शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.ला योजनेतून डावलले

By admin | Updated: April 23, 2015 05:01 IST

सत्तेचे विकेंद्रीकरण झालेले असतानाही कोट्यवधीच्या योजना केवळ मंत्री व अधिकाऱ्यांभोवती कशा केंद्रित आहेत, याचा प्रत्यय समाजकल्याण विभागाच्या सौर पथदिव्यांच्या योजनेत येत आहे.

पुणे : सत्तेचे विकेंद्रीकरण झालेले असतानाही कोट्यवधीच्या योजना केवळ मंत्री व अधिकाऱ्यांभोवती कशा केंद्रित आहेत, याचा प्रत्यय समाजकल्याण विभागाच्या सौर पथदिव्यांच्या योजनेत येत आहे. कोट्यवधी रुपयांची ही योजना जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींना डावलून केवळ प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. सरपंचांचा योजनेत सहभाग आहे; पण केवळ गावात सौरदिवा बसला, ही पोचपावती देण्यापुरता! राज्यातील दलितवस्त्यांत योजनेंतर्गत १ लाख ९३ हजार २४२ सौर पथदिवे बसविले जात आहेत. त्यातील एका दिव्याची किंमत १७ हजार रुपये आहे. ३४० कोटी रुपयांच्या योजनेत जनतेचा सहभाग काय, याचे उत्तर मात्र धक्कादायक आहे.योजनेची अंमलबजावणी केवळ समाजकल्याण मंत्री व अधिकारी स्तरावर सुरू आहे. योजनेसाठी समाजकल्याण उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक जिल्ह्णात समिती नेमण्यात आली आहे. सदस्यांमध्ये जिल्हा परिषदांचे समाजकल्याण अधिकारी, विभागाचे सहायक आयुक्त, सहायक संचालक (लेखा), समाजकल्याण अधिकारी वर्ग-२ असे सर्व अधिकारी मंडळीच आहेत. समाजकल्याण विभागाने ठरविलेल्या पुरवठादारांना मान्यता देणे, दलितवस्त्यांची निवड करून तेथे दिवे बसवून घेणे, दिव्यांची पाच वर्षे देखभाल ठेवणे ही सर्व कामे समितीकडे सोपविण्यात आली आहेत. वरिष्ठांनीच योजना आखलेली असल्याने समितीचे सदस्य योजनेतील उणिवांबाबत बोलणार तरी कसे?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दिव्यांच्या देखभालीसाठी ही समिती गावांचा दौरा करेल का, हाही एक प्रश्न आहे. वास्तविक सौरदिवे ग्रामपंचायतीच्या हद्दीत बसविले जात आहेत. मात्र, वस्त्यांची निवड व देखभाल यात जि. प., सरपंच अथवा ग्रामसभेचा कोणताही सहभाग नाही. सौरदिवा ३० दिवस चालू होता, असे एक प्रमाणपत्र केवळ सरपंच अथवा ग्रामसेवकाकडून घेतले जात आहे. येथेही सरपंचाला ग्रामसेवक हा पर्याय देण्यात आला आहे.तपासण्यांचे अहवालच नाहीत योजनेच्या अंमलबजावणीसाठीच्या समितीत केवळ अधिकारीच का? समितीचे निकष काय?, असे प्रश्न ‘लोकमत’ने माहिती अधिकारात समाजकल्याण आयुक्तालयाला विचारल्यावर एकाही प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही. योजनेचे दोन वर्षांचे तांत्रिक व क्षेत्रीय तपासण्यांचे अहवाल मागविले असता ते सुद्धा आयुक्त कार्यालयाकडे उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. योजनेचे नियम कुणी व कसे ठरविले? तसेच योजनेची तपासणी होत आहे का? असे प्रश्न त्यामुळे निर्माण झाले आहेत. (प्रतिनिधी)