संगीत’ आणि ‘संगीता’ दोन्हीही माङया आयुष्याचे अविभाज्य भाग झाले. नोकरी सोडण्याचा धाडसी वाटणारा निर्णय घरच्या पाठिंब्यामुळेच घेतला. सुरुवातीला जिंगल्स केल्या. त्यानंतर सिनेमाच्या ऑफर्स येऊ लागल्या. 1997 मध्ये ‘दस’ चित्रपटासाठी लॉस व एहसान यांच्यासह मी संगीत दिलं. तेव्हापासून आमचं त्रिकुट घट्ट झालं. ब्रेथलेसमुळे गायक म्हणून मी घराघरांत पोहोचलो. ‘दस’ नंतर शूल, अरमान, दिल्लगी, मिशन कश्मीर, दिल चाहता है, डॉन 2, विश्वरूपम्, टू स्टेटस, भाग मिल्खा भाग ते आत्ताचा ‘दिल धडकने दो’ अशा चित्रपटांना आम्ही संगीत दिलं.
तुमचे ब्रेथलेस, नाईन असे अल्बम किंवा ‘:िहधून’ हा तौफिक कुरेशीबरोबरचा अल्बम खूपच लोकप्रिय झाला. पण हल्ली एकूणच प्रसिद्ध होणा:या गैरफिल्मी अल्बम्सची संख्या कमी झाली आहे. असे का?
- हल्ली गैरफिल्मी अल्बम काढण्यात कुणाला फारसं स्वारस्य राहिलेलं नाही. एखाद्या सुरपस्टारला घेऊन तुम्ही अल्बम केलात तर प्रमोटर्स पुढे येतात, पैसे मिळतात व तो श्रोत्यांर्पयत पोहचतो. ट्रेण्ड बदलतो आहे. फक्त पैशांचा प्रश्न नाही, पण आपण केलेलं काम श्रोत्यांर्पयत पोहचणार नसेल तर त्यात आम्हालाही समाधान नाही मिळत. त्यामुळे अल्बम्सची संख्या कमी झाली आहे. पण आता आम्ही आमचे गाणो यू टय़ूब, इंटरनेटच्या माध्यमाद्वारे थेट रसिकांर्पयत पोहचवू शकतो. त्यासाठी अल्बमचीही गरज राहिलेली नाही.
संगीत प्रसाराचे कार्य तुम्ही विविध कार्यक्रमांतून करतात, पण शंकर महादेवन डॉट कॉम या अकादमीद्वारेही संगीत शिक्षण दिलं जातं, त्याचं स्वरूप कसं आहे?
- माझा मित्र श्रीधर रंगनाथन यांच्यासह आम्ही ही ऑनलाइन अकादमी सुरू केली आहे. सुमारे 47 देशांचे विद्यार्थी इथे शिकतात. मुलांना कुठलीही गोष्ट गाण्याच्या, संगीताच्या माध्यमातून चटकन व चांगली कळते असं मला वाटतं. एखाद्या 5-7 वर्षाच्या मुलाला सणांची माहिती सांगताना नुसती माहिती दिली, तर त्याला कंटाळवाणो वाटेल. तेच गाण्यात गुंफून सांगितलं, तर तो चटकन आत्मसात करेल. याच थीमवर आधारित ‘ग्रो विथ म्युङिाक’ हा आमचा उपक्रम सुरू आहे. या अकादमीद्वारे आम्ही ऑनलाइन शास्त्रीय संगीत शिकवतो. ज्या शाळा पैसे द्यायला सक्षम आहेत त्यांच्याकडून फी घेतो आणि ज्यांना शक्य नाही त्यांना सवलत देतो. ‘क्रॉल, वॉक अॅण्ड रन’ या तत्त्वानुसार याची व्याप्ती वाढते आहे. ‘फोकस ऑन युअर म्युङिाक, रेग्युलर प्रॅक्टीस अॅण्ड पर्सेव्हरन्स कॅन डू वंडर्स’ हे अकादमीचं घोषवाक्य आहे.
स्टेजवर गाणं म्हणताना तुम्ही अनेकदा श्रोत्यांना सहभाग घ्यायला लावता, पण गायन-वादनात काहीवेळा ज्या नाजूक हरकती कान देऊन ऐकायला पाहिजेत तिथे श्रोते टाळ्या वाजवतात, त्याचा त्रस काही कलावंतांना होतो, तुमचं मत.
- अशा टाळ्या वाजवणं ही त्यांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया असते. काही नाजूक सुरावटी नि:स्तब्ध राहून ऐकायला हव्यात. पण कलाकार म्हणून त्याचा मला तरी त्रस होत नाही, व्यत्यय वाटत नाही. कुठल्याही कलाकाराला श्रोत्यांच्या टाळ्या प्रिय असतात. श्रोते आहेत, त्यांचं प्रेम मिळतंय म्हणून आपण आहोत असं मला वाटतं. क्रिकेटच्या मैदानावर समोरच्या बॉलकडे बघत मॅचच्या एखाद्या अटीतटीच्या क्षणी बॅटिंगसाठी सज्ज असतो, तेव्हा लाखो प्रेक्षकांच्या ओरडण्याचा त्याला त्रस होत नाही कारण तेवढी त्याची एकाग्रता असते. तसंच हे आहे.
पाश्र्वगायनाच्या क्षेत्रत येण्यासाठी संगीत शिकणं आवश्यक आहे का? हल्लीच्या झटपट प्रसिद्धी मिळवण्याच्या वृत्तीबाबत काय वाटतं?
- शास्त्रीय संगीत न शिकताही या क्षेत्रत यशस्वी होता येतं. काही असे कलाकार असतात, पण तुम्ही जर योग्य शिक्षण घेऊन आलेला असलात तर आपण जे करतोय ते अधिक आत्मविश्वासानं करू शकता. ही गोष्ट कुठल्याही क्षेत्रबाबत लागू होते. प्रसिद्धी मिळवण्यासाठी संगीत शिकणं हे अयोग्यच. हल्ली काहीजण असे ‘कॅल्क्युलेटेड’ असतात. स्पर्धेत भाग घेणं योग्य आहे, पण तोच उद्देश नको. स्पर्धाच्या संदर्भात माङो वडील म्हणायचे- पहिले बक्षीस मिळाले यात आनंद वाटायला हरकत नाही, पण आपलं काम, मेहनत अशी हवी की आपल्या पहिल्या बक्षिसात व दुस:या बक्षिसात निदान दहा पाय:यांचं तरी अंतर हवं. ते बायचान्स, थोडक्यात मिळालेलं नसावं, लखलखीत असावं.
सिद्धार्थच्या दिग्दर्शनात काम करताना कसं वाटलं, त्याचं काम कसं सुरू आहे.
- सिद्धार्थ फक्त 21 वर्षाचा आहे. त्याच्या संगीत दिग्दर्शनात ‘स्वप्न तुङो माङो’साठी पहिल्यांदा गाताना खूपच अभिमान आणि आनंद वाटला. ‘भाग मिल्खा’मधील ‘जिंदा’ या गाण्याने सिद्धार्थने गायक म्हणून सुरुवात केली. ‘शुगर सॉल्ट आणि प्रेम’, ‘वेलकम जिंदगी’ अशा मराठी चित्रपटांना तो संगीत देतोय. आयफा पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यानं काही विद्यार्थी, उद्योजक यांचे आगळे वेगळे शिबिरच घेतले. दोन तासात तिथल्या तिथे मिळालेले शब्द, सुरावट घेऊन त्यानं एक सुंदर गाणो तयार केले.
संगीताचं जीवनातलं स्थान.
- ‘म्युङिाक इज अ फ्रेंड’, संगीत तुमच्याजवळ असेल तर आयुष्यात तुम्हाला एकटं कधीच वाटणार नाही. निखळ आनंदासाठी संगीत शिकायला, ऐकायला हवं. संगीत कुठल्याही ‘भिंती’, धर्म, जात मानत नाही. आपणही संगीतात वेस्टर्न, हिन्दुस्तानी, कर्नाटक असा भेद मानायला नको. कलाकार तर संगीत शिकण्याबाबत नेहमी अतृप्त हवा. मी स्वत:ला नेहमीच विद्यार्थी मानतो. नवं शिकायला, प्रयोग करायला, अनोळखी वाटा शोधायला मला आवडतं. अशा वाटांवर काटे टोचण्याची, नाकावर आपटण्याचीही शक्यता असते. पण नंतर मिळालेलं यश निर्विवादपणो तुमचंच असतं. हल्ली प्रत्येक क्षेत्रत स्ट्रेस वाढलाय असं म्हटलं जातं. आम्ही उद्योजकांसाठी ‘लेट गो’ ही कार्यशाळा घेतो. व्यवसायातल्या अडचणी, ताण-तणाव, आपली पोङिाशन, स्टेटस हे सगळं विसरून सहभागी व्हायला सांगतो. कारण हे जपण्याच्या नादात आपण साध्या, निखळ आनंदाला पारखे होत असतो. या कार्यशाळेत आम्ही सांगतो- अपना मोबाइल, लॅपटॉप सब रखो बाजूमें, भूल जाओ अपना स्टेटस, पोङिाशन - ‘जरा गाओ यार’.
शब्दांकन : राधिका गोडबोले