शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची नवी खेळी! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
2
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
3
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
4
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
5
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
6
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
7
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
8
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
9
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
10
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
11
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
12
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!
13
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना पैसाच पैसा, धनसंचयात यश; पदोन्नती, गुंतवणुकीत मोठा फायदा!
14
हे रिअल शिंदे आहेत का? भर सभागृहात दुसरीत शिकणाऱ्या मुलीचा पालकांना प्रश्न, नेमके काय घडले?
15
बाळासाहेबांवर निष्ठा नसल्याने राऊतांवर पुस्तक काढण्याची वेळ : एकनाथ शिंदे
16
Ashish Ubale: 'गार्गी'चे दिग्दर्शक आशिष उबाळे यांची आत्महत्या, नागपूरमधील रामकृष्ण मठात घेतला गळफास
17
Income Tax Return : 'सहज' आणि 'सुगम' फॉर्म म्हणजे काय? आयटीआर भरण्यापूर्वी जाणून घ्या
18
सेक्स, ड्रग्ज, ब्लॅकमेलिंग...मस्क यांना अडकवण्याचा कट; माजी FBI अधिकाऱ्याचा दावा
19
२७७ प्रवाशांना घेऊन जाणारे मॅक्सिकन नौदलाचे जहाज न्यूयॉर्कच्या ब्रुकलिन ब्रीजला धडकले
20
बांगलादेशी तयार कपड्यांना भारतीय बंदरांची दारे बंद, परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाकडून अधिसूचना जारी

रंग

By admin | Updated: October 3, 2015 22:05 IST

बारा- साडेबारापर्यंत आपल्याला ताटकळत ठेवून जेवायच्या सुट्टीच्या किंचित आधी पेंटर महाराज त्यांची उर्वरित दोन माणसांची टीम घेऊन येई.

 - चंद्रमोहन कुलकर्णी (लेखक ख्यातनाम चित्रकार आहेत.)

 
बारा- साडेबारापर्यंत आपल्याला ताटकळत ठेवून जेवायच्या सुट्टीच्या किंचित आधी पेंटर महाराज त्यांची उर्वरित दोन माणसांची टीम घेऊन येई. (ह्या टीममध्ये हमखास एक वृद्ध आणि उरलेला अगदीच वयानं लहान! आपले मुख्य पेंटर महाराज मधल्या वयाचे.) हाताखालच्या त्या दोघांना अतिशय कमीतकमी शब्दांत आणि तुरळक सूचना देऊन मुख्य पेंटर महाराज लगेच निघून जाई. उरलेली ती दोघं घराचा ताबा घेत. देवघर आणि स्वयंपाकघरातल्या स्वयंपाकाच्या महत्त्वाच्या वस्तू सोडून बाकी सगळ्या वस्तूंची पेंटरच्या हस्ते पुनर्मांडणी होई. स्टूल, खुच्र्या, (गोदरेजची) कपाटं, ट्रंका, पलंग अशा सगळ्या स्थावर जंगम वस्तूंची इकडून तिकडे ओढाताण होई. निरनिराळ्या जागांवर त्या वस्तू पुन्हा पुन्हा ठेवून, सरकवून, शेवटी एकदाच्या त्यांच्या जागा फिक्स व्हायच्या.
ह्याला एकच महान अपवाद म्हणजे वडिलांचं ‘किट’! त्याला हात लावायची कुणाचीच हिंमत नसायची. त्यांच्या युनिफॉर्मला लावायचे पितळी बिल्ले, बटणं, क्लिपा, विशिष्ट परेडच्या दिवशी घालण्याचे विशिष्ट युनिफॉर्म, पायाला बांधण्याचं ते टिपिकल मिलिटरी ग्रीन कलरचं बॅण्डेज, तसल्याच हिरव्या रंगाचे गुडघ्यापर्यंतचे पायमोजे, त्यांचा तो खास झबा, दोनतीन टोप्या, दणदणीत आकाराचे अवजड बूट, त्या बुटाच्या पॉलिशच्या दोनचार (चेरी ब्लॉसम!!) डब्या, युनिफॉर्मची आणि टोप्यांची बटणं आणि बिल्ले, घासूनपुसून चकाचक करण्यासाठीच्या ‘ब्रासो’च्या डब्या आणि त्याबरोबरचे कॉटनचे तुकडे, प्रवासात जवळ बाळगण्याचे टॉर्च इथपासून ते भलं मोठं एखादं ब्लँकेट, एकदोन चादरी,  पोलीस खात्याची नोकरी करताना अत्यावश्यक अशा सरकारनं दिलेल्या ह्या अनेक छोटय़ामोठय़ा वस्तू ठेवण्याची एक मोठी, घनदाट काळ्या रंगाची चौरस आकाराची उंच पेटी (पेटी कसली, पेटाराच!) म्हणजे ‘किट’! पोलीस स्टेशनला मोठय़ा साहेबांची विशेष व्हिजिट असेल तेव्हा, किंवा सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्टच्या दिवशी, अशा वर्षातनं तीनचारच वेळांना ते किट पलंगाखालनं बाहेर काढलं जाई. एरवी वर्षाचे बाकीचे सगळे दिवस ते किट पलंगाखाली सरकवून ठेवलेलं असायचं. त्या किटला नानांव्यतिरिक्त इतर कुणीही हात लावलेला चालायचा नाही. अगदी आईनंसुद्धा! 
 
चैत्रगौर मांडताना किंवा क्वचितवेळी गौरीच्या (आईच्या भाषेत ‘महालक्ष्म्या’!) सजावटीच्या वेळी त्यांचा डोळा चुकवून आई आणि आम्ही मुलं आमच्या अंगात असेल नसेल तेवढा जोर लावून ती पेटी पलंगाखालून सरकवत सरकवत समोरच्या भिंतीपाशी आणायचो, आणि त्यावर एखादी छानशी रंगीत चादर किंवा लग्नकार्यात नेसायची एखादी रंगीत साडी पसरवून त्यावर करंज्या-लाडू आणि फराळाच्या बश्या वगैरे ठेवून आकर्षक सजावट करायचो. 
 
तर, ह्या किटचा अपवाद वगळता सगळ्या वस्तू एकदाच्या त्या त्रिसदस्यीय पेंटर टीमला अडचण होणार नाही अशा ठिकाणी एकदाच्या जाऊन बसल्या, की त्यावर कसलंतरी मोठ्ठं पांघरूण घालून ते सगळं झाकून टाकायचं आणि मग स्वयंपाकघरासहित सगळं घर पेंटरमंडळींच्या ताब्यात देऊन आपण घरातल्या मंडळींनी पेंटरच्या आश्रयाला गेल्यासारखं एका कोप:यात कुठंतरी बसून राहायचं. थोडय़ा वेळानं पेंटर महाराज धीमेधीमे घराचा पूर्ण ताबा घेत. अंगात असलेली नसलेली सगळी ताकद पणाला लावून सगळं घर खरवडून काढत. पाच वाजले, की घर आपल्या ताब्यात सोपवून दुस:या दिवशी ‘नऊला येतो’ असं सांगून अकराच्या पुढे हजर होत. भिंती घासायचा कालचा उर्वरित कार्यक्र म पुढे थोडासा कंटिन्यू करून पुढच्या टप्प्याला, म्हणजे पल्टीपुट्टी आणि भेगा बुजवणो इत्यादि बिनधुरळ्याचं काम पूर्ण दिवसभर चालायचं. हे काम करताना सकाळी अकरा- साडेअकराला आलेले जे तीन जण असायचे, त्यातला एकजण लगेचच गायब झालेला आणि दुपारी, उरलेल्या दोघांपैकी एक इतरत्र कुठेतरी गायब व्हायचा आणि मग एकच कामगारवजा पेंटर कसाबसा उरायचा आणि ते काम उरकायचा. 
 
मग तिसरा दिवस. 
तिस:या दिवशी खूपच महत्त्वाचं सामान घरात आणलं जाई; ते म्हणजे, रंगाचे पुष्कळसे आकर्षक पुडे, कसले कसले निरनिराळे ब्रश, आणखी एकदोन शिडय़ा किंवा घोडे आणि इतर बरंच काय काय सामान. आता घराला खरा ‘रंग’ यायचा. रंगकाम ही एक महाग आणि गंभीर आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, ह्याची त्या तिस:या दिवशी विशेष जाणीव व्हायची. पाहणी करून गेलेल्या मुख्य पेंटर महाराजांचा रु बाबही त्या दिवसानंतर जरा जास्तच वाढायचा. एरवीचा, बुधवार चौकात, गि:हाईक शोधत रस्त्याच्या कडेला उभा असलेला, डोक्याला पट्टी आणि अंगावर फाटके कपडे असलेला आणि कानावर केस असलेला हा रंगारी आता पेंटिंग कॉन्ट्रॅक्टरच्या भूमिकेत गेल्यासारखा वाटायचा, बढती मिळाल्यागत!
बढती मिळाल्यामुळे हा स्वत: प्रत्यक्ष काही काम करण्याऐवजी हाताखालच्या त्या दोघांना सतत ऑर्डरी सोडायचा. आज्ञापालन करत ते दोघे खाली मान घालून निमूटपणानं काम करत.
दोन दिवसांत घर लख्ख! घरातला एरवी पडणारा उजेड दुपटीनं वाढलेला वाटावा, इतकं लख्ख. 
 
(क्र मश:, उर्वरित भाग पुढील अंकी)