शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

छेडछाडीतून युवकाचा खून

By admin | Updated: May 12, 2014 00:10 IST

गेवराई(बीड) : तालुक्यातील खांडवी येथे मुलीच्या छेडछाडीतून दिलीप रघुनाथ शेजूळ (२०) या युवकाला शनिवारी दुपारी लाठ्या- काठ्याने मारहाण करण्यात आली.

गेवराई(बीड) : तालुक्यातील खांडवी येथे मुलीच्या छेडछाडीतून दिलीप रघुनाथ शेजूळ (२०) या युवकाला शनिवारी दुपारी लाठ्या- काठ्याने मारहाण करण्यात आली. उपचारादरम्यान रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाला. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, तिघांविरुद्ध फिर्याद दाखल झाली असून पोलिसांनी खांडवीत बंदोबस्त वाढविला आहे. सतीश ऊर्फ राजाभाऊ बाबासाहेब झिंगरे, ऋषिकेश महादेव झिंगरे, राहुल सुदाम झिंगरे (तिघे रा. खांडवी) यांनी शनिवारी दुपारी घरात घुसून दिलीपला छेडछाडीचा जाब विचारला. दिलीप व या मुलीचे घर आजूबाजूला आहे. ते आपसात नातेवाईक आहेत. ‘माझ्या बहिणीचा हात का धरला होतास? तू मस्तीस आला आहेस का?’ असे म्हणत त्यांनी लोखंडी गज, काठी व लाथा -बुक्क्यांनी त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या दिलीपला काही व्यक्तींनी गेवराई उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्रकृती आणखी खालावल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. रात्री ११ वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी आसराजी एकनाथ शेजूळ यांच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध गेवराई ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तिन्ही आरोपी फरार असून निरीक्षक सुरेंद्र गंधम तपास करीत आहेत़ खांडवीत फौजफाटा तैनात या घटनेनंतर खांडवीत पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. रविवारी दिवसभर गावात फक्त पोलीसच दिसत होते. दिलीपच्या पार्थिवावर सकाळी अकरा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गावात तणाव होता.