शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

युवक काँग्रेसचा मंत्रालयावर मोर्चा

By admin | Updated: August 20, 2015 00:40 IST

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे

मुंबई : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. शेतकऱ्यांना त्यांचे न्याय्य हक्कांसाठी मिळवून देण्यासाठी, त्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यासाठी तसेच दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून वाढीव मदत मिळावी आदी मागण्यांसाठी अखिल भारतीय युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष आ. अमरिंदर सिंग राजा ब्रार व महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून मंत्रालयाला घेराव घालण्याचा प्रयत्न करण्यात आला.प्रारंभी कार्यकर्ते आझाद मैदान येथील मुंबई विभागीय कॉंग्रेस कमिटीच्या कार्यालयात एकत्र जमले. मुंबई विभागीय कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम, महाराष्ट्र कॉंग्रेसचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित केले. ब्रार म्हणाले, या सरकारने काळा पैसा बाहेर काढण्याच्या केलेल्या वल्गना फोल ठरत आहेत. परंतु मोदी सरकार या भ्रष्टाचारी मंत्र्यांना संरक्षण देण्याचे काम करीत आहे. मोर्चाचा उद्देश मंत्रालयाला घेराव घालण्याचा होता. परंतु तेथे धडकण्यापूर्वीच आझाद मैदान येथे पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले. आले. या मोर्चात आ. नसीम खान, आ. वर्षा गायकवाड, आ. आनंदराव पाटील, आ. यशोमती ठाकूर, आ. हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रीय युवक काँग्रेसचे सरचिटणीस हिम्मत सिंह, गणेशकुमार यादव, रित्वीज जोशी, विदीत चौधरी यांच्यासह युवक कॉंग्रेसचे सर्व पदाधिकारी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)