शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
6
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
7
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
8
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
9
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
10
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
11
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
12
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
13
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
14
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
15
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
16
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
17
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
18
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
19
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
20
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!

असोशी.

By admin | Updated: March 12, 2016 15:01 IST

एखादा पलटा बिनचूक म्हटला की खूप कौतुक यायचे माझ्या वाटय़ाला. पण शंभर वेळा एखादा पलटा म्हणताना त्याची जी एक हलणारी, पण स्थिर वाटणारी आकृती दिसायची ना, ती बघताना तंद्रीच लागायची. अभिषेकी बुवांनी एक मुखडा शिकवला. तो म्हणताना इतकी तंद्री लागली की किती वेळ म्हणतोय याचे भानच नव्हते. संगीताकडे नेणारा पहिला टप्पा ओलांडला की ओढ लागते ती त्या स्वरांच्या पलीकडे असलेले जग बघण्याची. तिथून साधनेला सुरुवात होते.

 
पूर्वार्ध
रियाज वगैरे शब्दही कधी माझ्या कानावर पडले नव्हते आणि ते पडण्याचे वयही नव्हते तेव्हा माङया आयुष्यात स्वर आले. माझ्या आईमुळे. माझी आई, मीनल ही संगीत विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेली पण तिचे संगीतप्रेम असे केवळ भिंतीवर लावण्यासाठी पदवी घेण्यापुरते नव्हते. त्याला जोड होती चोख रियाजाची आणि तोही वीणा सहस्त्रबुद्धे यांच्यासारख्या बुद्धिमान गुरूच्या मार्गदर्शनाखाली होणा:या रियाजाची. या अर्थाने, संगीत हे माङया गुणसूत्रंमध्येच होते. आईने ते माङया रोजच्या जगण्यात आणले आणि आनंदाचे एक सशक्त बीज माङया आयुष्यात पेरले.  मोठय़ा हुशारीने. 
लहान मुलाला दामटून अभ्यासाला बसवावे आणि मानेवर पट्टी ठेवून पाढे पाठ करायला लावावे अशी मारकुटय़ा मास्तरांची शिकवणी कधीच माङया वाटय़ाला आली नाही. किंबहुना मी काही नवे, वेगळे शिकतोय हेच मला तिने कळू दिले नाही. ती मला तिच्या शेजारी बसवायची आणि म्हणायची, आपण एक खेळ खेळू या. मी एक सरगम म्हणते, तू त्याचे स्वर ओळखून दाखवायचे, मग तो राग ओळखून दाखवायचा. कधी ती एखादी बंदिश म्हणायची. मला त्याचा ताल ओळखण्याचे आव्हान असायचे. कधी कधी माङया हुशारीचे कौतुक म्हणून मला अतिशय प्रिय असे गारेगार ‘कस्टर्ड’ मिळायचे किंवा तेव्हा सहसा लहान मुलांना न मिळणारी नेस कॉफी..! 
शास्त्रीय संगीत वगैरे भले मोठे काही न म्हणता मला स्वरांचा असा लळा लावणा:या, जिगसॉ पझलचे तुकडे उलटे-पालटे करून नवे पझल बनवावे तसे स्वरांशी कोडी घालायला-उकलायला शिकवणा:या आईने मला संगीताच्या वाटेवरील पहिल्या मुक्कामावर सहजपणो आणून ठेवले. 
त्या वयात मी ते जे काही करीत होतो त्यालाच रियाज म्हणतात हे मला आता, मी गुरू झाल्यावर समजते आहे!. एखादा साधा दिसणारा पाच-सहा स्वरांचा पलटा बिनचूक, दाणोदार स्वरात म्हणता यायला लागला आणि तो अगदी सहजतेने शंभर वेळा म्हणून दाखवला की खूप कौतुक यायचे माङया वाटय़ाला. पण हळूहळू मला त्या कौतुकापेक्षा एका वेगळ्याच गोष्टीचे वेड लागले. शंभर वेळा एखादा पलटा म्हणताना त्याची जी एक हलणारी, पण स्थिर वाटणारी आकृती दिसायची ना, त्याचे..! ती बघताना जी तंद्री लागायची तशी मनाची एकाग्र अवस्था एरवी कधीही अनुभवायला येत नसे.. 
अभिषेकी बुवांकडे माङो शिक्षण सुरू झाले तेव्हाची ही आठवण आहे. तोडी रागाच्या ख्यालाचा मुखडा त्यांनी शिकवला आणि तो घोटायला सांगितला. तो म्हणताना इतकी तंद्री लागली की तो किती वेळ म्हणतोय याचे मला भानच नव्हते. काही वेळानंतर गुरुजी आले आणि आमची बंदिश पुढे गेली. संगीताची आवड लागणो, ते म्हणावेसे वाटणो हा संगीताकडे नेणारा अगदी पहिला टप्पा ओलांडला की ओढ लागत असते ती त्या स्वरांच्या पलीकडे असलेले जग बघण्याची. तिथून साधनेला सुरुवात होते. हे जग विविध स्वभाव-विभाव असलेल्या रागांचे, त्या स्वभावार्पयत पोहचण्याचा मार्ग दाखवणा:या डौलदार, नखरेल बंदिशींचे, तबल्याच्या ठेक्याचे आणि स्वर-लयींच्या अद्भुत नात्याचे. हे एक असे अफाट जग जिथे क्षणोक्षणी सौंदर्याचे रूप बदलते. घाट बदलत असतात आणि तरी आणखी काही वेगळे आकार निर्माण करण्याची असोशी मनात असते. या प्रयत्नात जे काही निसटते, चुकते ते दुरु स्त करणो आणि नव्याचा शोध घेत राहणो म्हणजे मला वाटते रियाज. आणि हा रियाज फक्त गळ्यापुरता नसतो, तर त्यासाठी सतत खूप, त:हेत:हेचे, सीमेच्या अल्याडचे आणि पल्याडचे असे संगीत सतत ऐकावेही लागते. प्रत्येक कलाकार जेव्हा गायन-वादन करण्यासाठी बसतो तेव्हा त्या रागाचा कोणता नकाशा आहे? त्यांच्या मनात असलेला हा नकाशा दाखवण्यासाठी कोणत्या वाटा त्याने निवडल्या आहेत आणि कोणत्या मागे टाकल्या आहेत हे सतत बघत-निरखत असताना आपल्या मनात त्या रागाचा आपला नकाशा दिसू लागतो, त्याकडे जाण्याचा स्वत:चा असा खास रस्ता सुचू लागतो. 
माझा हा सगळा प्रवास अभिषेकी बुवांकडे सुरू झाला. अभिषेकी बुवांनी मला केवळ स्वरज्ञान आणि स्वरांकडे बघण्याची नजरच दिली असे नाही, तर एखाद्या विषयाचा अभ्यास कसा करायचा त्याचे धडे आपल्या वागण्यातून दिले. मला आठवतेय, गोव्यामध्ये झालेल्या कीर्तन संमेलनाचे ते अध्यक्ष होते. स्टेजवर बसून ख्याल, ठुमरी गाणा:या कलाकाराचा आणि कीर्तनाचा काय संबंध असा प्रश्न मनात येण्यापूर्वीच त्यांची तयारी सुरू झाली. कीर्तनाचा इतिहास, त्याचा उद्देश, त्यातील प्रकार, त्यात असलेले संगीताचे स्थान आणि महत्त्व यावर विचार ते करीत होते. पण त्यासाठी लागणारे संदर्भ, टिपण त्यांनी सांगितलेल्या पुस्तकातून, पोथ्यांमधून शोधणो आणि लिहिणो हे मात्र माङो काम होते. पण आता असे वाटतेय, त्याला काम कसे म्हणू मी? ते माङोही एक प्रकारे शिक्षणच होते किंवा बौद्धिक रियाज. या बुद्धीच्या रियाजात मला जगण्यातील इतर घटकांशी असलेले संगीताचे नाते समजत होते आणि त्या घटकांशी संगीत कसे जोडून घ्यायचे त्याचे प्रात्यक्षिकही मिळत होते. गोव्यातील त्या कीर्तन संमेलनात मी स्टेजवर गुरु जींच्या मागेच बसलो होतो. त्या अनुभवाचा किती खोलवर ठसा माङया मनावर उमटला आहे याचा प्रत्यय मला आत्ता, 2क्14 साली जेव्हा मी आणि अॅना शुल्त्झ असा दोघांनी मिळून कीर्तनावर एक कार्यक्रम केला तेव्हा आला! अॅना ही दक्षिण आशियातील संगीताचा अभ्यास करणारी एक अमेरिकन युवती. संगीत आणि राष्ट्रवाद, संगीत आणि आध्यात्मिक अनुभव यावर आणि अशा विषयावर संशोधन करणारी. आमची गाठ पडली तीच मुळी ‘संगीत’ या समान दुव्यामुळे; जी आम्हाला एका कार्यक्रमापर्यंत घेऊन गेली. हा कार्यक्र म होता कीर्तनाचा; ज्यामध्ये मी चक्क कीर्तनकार बुवा झालो अन् आम्ही त्यात कीर्तन, त्यातील वारकरी आणि नारदीय परंपरा, त्यात येणा:या साकी, दिंडी, आर्या या संगीत प्रकारांवर बोलतो, गातो. ‘सॉँग ऑफ द डिव्हाइन’ असे शीर्षक देऊन इंग्लिशमध्ये आणि अन्य वेळी मराठीमध्ये बोलत आम्ही पूर्वरंग-उत्तररंग रंगवतो. 
या कार्यक्र माची तयारी सुरू असताना मला क्षणोक्षणी माङया गुरूंबरोबर केलेल्या अभ्यासाची आठवण येत होती. त्यावेळी रु जलेल्या बीजाला फुटलेले ते रसरशीत धुमारे बघणो हा एक विलक्षण अनुभव होता. आणि असाच अनुभव मग मला दिला तो कबीराने.. 
पण त्याविषयी पुढील लेखात.  
 
 
संगीताचा अखंड प्रवाह.
माझा सगळा प्रवास माङया गुरूंकडे सुरू असलेल्या शिक्षणाच्या वेळी सुरू  झाला. महत्त्वाचे म्हणजे, मी अभिषेकी बुवांकडे शिकत होतो याचा अर्थ त्यांच्याकडे  गाण्याच्या क्लासला जात नव्हतो! रोजच्या जगण्यातील असा एखादा तुकडा संगीताच्या नावाने काढून ठेवायचा हेच मुळी त्यांना मान्य नव्हते आणि त्यामुळेच असेल बहुधा ‘क्लास’ ही संकल्पनाच त्यांना मंजूर नसावी. त्यांनी शिष्य निवडले होते ते त्यांच्या घरी चालणा:या गुरु कुलात राहणारे. इथे अखंड संगीतावर विचार, चिंतन, संवाद आणि सराव सुरू असायचा. घरात राहणारे शिष्य आणि त्यांचे शिक्षण हा त्या घराच्या जगण्याचा एक अविभाज्य भाग होता. आणि त्यामुळेच मीही. शाळा-कॉलेजची वेळ वगळता मी त्या अखंड वाहत असलेल्या प्रवाहात सामील व्हायचो. 
 
मुलाखत आणि शब्दांकन
- वन्दना अत्रे
 
vratre@gmail.com