शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो स्थानकात ट्रेनखाली तरुणाची आत्महत्या

By admin | Updated: September 19, 2016 03:42 IST

मेट्रोच्या साकीनाका स्थानकात उदय कुमार गणेश प्रसाद या २५ वर्षीय तरुणाने ट्रेनखाली आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी घडली.

मुंबई : मुंबई मेट्रोच्या साकीनाका स्थानकात उदय कुमार गणेश प्रसाद या २५ वर्षीय तरुणाने ट्रेनखाली आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी घडली. तो मूळचा बिहारचा राहणारा असल्याचे साकीनाका पोलिसांकडून सांगण्यात आले. सकाळी ९.२0च्या सुमारास उदय कुमार मेट्रोच्या साकीनाका स्थानकात आला. वर्सोवा-घाटकोपर ट्रेन स्थानकात येताच ट्रेनसमोर त्याने उडी घेतली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना पाहताच मेट्रो कर्मचाऱ्यांनी तत्काळ याची माहिती साकीनाका पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी येईपर्यंत मेट्रो सेवा काही काळ विस्कळीत झाली. तोपर्यंत मेट्रो फक्त मरोळ नाका ते वर्सोवापर्यंत चालविली जात होती. त्यामुळे मेट्रोला एकच गर्दी झाली. दरम्यान, पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर उदय कुमार याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठविण्यात आला. यासंदर्भात साकीनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ए. धर्माधिकारी यांना विचारले असता, उदय कुमार हा बिहारमध्ये राहणारा होता. त्याच्याजवळ असणाऱ्या आधार कार्डावरून त्याची ओळख पटली. आत्महत्येमागील कारण अद्याप समजले नसून अधिक तपास सुरू असल्याचे ते म्हणाले. मुंबईबरोबरच बिहारमधील त्याच्या मित्रपरिवाराशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेमुळे मेट्रो जवळपास दीड तास विस्कळीत झाली होती. (प्रतिनिधी)