शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
3
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
4
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
5
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
6
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
7
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
8
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
9
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
10
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
11
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
12
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
13
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
14
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
15
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
16
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
17
लॅपटॉप जास्त वेळ मांडीवर अन् फोन खिशात ठेवाल तर वडील होण्याचे स्वप्न राहील अधुरे; नपुंसक होण्याचा धोका
18
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
19
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
20
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित

आईच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी तरुण तलवार घेऊन इमारतीवर चढला

By admin | Updated: September 29, 2016 10:56 IST

आईच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी तरुणाने इमारतीचे तीन माळे चढून शेजा-यावर तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घडली आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 29 - आईच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी तरुणाने इमारतीचे तीन माळे चढून शेजा-यावर तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घडली आहे. भाईंदरमधील प्लॅन्टेरिया कॉम्प्लेक्समध्ये ही घटना घडली आहे.  धोनी गोपाल असं या तरुणाचं नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. 
 
गोपालच्या आईचं शेजारच्या महिलेशी भांडण झालं होतं. भांडताना गोपालच्या आईला त्या महिलेने कानाखाली मारली. ही गोष्ट जेव्हा गोपालला कळली तेव्हा त्याचा राग अनावर झाला. आईच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी त्याने घरात धार्मिक विधींसाठी वापरण्यात येणारी तलवार काढली, आणि शेजारच्या महिलेचं घर गाठलं. शेजा-यांनी दरवाजा उघडण्यास नकार दिल्यानंतर गोपालचा पारा अजून वाढला. 
 
तलवार घेऊन गोपाल इमारतीच्या भिंतीवरुन तीन माळे चढला आणि त्या महिलेवर खिडकीतून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण लोखंडी सळ्यांचा अडथळा आल्याने तो हल्ला करु शकला नाही. त्यानंतर त्याने खिडकीच्या काचा फोडल्या आणि खाली उतरला. हा सर्व  प्रकार पाहिल्यानंतर सर्व शेजारी इमारतीखाली जमा झाले होते. लोकांनी गोपालला पोलिसांच्या हवाली केलं असून त्याला अटक करण्यात आली आहे.