शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

योगिता पारधी सर्वात तरुण विजयी उमेदवार

By admin | Updated: March 7, 2017 02:23 IST

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाच्या आघाडीने सत्ता मिळवत भाजपाला धूळ चारली

मयूर तांबडे,पनवेल- जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाच्या आघाडीने सत्ता मिळवत भाजपाला धूळ चारली. या निवडणुकीत पनवेल तालुक्यातून जिल्हा परिषदेसाठी योगिता पारधी तर पंचायत समितीसाठी स्वप्नील भुजंग, वृषाली अरुण देशेकर हे सर्वात तरुण विजयी उमेदवार ठरले असून तिघेही उमेदवार शेकाप आघाडीचे आहेत.जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका २१ फेब्रुवारी रोजी पार पडल्या. २३ फेब्रुवारीला निवडणुकीचा निकाल लागला. यासाठी पनवेलमधील साऱ्याच पक्षांकडून तरुण उमेदवारांना संधी देण्यात आली होती. पनवेलमधून जिल्हा परिषद व पनवेल पंचायत समितीच्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादीने वर्चस्व राखले. वावंजे गणातून जिल्हा परिषदेची २१ वर्षीय शेकापची विजयी उमेदवार योगिता पारधी ही सर्वात कमी वयाची उमेदवार ठरली. तर पंचायत समितीमधून पाली देवद गणातून शेकापचे २२ वर्षीय स्वप्नील भुजंग हा तर चिंध्रण गणातून शेकापच्या २२ वर्षीय वृषाली अरु ण देशेकर हे सर्वात तरु ण विजयी उमेदवार ठरले. ही निवडणूक भाजपा व शेकाप आघाडीने प्रतिष्ठेची केली होती.पंचायत समितीच्या निवडणुकीत शेकाप आघाडीला १० जागा तर भाजपाला ६ जागा मिळाल्या होत्या. शिवसेनेला एकही जागा मिळाली नव्हती. तर जिल्हा परिषदेसाठी झालेल्या निवडणुकीत पनवेलमधून शेकाप आघाडीला ६ जागा तर भाजपला २ जागा मिळाल्या होत्या. यामुळे शेकाप आघाडीने पनवेलमधून निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. वावंजे जिल्हा परिषदेच्या गणातून शेकापच्या योगिता जगन पारधी या २१ वर्षीय महिला विजयी उमेदवाराने भाजपाच्या पार्वती प्रवीण सफरे यांचा पराभव केला. पंचायत समितीच्या पालीदेवद गणातून स्वप्नील किसन भुजंग याने भाजपच्या अमोल शेषराव इंगोले याचा पराभव केला. तर चिंध्रण गणातून शेकापच्या वृषाली अरु ण देशेकर यांनी भाजपाच्या कमला एकनाथ देशेकर यांचा पराभव केला. >नवीन पनवेलमध्ये निवडणुकीनंतर शेकाप-भाजपामध्ये पोस्टर वॉर सुरु झाले आहे. शहरातील होर्डिंगद्वारे दोन्ही पक्षांचे पोस्टर वॉर सुरू आहे. त्याच पध्दतीने सोशल मीडियावर पोस्ट वॉर रंगले आहे. काही दिवसांपूर्वी दोन्ही पक्षांनी टाकलेल्या पोस्ट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरल्या आहेत.