शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

युवराजांचे स्वप्न... आणि भाजपाचा टोला!

By admin | Updated: July 1, 2016 02:40 IST

मुंबईत सत्तेवर असतानाही मित्रपक्षाच्या खेळीमुळे शिवसेना युवराजांना आपले स्वप्न साकार करणे शक्य होत नव्हते़

मुंबई : मुंबईत सत्तेवर असतानाही मित्रपक्षाच्या खेळीमुळे शिवसेना युवराजांना आपले स्वप्न साकार करणे शक्य होत नव्हते़ मात्र केंद्रीय मंत्रिमंडळानेच २४ तास दुकाने, मॉल्स, रेस्टॉरंट्स सुरू राहण्यास हिरवा कंदील मिळाला आहे़ केंद्रानेच या कायद्याला मंजुरी दिल्यामुळे या प्रस्तावाला विरोध करणाऱ्या राज्यातील भाजपा नेत्यांचे धाबे दणाणले आहे़ मात्र रात्रीचा बाजार आणि रात्रीचा व्यापार यातील फरक केंद्राने मंजूर केलेल्या कायद्यात असल्याचा टोला हाणत भाजपाने शिवसेनेला डिवचले आहे़शिवसेनेची सावध भूमिकायुवराजांचे स्वप्न पूर्ण होत असल्याने याबाबत आता शिवसेनेने तलवार म्यान करीत मित्रपक्षाबाबत काहीही बोलणे टाळले़ हा निर्णय स्वागतार्ह असून, युवासेनाप्रमुखांची ही संकल्पना होती, अशी प्रतिक्रिया सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी दिली़ भाजपा नेत्यांनी मात्र शिवसेनेला टोले लगावण्याची यानिमित्ताने आलेली संधी दवडलेली नाही.रात्रीचा बाजार आणि रात्रीचा व्यापार यातील फरक या कायद्याने दाखविला असल्याचा टोला भाजपाचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांनी शिवसेनेला लगावला आहे़ दुष्परिणाम़़़यामुळे नागरी सुविधांवर ताण पडेल़ पाणीपुरवठा, स्वच्छता, मलनिस्सारण, सुरक्षा अशा समस्या यामुळे निर्माण होणार आहेत़ त्यामुळे आधीच या सर्व समस्यांचा सामना करणाऱ्या पालिकेवर याचा अतिरिक्त ताण येणार आहे़ मात्र याबाबत कोणतेही नियोजन पालिकेकडे सध्या नाही़ यासंदर्भात पालिका आयुक्त अजय मेहता यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देणे टाळले़ तर राजकीय पक्षांनी मात्र यामुळे ताण पडला तरी तो शहराच्या विकासासाठीच असेल़ यातून राज्य सरकार आणि पालिकेच्या उत्पन्नात वाढ होईल, असा दावा शिवसेना आणि भाजपा नेत्यांनी केला आहे़