शहरं
Join us  
Trending Stories
1
'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट
2
'...तर कमी लोक मेले असते', पहलगाममध्ये कुंकू पुसलं गेलेल्या महिलांबद्दल भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान
3
EPF News: 7 कोटींपेक्षा जास्त लोकांसाठी गुड न्यूज! केंद्र सरकारने पीएफवरील व्याजाची केली घोषणा
4
नाव ऐकून गुन्हेगारांना भरायची धडकी! नागपूरचे माजी पोलीस आयुक्त एस.पी. यादव यांचे मुंबईत निधन
5
वैष्णवी मृत्यु प्रकरण : 'कार, दोन पिस्तूल, चांदीची भांडी...' हगवणेंच्या घरून पोलिसांनी जप्त केलं घबाड
6
जिथं संधी मिळते तिथं तो 'बेस्ट'च देतो! टेस्टमधून डावललेल्या श्रेयस अय्यरनं पुन्हा दाखवली आपली ताकद
7
केरळजवळच्या समुद्रात बुडतंय परदेशी जहाज, तटरक्षक दलाने ९ जणांना वाचवले 
8
Mahayuti: छगन भुजबळ यांना काटशह देण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, राजकारण काय?
9
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
10
"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली
11
Sai Sudharsan: भारतीय संघात निवड झाल्यानंतर साई सुदर्शनची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
12
Crime: लग्न मोडल्याच्या रागातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या, घरात घुसून चिरला गळा
13
Karun Nair : रोहित-विराटच्या टेस्ट निवृत्तीनंतर आठवला 'त्रिशतकवीर'! आठ वर्षांनी कमबॅकची संधी
14
'धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन', मंत्री होताच छगन भुजबळांचे मोठे विधान
15
बंदूक नाही पण निलेश चव्हाणचा लॅपटॉप पोलिसांच्या हाती, आत सापडले… 
16
Mohammed Shami: इंग्लंड दौऱ्यासाठी मोहम्मद शमीची निवड का झाली नाही? अजित आगरकर म्हणाले...
17
मोठी अपडेट : वैष्णवी हगवणे प्रकरणात निलेश चव्हाण सहआरोपी, पोलिसांच्या हाती लागण्याची प्रतिक्षा कायम
18
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व
19
एक कोटी ८४ लाखांचे प्रकरण दाबवण्यासाठी गृह खात्याचे गुप्त आदेश; अनिल गोटेंचा आरोप
20
सिंधमध्ये पाकिस्तान सरकारला विरोध तीव्र, बेनझीर भुत्तोंच्या लेकीच्या ताफ्याला घेराव, लाठ्या काठ्यांनी हल्ला   

प्यारे वतन.

By admin | Updated: August 8, 2015 13:20 IST

हिंदीमध्ये ना देशभक्तीपर चित्रपटांची कमी आहे ना गाण्यांची. पण क्वचितच ही गाणी ऐकायला मिळतात. अशी बरीच गाणी आपण कर्मकांडाचा भाग बनवून टाकली आहेत. काही गाणी मात्र देशभक्तीची भावना अतिशय उत्कटतेने व्यक्त करतात.

विश्राम ढोले
 
येत्या शनिवारी आपला स्वातंत्र्यदिन. राष्ट्रप्रेम, राष्ट्रनिष्ठा, राष्ट्राभिमान वगैरे व्यक्त करण्याचा आणि अनुभवण्याचा आपला हक्काचा, औपचारिक आणि नैमित्तिक दिवस. हिंदी चित्रपटातील देशभक्तीपर गीते म्हणजे या जाहीर अभिव्यक्ती आणि अनुभवांचा अभिन्न भाग. सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा, ए मेरे वतन के लोगो, वंदे मातरम्, ये देश है वीर जवानों का वगैरे गाण्यांनी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीचे वातावरण भरून आणि भारून गेलेले असते. पण हे असे मोजके दिवस सोडले तर एरवी वर्षभर ही देशभक्तीपर गाणी आपल्या सार्वजनिक ध्वनी-आवरणात क्वचितच ऐकायला मिळतात. त्यातील अभिव्यक्ती आणि अनुभवावर दैनंदिन जगण्याची राख आणि धूळ जमा होत राहते. अशी बरीच गाणी आपण जणूकाही देशभक्तीच्या सार्वजनिक आणि जाहीर कर्मकांडाचा भाग बनवून टाकली आहेत. अशा कर्मकांडाचा भाग न झालेले पण देशभक्तीची एक वेगळी भावना अतिशय उत्कटतेने व्यक्त करणारे एक गाणो आहे- ‘काबुलीवाला’तील ‘ए मेरे प्यारे वतन..’
हिंदीमध्ये ना देशभक्तीपर चित्रपटांची कमी आहे ना गाण्यांची. पण ‘ए मेरे प्यारे वतन’ त्या सगळ्यांमध्ये खूप वेगळे ठरते. एकतर काबुलीवाला (1961) हा काही देशभक्तीपर चित्रपट नाही आणि ‘ए मेरे प्यारे वतन’ गाण्यालाही तशा अर्थाने भारताचा वगैरे संदर्भ नाही. खरंतर नुसते गाणो ऐकले तर या गाण्याला कोणत्याच एका विशिष्ट देशाचा संदर्भ नाही. पण चित्रपटाच्या कथेच्या चौकटीत मात्र हे गाणो अफगाणी पठाणाच्या वतनाचा संदर्भ घेऊन येते. काबुलीवालाची कथा गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांची. आपलं घरदार, छोटी मुलगी सोडून पोटापाण्यासाठी अफगाणिस्तान सोडून कोलकात्याला आलेला अब्दुर रेहमान खान (बलराज सहानी) आणि तिथे त्याला भेटलेली त्याच्याच मुलीच्या वयाची मिनी यांच्यातील भावबंधाची ही एक हृद्य कहाणी. वागण्याबोलण्याला रांगडा पण मनाने भाबडा पठाण मिनीमध्ये स्वत:च्या मुलीला बघत असतो. दोन भिन्न धर्माच्या आणि संस्कृतीच्या या जिवांमध्ये असे बाप-लेकीसारखे नाते निर्माण होत असतानाच खानकडून भावनेच्या भरात त्याच्या एका देणोक:याचा खून होतो. दहा वर्षाचा तुरुंगवास भोगून खान बाहेर येतो ते मिनीच्या त्या जुन्या आठवणी घेऊनच. त्याच्या आठवणीतील मिनी जरी लहागनीच राहिली असली तरी प्रत्यक्षात मात्र ती मोठी झालेली असते. तुरुंगातून सुटल्यावर ज्या दिवशी खान तिला भेटायला येतो तेव्हा तिच्या लग्नाची तयारी सुरू असते. मोठय़ा झालेल्या मिनीला बालपणीचे खानचाचा आठवतही नाहीत. आपली मुलगीही आता आपल्याला अशीच विसरून गेली असेल या जाणिवेने खान व्याकुळ होतो. तिला कधी भेटायला मिळेल की नाही याचीही शाश्वती नसते. मिनीच्या वडिलांना खानचे मुलीसाठी तळमळणारे बापाचे हृदय कळते. मिनीच्या लग्नासाठी साठविलेले पैसे ते खानला आपल्या वतनाला परत जाण्यासाठी देतात. मिनीही खानचाचाच्या मुलीसाठी आपले दागिने भेट म्हणून देते. आणि शेवटी परक्या वतनातल्या या हृद्य भावबंधाचा ठेवा घेऊन खान आपल्या वतनाकडे रवाना होतो. अनेक भावस्पर्शी प्रसंगांमधून दिग्दर्शक हिमेन गुप्ता यांनी काबुलीवालाची ही कहाणी अतिशय प्रत्ययकारी पद्धतीने उभी केली आहे. आपल्या मुलुखापासून दूर येऊन पडलेले अब्दुर रेहमानसारखे पठाण एका धर्मशाळेत राहत असतात. अशाच एका आठवणीच्या प्रसंगी त्यांच्यातील एकजण होऊन हे गाणो गातो- ‘ए मेरे प्यारे वतन, ए मेरे बिछडे चमन, तुझपे दिल कुर्बान’.  
या गाण्यातले वतन म्हणजे राजकीय सीमांनी बांधलेले, कायदेकानू आणि सरकारांनी परिभाषित केलेले नागरिकशास्त्रतील राष्ट्र नाही. इथले वतन म्हणजे माणसांचा, मानवी नात्यांचा, आपलेपणाचा एक भावनिक प्रांत आहे. रंग, गंध, रूपात जिवंत राहणारी, माणसासारखे शरीर अस्तित्व लाभलेली ती एक जिवंत संवेदना आहे. देशाला आईच्या रूपात बघण्याची उदाहरणो तर खूप सापडतात. या गाण्यातही ‘माँ का दिल बन के कभी सिने से लग जाता है तू’ असा उल्लेख आहेच. पण पुढच्याच ओळीत ‘और कभी नन्ही सी बेटी बन के याद आता है तू’ अशी व्याकुळता व्यक्त करत हे गाणो वतनाकडे पित्याच्या ममतेनेही बघता येते अशी विलक्षण सुंदर व दुर्मीळ दृष्टीही देते. आपलेपणाच्या अशा जिवंत प्रतीकांमधून गाण्यातले हे वतन आकाराला येते. हे वतनच व्यक्तीची आत्मप्रतिष्ठा असते आणि आकांक्षाही. त्याच्यापासून दूर जाणो क्लेशदायक असते. त्याच्या आठवणी सतत व्याकुळ करीत राहतात. म्हणूनच आपल्या सा:या भावनिक, सांस्कृतिक अस्तित्वाला आकार देणा:या  त्या मातीतच आपल्या शारीरिक अस्तित्वाचेही विसर्जन व्हावे असेही वाटत राहते. 
‘छोड कर तेरी जमीं को 
दूर आ पहुँचे है हम
फिर भी है येही तमन्ना 
तेरे जरें की कसम
हम जहाँ पैदा हुवे 
उस जगा ही निकले दम’’  
आपण जिथे जन्माला आलो, ज्या मातीने आपल्याला घडविले तिथेच आपला शेवट व्हावा. जगण्याचे वर्तुळ पूर्ण व्हावे ही आदीम सांस्कृतिक जाणीवच हे गाणो वतन या संकल्पनेच्या आधारे व्यक्त करीत राहते. म्हणूनच पडद्यावर जरी गाणो अनामिक पठाणावर चित्रित झाले असले, चित्रपटामध्ये त्याचा संदर्भ जरी अब्दुल रहेमान नावाच्या पात्रशी असला तरी त्यातील भावना देशाला, आपल्या वतनाला पारखे झालेल्या कोणाच्याही अस्सल मानवी भावना ठरतात. त्याला नावाचे, राष्ट्राचे, इतिहासाचे कुंपण लागत नाही.  
‘ए मेरे प्यारे वतन..’ मधील प्रेम धवन यांच्या साध्या-सोप्या पण अतिशय अर्थपूर्ण शब्दांना सलील चौधरींच्या संगीताचे कोंदण लाभले आहे. मेंडोलिनवर वाजवलेले अफगाणी वळणाचे तुकडे आणि तालवाद्यांची हळुवार साथ या पाश्र्वभूमीवर मन्ना डे यांचा सच्चा आणि हळवा सूर गाण्यातील वतन-विरहाची भावना कमालीच्या असोशीने श्रोत्यांपर्यंत पोहचवितो. पडद्यावरच्या मोजक्या हालचाली आणि बलराज सहानींचा संयत-सुंदर अभिनय यामुळे या गाण्यातील एक विलक्षण हळवा ठेहराव गडद होत जातो. शब्द, सूर, अभिनय आणि मुख्य म्हणजे आशयातील वेगळेपण या सा:याच निकषांवर ए मेरे प्यारे वतन खूप उंची गाठते. वैशिष्टय़पूर्ण ठरते.     
‘ए मेरे प्यारे वतन’ हे गाणो खूप वेगळे आहे. इथे ना देशाच्या नावाचा उल्लेख आहे, ना इतिहासाचा. तिथे ना कोणी दुश्मन आहे ना दोस्त. शौर्याचे आवाहन नाही की त्यागाचे. ना त्यात मोजून मापून आणलेली धर्मनिरपेक्षता आहे, ना बेतशुद्धपणो केलेला प्रांतिक अस्मितांचा गौरव. तिथे ना सांस्कृतिक प्रतीकांचा बडिवार ना थोरांचे दाखले. गाण्यातले वतन हे कोणत्या राजकीय अमूर्त संकल्पनेतून आकाराला येत नाही की ऐतिहासिक चिन्ह आणि प्रतीकांमधून. इथले वतन हा खोलवरचा व्यक्तिगत मानवीय अनुभव आहे. नात्यांतून साकारणारा, आपलेपणाच्या विणीतून घट्ट होणारा पट आहे. ‘स्व’ला घडविणा:या वतन नावाच्या सामूहिकतेबद्दल तिथे अभिनिवेष नाही तर कृतज्ञता आहे. त्या प्रेयस सामूहिकतेसाठी स्वत:च्या आवेशपूर्ण बलिदानापेक्षा त्यात स्वचे विसर्जन करण्याची इच्छा तिथे श्रेयस मानली गेलेली आहे. वतन म्हणजे आपल्या हक्काची, मालकीची जमीन नाही, तर आपल्या मुळ्या घट्ट करणारी माती आहे, असे हे गाणो खोलवर सुचवित राहते. अशा मातीतून उखडले गेल्यानंतर येणारी विवशता, तुटलेपण आणि असोशी व्यक्त करीत राहते. म्हणूनच पोटापाण्यासाठी किंवा इतर कारणांमुळे असे बेवतन होण्या:या जगभरातल्या कोणासाठीही ते वतनपरस्तीचे, देशप्रेमाचे गाणो ठरते. 
म्हणूनच एकाचवेळी असे अनेक वतन गुण्यागोविंदाने सामावून घेणा:या भारत नावाच्या राष्ट्राच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त याही देशप्रेमाच्या गाण्याचे स्मरण करणो उचित ठरावे.
 
‘काबुलीवाला’
- रवींद्रनाथ टागोरांच्या काबुलीवाला या मूळ बंगाली गोष्टीवर आधारित या चित्रपटाची निर्मिती केली होती विख्यात दिग्दर्शक व निर्माते बिमल रॉय यांनी, तर दिग्दर्शन केले होते हिमेन गुप्ता यांनी. यात काबुलीवाल्याच्या भूमिकेत होते बलराज सहानी तर इतर भूमिकांमध्ये उषा किरण, सज्जन, सोनू आणि बेबी फरिदा हे होते.
 
- काबुलीवालामधील ‘गंगा आए कहाँ से गंगा जाए कहाँ रे’ हेदेखील एक अतिशय सुंदर व लोकप्रिय गाणो. हेमंतकुमार यांनी गायलेले हे गीत गुलजार यांनी लिहिले होते. ‘नाम कोई बोली कोई लाखो रूप और चेहरे, खोल के देखो मनकी आँखे सब तेरे सब मेरे रे’ अशा शब्दात चित्रपटामध्ये हे गाणो काबुलीवाल्या खानला परमुलुखातील एकात्मतेचा परिचय देते. 
 
- 1961 च्या आधी काबुलीवालाच्या कथेवर तपन सिन्हा यांनी 1957 साली बंगाली चित्रपट काढला होता. 
 
(लेखक माध्यम, तंत्रज्ञान आणि संस्कृती या विषयाचे अभ्यासक आहेत.)
 
vishramdhole@gmail.com