शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

घरापासून अर्ध्या तासावर आग पोहोचते, तेव्हा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 06:05 IST

विस्तीर्ण, हिरवागार ऑस्ट्रेलिया. कांगारूंचा, समुद्राच्या फेसाळ लाटांचा, सोनेरी वाळूचा देश. इथे राहण्याचं स्वप्न पाहताना कधीच मनात आलं नाही की इथेही नैसर्गिक आपत्ती ओढवू शकते.

ठळक मुद्देघरापासून अध्र्या तासाच्या अंतरावर जेव्हा आग पोहोचली, तेव्हा मात्र काळजाचा ठोका चुकला.

- डॉ. प्राजक्ता साठे-वैद्य

ऑस्ट्रेलियात बस्तान बसवायच्या तयारीने नवरा व मुलं यांना घेऊन थेट महाराष्ट्रातून ऑस्ट्रेलियाला (मेलबर्न) आलेली स्नेहल ही तरुणी. विस्तीर्ण, हिरवागार ऑस्ट्रेलिया. कांगारूंचा, समुद्राच्या फेसाळ लाटांचा, सोनेरी वाळूचा देश.इथे राहण्याचं स्वप्न पाहताना कधीच मनात आलं नाही की इथेही नैसर्गिक आपत्ती ओढवू शकते. अजून इथे कायमस्वरूपी नोकरी नाही, व्हिसाही दीर्घकालीन नाही, अशात वणवे पेटले. स्नेहलच्या मनात सगळ्यात आधी विचार आला, ‘हा देश सधन, सक्षम आहे सरकार पाहून घेईल.’मात्र घरापासून अध्र्या तासाच्या अंतरावर जेव्हा आग पोहोचली, तेव्हा मात्र तिच्या काळजाचा ठोका चुकला. हवेत पुष्कळ धूर व जळक्या लाकडाचा वास पसरला, मग वाटू लागलं की आपण आता भारतात असतो तर? एका हाकेसरशी आपले नातेवाईक, आप्तेष्ट धावत आले असते. घर वणव्यात सापडलं तर कुठे जायचं, हा प्रश्न भारतात तुलनेनं सोपा होता. कितीतरी दारं आपल्यासाठी आनंदानं उघडी असणार होती.बरं, इथे शेजारही अनोळखी. काय होतं आहे ते समजण्यासाठी ऑनलाइन माहितीवर काटेकोर नजर ठेवणं हाच एक मार्ग. आता मात्र घालमेल झाली. इथपर्यंत यायला आपण किती कष्ट, किती खर्च केला ! आपला निर्णय चुकला का?.इथे फार परकं वाटतंय, असं जाणवलं. टीव्हीवर सतत एकच विषय.. ‘बुशफायर’ ! या वणव्यांमध्ये सापडलेले, जीव गमावलेले प्राणी, नेसत्या वस्रानिशी गाव सोडून निघालेली माणसं त्याचबरोबर घरदार वार्‍यावर सोडून अनोळखी लोकांसाठी रात्रंदिवस प्राण पणाला लावणारे अग्निशामक दलातले स्वयंसेवक हे सारं पाहून रडू कसंबसं आवरलं. त्याचक्षणी प्रत्यय आला की इथली संकटं आता ‘आपली’ वाटत आहेत. आपणही या देशाचा एक घटक आहोत. भारतात घडलेल्या दुर्घटना ऐकून, जसा काळजाला चटका बसतो, अगदी तसाच या आगीनंही बसतो आहे.. संकटातून तावून-सुलाखून या देशाशी आपलं नातं अजून घट्ट झालं आहे.- डॉ. प्राजक्ता साठे-वैद्यमेलबर्न, ऑस्ट्रेलियाprajaktasvaidya@gmail.com