शहरं
Join us  
Trending Stories
1
'धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन', मंत्री होताच छगन भुजबळांचे मोठे विधान
2
Karun Nair : रोहित-विराटच्या टेस्ट निवृत्तीनंतर आठवला 'त्रिशतकवीर'! आठ वर्षांनी कमबॅकची संधी
3
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
4
बंदूक नाही पण निलेश चव्हाणचा लॅपटॉप पोलिसांच्या हाती, आत सापडले… 
5
Mohammed Shami: इंग्लंड दौऱ्यासाठी मोहम्मद शमीची निवड का झाली नाही? अजित आगरकर म्हणाले...
6
मोठी अपडेट : वैष्णवी हगवणे प्रकरणात निलेश चव्हाण सहआरोपी, पोलिसांच्या हाती लागण्याची प्रतिक्षा कायम
7
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व
8
एक कोटी ८४ लाखांचे प्रकरण दाबवण्यासाठी गृह खात्याचे गुप्त आदेश; अनिल गोटेंचा आरोप
9
सिंधमध्ये पाकिस्तान सरकारला विरोध तीव्र, बेनझीर भुत्तोंच्या लेकीच्या ताफ्याला घेराव, लाठ्या काठ्यांनी हल्ला   
10
IND vs ENG : इंग्लंड दौऱ्यासाठी कठोर मेहनत; १० किलो वजनही कमी केलं! पण... सरफराजला ते प्रकरण भोवलं?
11
धक्कादायक! ४० हजारांसाठी देशाशी गद्दारी; गुजरातच्या कच्छमधून पाकिस्तानी गुप्तहेराला अटक
12
फायद्याची गोष्ट! रिकाम्या औषधांच्या रॅपरचा मोठा उपयोग; गृहिणी करतात किचनमध्ये क्रिएटिव्ह वापर
13
इंटरनेटची सुविधा नाही, फोनही लागत नाही; भुयारी मेट्रोचा प्रवास ठरतोय त्रासदायक!
14
Varlin Panwar : वडील आर्मी ऑफिसर, लेकही होती IAF स्क्वाड्रन लीडर; आता प्रसिद्ध बॉलिवूड स्टार्सना देतेय ट्रेनिंग
15
वडिलांची झाली हत्या, मारेकऱ्यांना शिक्षा देण्यासाठी 'तो' झाला IPS; फी भरण्यासाठी विकलं धान्य
16
IND vs ENG : तो चांगला खेळतोय; पण...श्रेयस अय्यर कसोटी संघात का नाही? अजित आगरकर यांनी असं दिलं उत्तर
17
Rohit Pawar: समविचारी पक्ष सोबत आले तर ठिक, नाही तर...; रोहित पवार स्पष्टच बोलले
18
बिपाशाच का ही? अभिनेत्रीचा व्हिडिओ पाहून नेटकरी शॉक; एकेकाळची 'फिटनेस दिवा' आता...
19
Covid-19: चिंता वाढली! कळव्यात २१ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू
20
लग्नादरम्यान भर मंडपातून वराचं अपहरण, समोर आलं धक्कादायक कारण, कुटुंबीयांच्या तोंडचं पळालं पाणी  

दिंडय़ा परतताना..

By admin | Updated: August 1, 2015 16:05 IST

विठूरायाचे दर्शन घेऊन परतीच्या वाटेवर निघालेल्या वारक:यांच्या सोबतचा प्रवास

ज्या ईश्वराच्या दर्शनाला यावे, त्याच्या नगरीतल्या रस्त्यांवर ओसंडून वाहणा:या साबुदाणा खिचडीच्या रिकाम्या कागदी बशांचा कचरा टाकताना काही चुकीचे न वाटणारी बेलगाम माणसे भेटली, तसे कच:याचे ढीग उचलण्याला  तत्पर असलेले तरुण स्वयंसेवकांचे जथ्थेही! - आणि हेही दिसले, की सावकाशीने का असेना, चित्र बदलण्याला सुरुवात झाली आहे. न्यायालयाने लावलेल्या रेटय़ामुळे का असेना, जुन्या सवयींना मुरड घालण्याची निदान तयारी तरी जाणवते आहे.
ज्ञानोबा आणि तुकोबांचा गजर करत पंढरीच्या दिशेने ङोपावणारी दिंडीतली पावले अधिक स्वच्छ रस्त्यांवर पडतील,अशी आशा पंढरीच्या वाटेवर उगवली आहे.
 
 
- चन्नवीर भद्रेश्वरमठ
 
ज्यांना न घडे काशी,
त्यांनी जावे पंढरपुरासी.. 
असे म्हणतात.
विठूरायाच्या भेटीच्या ओढीने पंढरीच्या दिशेने निघालेल्या वारीबरोबर पावले पडतात सगळ्यांचीच!
- पण आषाढीचे दर्शन घेऊन झाले, की परत फिरणा:या वारक:यांना सोबत असते ती सवंगडय़ांचीच फक्त! सगळा लवाजमा घेऊन, डोईवरची बोचकी सावरत वारकरी घराच्या वाटेने परतीच्या प्रवासाला निघतात, तेव्हा त्यांचे स्वागत करून, त्यांचा पाहुणचार करून दमली भागलेली गावे दरुगधीचे लोट आणि कच:याच्या ढिगाखाली गुदमरत असतात, हे दरवर्षीचे चित्र.
ते फारसे कुणी पाहत नाही.
- म्हणून यावर्षी या परतीच्या वारीला निघालो.  आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री एकादशी अशा वर्षातून चार एकादशीच्या वा:या नियमाने करणारे वारकरी कमी नाहीत़ पण सर्वात मोठी वारी आषाढी एकादशीची़ नंतर कार्तिकी़ आषाढी एकादशीच्या निमित्ताने दरवर्षी सरासरी दहा लाखांहून अधिक भाविक जेमतेम सव्वा लाख लोकसंख्या असलेल्या पंढरपुरात येतात़ दशमी, एकादशी, द्वादशी या तीन दिवसांत सर्वाधिक गर्दी असते येथ़े आकडेवारी असते ती पददर्शन रांगेची. मुखदर्शन आणि कळस दर्शन करून परतणारे वेगळे. पण तेही येऊन जातातच! आषाढी वारीत दशमीच्या दिवशी आलेल्या पालख्या पौर्णिमेनंतर (काल्याच्या कीर्तनानंतर) परतीचे प्रस्थान ठेवतात़ या काळात किमान तीस टक्के वारकरी पंढरीत राहत असल्याने या काळात पंढरीच्या यंत्रणोवर प्रचंड ताण पडतो़ वारीनंतर पंढरपूर आणि परिसर दरुगधी, साथीचे आजार, अस्वच्छता, भरलेल्या कचराकुंडय़ा आणि तुंबलेल्या गटारी याच्या कचाटय़ात सापडतो. भूवैकुंठ म्हणून गौरविले जाणारे पंढरपूर संतांचे नव्हे, तर समस्यांचे माहेर होत़े 
ही परिस्थिती बदलावी म्हणून आता न्यायालयीन लढाया सुरू झाल्या आहेत. या बदलत्या दृष्टिकोनाचा परिणाम किती आणि कसा दिसतो, हे पाहावे म्हणून वारीनंतर पंढरपुरात थांबलो आणि भटकलो.
- दिसले ते हे, की चित्र बदलते आहे.
 वारकरी आणि पंढरपूरचे रहिवासी दोन्ही गटांना प्रश्न आहेत आणि उत्तरांचे काही पर्यायही सुचतात त्यांना.  
 
आषाढीनंतरची सकाळ.
गर्दीचा लोंढा उतरणीला लागलेला. चंद्रभागेच्या वाळवंटात बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथची सुरवसे मंडळी भेटली. अनंतराव, रामभाऊ आणि अशोक ही भावंडे आणि अनंतरावांचा मुलगा युवराज. त्यांच्या बोलण्यात बीड, जालना आणि परभणी जिल्ह्यातील भीषण दुष्काळाचा दाह जणू पेटला होता. पावसाने पाठ फिरवलेली, परतून तरी काय करायचे? - अशी हतबलता. हे कुटुंब गेल्या 17 वर्षापासून नियमित वारीला येते. यावर्षीइतक्या सुविधा याआधी कधीही नव्हत्या मिळाल्या म्हणाले सगळे.  
पालखी मार्गावरील शेवटचा विसावा वाखरी येथे असतो. माउली आणि तुकाराम या प्रमुख पालख्यांसह इतर पालख्यांचा पंढरीत प्रवेश होण्यापूर्वीचा शेवटचा मुक्काम वाखरीच्या पालखी तळावर होतो़ 
वाखरीला गेलो.
गावच्या वेशीवरल्या पारावर भारत बळीराम कांबळे, पीरसाहेब दस्तगीर मुजावर, भारत चांगदेव गायकवाड यांच्यासह काही बाहेरगावचे माउलीही बसले होत़े मंडळी समाधानी दिसली.
या गावातल्या सुमारे 32 एकरच्या या पालखी तळावर वारकरी विसावतात़ ऐन एकादशीच्या दिवशी व त्यानंतर या परिसरात दरुगधी, घाणीचेच थवे पसरणार आणि वारीनंतर वाखरीवाल्यांचा जीव पार गुदमरून जाणार हा आजवरचा अनुभव! पण यंदा हा त्रस खूप कमी झाला. प्रशासनाची सजगता आणि स्वच्छता पथकाच्या कारवाईच्या भीतीने वारकरी रांगेत थांबून शौचालयाचा वापर करताना दिसल़े हे गावाने पहिल्यांदाच पाहिले.
वाखरीचे सरपंच सनातन लोखंडे प्रशासनावर समाधानी दिसले. वारीनंतर दरवर्षी उलटी, जुलाब, डोकेदुखी, ताप, खोकला आणि श्वसनाच्या आजारांनी गावकरी त्रस्त होत असत़ यंदा मात्र या तक्रारींचे प्रमाण नगण्य असल्याचे लोखंडे सांगत होते. 
‘‘अहो, दरवर्षी चहाचे प्लॅस्टिकचे ग्लास, प्लॅस्टिकच्या बाटल्या, थर्माकॉल-पत्रवळीचा कचरा इतस्तत: पसरलेला असे. यंदा या कच:याचे ढिगा:यात रूपांतर  झाले, हे बरे नाही का?’’ -राजू धोत्रे, दीपक माने या तरुणांचा हा प्रश्न!
 
‘‘दिंडीत शिस्त पाळली जाते, तीच भावना भवतालच्या परिसराबद्दलही असली पाहिजे’’ - अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण सोनकांबळे नोंदवतात. दिलासा या गोष्टीचा, की या बदलासाठी स्थानिक तरुणाईही पुढे येताना दिसते. नगर- करमाळ्याहून आलेला सुमारे सत्तर तरुणांचा एक गट भेटला. सारे मिळून गोपाळपूर आणि दर्शनबारी परिसरातील कचरा उचलताना दिसले. बघता बघता या तरुण मंडळींनी सुमारे आठ टेम्पो भरतील एवढय़ा कच:याचे ढीग रचल़े नंतर या मंडळींनी आपला मोर्चा चंद्रभागेच्या वाळवंटाकडे वळवला. चहाचे प्लॅस्टिकचे कप, थर्माकॉलच्या प्लेटांचा खच उचलताना जो तो एकच सांगत होता, आम्ही करतो त्यात काहीही भव्य नाही, हे प्रत्येकानेच करायला हवे.
 
लातूर शहरालगतच्या धानोरा, बाभूळगाव, शिरसी इथून आलेले वारकरी वाळवंटात गोल बसून गप्पा मारताना भेटले. वारी हा त्यांच्यासाठी सोहळा नव्हे, ती जीवनपद्धतीच! त्यामुळे तक्रार नाही. अगदी अस्वच्छतेचीही तक्रार नाही. तरी यावर्षीची वारी ‘वेगळी’ होती असे  रंगराव सावंत, भामाबाई सावंत, ज्ञानोबा घोळवे या सगळ्यांनाच वाटत होते.
वेगळी म्हणजे काय? - तर स्वच्छ! कायद्याची भीती असलेली!
बोलता बोलता भामाबाई म्हणाल्याच, ‘‘हे पाहा, वारकरी पाचशे आणि संडास दहाच असतील तर कसं जमल? कोण थांबणाराय रांगेत?’’
 
 दरवर्षी लाखोंच्या संख्येत येणारे वारकरी पंढरपुरात अक्षरश: मिळेल तिथे राहतात. यावेळी मात्र 65 एकर क्षेत्रत ‘भक्तिसागर’ विकसित करण्यात आले होत़े राहुटय़ा, पिण्याचे पाणी, रस्ते, लाईट आणि स्वच्छतागृहांची सोय करण्यात आली होती़ चंद्रभागा नदीच्या पलीकडे ही व्यवस्था असल्याने साहजिकच वाळवंटाची स्वच्छता राखण्यास मदत झाली़ गर्दी विभागली गेल्याने प्रशासनावर ताणही जाणवला नाही़ या भक्तिसागर संकुलात घटना प्रतिसाद प्रणाली (इन्सिडेण्ट रिस्पॉन्स सिस्टीम)द्वारे प्रत्येक बाबीवर नियंत्रण ठेवण्यात यश आल़े या तळावर 4क्3 दिंडय़ांनी विसावा घेतला़ सुमारे एक हजार राहुटय़ांसह एक लाख 43 हजार वारक:यांची येथे राहण्याची व्यवस्था झाली़
जुन्नरचे श्रवण रामजी लांडे येथे भेटल़े तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील 46 क्रमांकाच्या दिंडीतले हे वारकरी़ ¨दडीतील 3क्क् जणांपैकी एकादशीच्या दर्शनानंतर 25क् वारकरी परतल़े तुकोबारायांना घेऊन उरलेल्यांबरोबर श्रवणकाका परतणार होते. ते म्हणाले, दरवर्षी मार्केट यार्डच्या मैदानात उतरत असू, यंदा इथे आलो़ छान झाले सगळे!
काही अंतरावर भजनात दंग माउली दिसल़े पुरुष वारकरी भजनात, तर महिला स्वयंपाकात मगA होत्या़ बीड जिल्ह्यातील वटनवाडी (आष्टी) येथील ही शिवशंकर प्रसन्न ¨दडी़ तीन दगडाच्या चुलीवर एक माउली भाकरी करत, तर इतर पाच-सात जणी तिच्याशी गप्पा मारत बसल्या होत्या़ वारीतल्या स्वच्छतेपेक्षा घरच्या दुष्काळाचे सावट प्रत्येकीच्या चेह:यावर! नांदेडचा गोविंद सूर्यवंशी हा तरुण भेटला़ त्याची ही तपपूर्ती वारी़ बारा वर्षातली ही सगळ्यात ‘बेष्ट’ वारी म्हणत होता.
 अगदी शेवटच्या टोकाला स्वच्छता पथकातील कर्मचारी उघडय़ावर जाणा:या माउलींना विनंती करताना दिसल़े. ‘शौचालयात जावा माउली, नाही तर दंड होईल.’ तीन शिफ्टमध्ये हा स्वच्छतेचा पहारा सुरू असल्याचे महादेव विठ्ठल आदापुरे, अनिल पांडुरंग अभंगराव, सुखदेव लक्ष्मण माने यांनी सांगितल़े
पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती (मार्केट कमिटी) परिसरात दिंडय़ा विसावतात. तिथे पाणी आणि शौचालयांची तात्पुरती व्यवस्था करण्यात येत़े या परिसरात उरलेले अन्न, भाजीपाल्याच्या कच:याचे ढिगारे तस्सेच होते. एकादशीच्या साबूदाण्याच्या खिचडीचे ढीगही दोन-तीन ठिकाणी दिसल़े 
 सफाई कामगारांची लगबग सुरूच होती. तरीही   वारीनंतरच्या खुणा जागोजागी उमटलेल्या. 65 एकराच्या परिघाबाहेर जागोजागी साचलेले कच:याचे ढीग वाट पाहत होत़े 
वारी संपली, आता कुणीतरी येईल!
 
विठूरायाच्या दर्शनासाठी बाहेरून ही लाखांची गर्दी पंढरपुरात येते तेव्हा पंढरपुरातले काही स्थानिक लोक मात्र सहली काढून बाहेर जातात, असा अलीकडचा वाढता ट्रेण्ड! शाळा आणि महाविद्यालयांना वारीकाळात सुटी असत़े ते निमित्त साधून मंडळी ट्रिपा काढतात. वारी काळातील धूळ, दरुगधी, संभाव्य साथीच्या आजारापासून संरक्षण आणि सहल. असे एका दगडात बरेच पक्षी!
 मंदिर परिसर आणि जुन्या पंढरपुरात राहणा:यांना वारीच्या गर्दीमुळे दैनंदिन कामासाठीही कसरत करावी लागते. घरातल्या खोल्या वारक:यांना भाडय़ाने देण्याचा व्यवसाय करणारी मंडळी आपल्या कुटुंबीयांना परगावी वा नातेवाइकांकडे पाठवितात़ वारी काळात पाऊस आला, तर दोन-तीन दिवसांसाठी निवासाची व्यवस्था करण्याचा हा व्यवसाय तेजीचा असतो़यावर्षीची वारी कोरडीच होती.
 
विठूरायाचे दर्शन घेऊन परतीच्या वाटेवर निघालेल्या या वारक:यांच्या बरोबरचा प्रवास पुष्कळ काही देऊन जाणारा होता!
देवाचे दर्शन झाले. त्यानंतर मग माणसाच्या वृत्तीप्रवृत्तींची बजबज पाहावी, तसा काहीसा अनुभव.
या गर्दीत विठूरायाच्या भेटीला येणा:या वारक:यांकडे केवळ ‘गर्दी’ म्हणून पाहण्याची व्यापारी वृत्ती दिसली, तशी ना ओळखीच्या ना पाळखीच्या कुणाला घासातला घास देण्याची दानतही! ज्या ईश्वराच्या दर्शनाला यावे, त्याच्या नगरीतल्या रस्त्यांवर हातातल्या केळीच्या साली आणि ओसंडून वाहणा:या साबूदाणा खिचडीच्या रिकाम्या कागदी बशांचा कचरा टाकताना काही चुकीचे न वाटणारी बेलगाम माणसे भेटली, तसे कच:याचे ढीग उचलण्याला तत्पर असलेले तरुण स्वयंसेवकांचे जथ्थेही!
- आणि हेही दिसले, की सावकाशीने का असेना, चित्र बदलण्याला सुरुवात झाली आहे.
न्यायालयाने लावलेल्या रेटय़ामुळे का असेना, जुन्या सवयींना मुरड घालण्याची निदान तयारी तरी जाणवते आहे. -आणि विठूरायाच्या नामघोषातून उमलणारे वर्षानुवर्षाचे अध्यात्म काळाबरोबर पुढे जात स्वच्छतेचा मंत्रही आत्मसात करताना दिसते आहे.
ज्ञानोबा आणि तुकोबांचा गजर करत पंढरीच्या दिशेने ङोपावणारी आणि विठूरायाचे डोळाभरून दर्शन करून माघारी परतणारी दिंडीतली पावले अधिक स्वच्छ रस्त्यांवर पडतील, अशी आशा पंढरीच्या वाटेवर उगवली आहे.
 
(लेखक ‘लोकमत’च्या सोलापूर आवृत्तीमध्ये 
उपमुख्य संपादक आहेत)
channavir@gmail.com