नाशिक/जळगाव : बिहारमध्ये दारूबंदी करण्यात आली असली तरी महाराष्ट्रात मात्र आर्थिक उत्पन्नाचे ते मोठे स्त्रोत असल्याने सध्या बंदी घालता येणार नाही, असे मत महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले. राज्यावर दोन लाख ३८ हजार कोटी रुपयांचा बोजा आहे, त्यातच अनेक कल्याणकारी योजनांसाठी तरतूद करावी लागणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देण्यासाठी १५ हजार कोटी रुपयांची गरज आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना मदत, दुष्काळ निवारण अशा विविध योजनांसाठी निधीची तरतूद करावी लागते, असे त्यांनी सांगितले.गेल्यावर्षी मद्यावरील कराच्या माध्यमातून १८ हजार कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. (प्रतिनिधी)राज्यात यापूर्वी गडचिरोली, वर्धा यासह काही ठिकाणी दारूबंदीचा निर्णय झाला. तेथे अंमलबजावणीची काय परिस्थिती आहे, हे तपासून बघू. आंध्र प्रदेशात दारुंबदी झाली होती. मात्र अवैध, बनावट तसेच गावठी दारू विक्रीचे प्रकार वाढून अनेकांचे मृत्यू झाल्याने त्यांनी निर्णय मागे घेतला. सर्व बाबी तपासून राज्यात दारूबंदीचा निर्णय घेतला जाईल.- एकनाथ खडसे, महसूल मंत्री
‘राज्यात दारूबंदी तूर्तास अशक्य’
By admin | Updated: November 28, 2015 02:02 IST