नाशिक : ‘इसिस’च्या प्रभावाखाली असल्याच्या संशयावरून अभियांत्रिकीचा पदवीधारक व सातपूर औद्योगिक वसाहतीतील एका नामांकित कंपनीत काम करणाऱ्या युवकाची शहर पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे़ मात्र या युवकाबाबत कोणतीही माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला आहे़जगभरातील तरुणांना इंटरनेट व सोशल मीडियाच्या माध्यमातून दहशतवादी कृत्यासाठी आकर्षित करण्याचा सपाटा ‘इसिस’ या संघटनेने सुरू केला आहे़ मुंबई, पुणे, ठाणे, लातूर यासह केरळ वा इतर राज्यातील अनेक तरुण इसिसच्या संपर्कात आल्याचे वा प्रत्यक्ष सहभाग घेतल्याची वृत्तही प्रसिद्ध झाली आहेत.या संघटनेच्या संपर्कात नाशिकचा तरुण आल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे़ सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, इसिस संघटनेने प्रेरित झाल्याचे स्टेटस व छायाचित्र सोशल मीडिया व व्हॉट्सअॅपवर टाकले होते़ तसेच मित्रांशी बोलतानाही तो इसिसचे समर्थन करीत असे़दहशतवादविरोधी कक्षाकडून या युवकाची चौकशी सुरू असून त्याचे समुपदेशन केले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)
नाशिकमधील युवक इसिसच्या प्रभावाखाली?
By admin | Updated: January 2, 2016 08:34 IST