शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

युवकांनी द्वेषाच्या राजकारणात पडू नये

By admin | Updated: January 16, 2017 02:31 IST

स्थानिक गटतट, द्वेषाच्या राजकारणात न पडता, युवकांनी आपली कार्यशक्ती राष्ट्राच्या विकासासाठी खर्ची घालावी

मुंबई : स्थानिक गटतट, द्वेषाच्या राजकारणात न पडता, युवकांनी आपली कार्यशक्ती राष्ट्राच्या विकासासाठी खर्ची घालावी, स्वामी विवेकानंद यांना अभिपे्रत असलेल्या भारताच्या प्रगतीसाठी आपली ऊर्जा सकारात्मक कार्यात लावावी, असे आवाहन मान्यवरांनी युवा महोत्सवामध्ये केले.राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधत, मूव्हमेंट फॉर पीस अँड जस्टिस फॉर वेल्फेअर’ या स्वंयसेवी संस्थेच्या वतीने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे अध्यक्ष महंमद सिराज यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमामध्ये, ‘सामाजिक परिवर्तन व तरुणांची जबाबदारी, महाग शिक्षण व्यवस्था आणि युवा आंदोलनाची गरज, सांस्कृतिक क्षेत्रात तरुणांपुढील आव्हाने, उद्योग व व्यापार आणि राजकारणातील तरुणांची भागीदारी,’ या विषयावर विविध मान्यवरांनी तपशीलवार मते व्यक्त केली. महंमद सिराज म्हणाले, ‘सध्याची युवा पिढी सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहे. मात्र, त्यांच्या ज्ञानाचा वापर नकारात्मक बाबींकडे जास्त प्रमाणात होत आहे. त्याला प्रतिबंध घालून आपले कौशल्य समाजाच्या विकासात लावणे गरजेचे आहे. सोशल मीडियाचा वापर चांगल्या कार्यासाठी केला गेला पाहिजे. या वेळी उपाध्यक्ष रमेश कदम यांनी तरुणांनी कोणत्याही गटतट, पंथामध्ये विभागून न जाता, सामाजिक एकात्मता अधिक दृढ करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची गरज व्यक्त केली. (प्रतिनिधी)