शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

विमा कार्यालयात युवतीची आत्महत्या

By admin | Updated: June 24, 2016 00:42 IST

मूर्तिजापूर येथील घटना.

मूर्तिजापूर (जि. अकोला): येथील भारतीय जीवन विमा कार्यालयात एका २५ वर्षीय युवतीने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना २३ जून रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. मूर्तिजापूर येथील भारतीय जीवन विमा कार्यालयात कार्यरत असलेली माना येथील रहिवासी सुजाता कोकणे (२५) ही युवती दुपारी ३ वाजताच्या सुमारास कार्यालयात आली. बराच वेळ बसून राहिल्यानंतर तिने स्वच्छतागृहात जाऊन विष प्राशन केले. त्यानंतर कार्यालयातील सोफ्यावर येऊन बसल्यानंतर तिला वांती झाली. त्यानंतर तिच्या नाका-तोंडातून फेस येत असल्याचे पाहून शाखाधिकारी अलोणे यांनी त्याबाबत पोलिसांना तत्काळ कळविले. तसेच वरिष्ठांना सूचना दिल्या. सुजाता हिची गंभीर प्रकृती पाहता तिला तत्काळ लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. सदर तरुणीने त्याच कार्यालयात कार्यरत एका अधिकार्‍याविरुद्ध लैंगिक शोषण केल्याबाबत तक्रार केली होती. तसे १८ नोव्हेंबर २0१५ रोजी तिने स्टॅम्प पेपरवर लिहून ठेवले आहे. या प्रकरणी मूर्तिजापूर पोलीस अधिक तपास करीत आहे. हे वृत्त लिहीपर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.