शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

दारूसाठी ‘योगी’ पॅटर्न!

By admin | Updated: April 4, 2017 06:21 IST

योगी आदित्यनाथ सरकारने काढलेल्या एका अधिसूचनेचा आधार घेण्याच्या हालचाली महाराष्ट्रात सुरू झाल्या आहेत.

यदु जोशी,  मुंबई- राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांपासून  ५०० मीटरच्या आतील दारूची दुकाने व  बार वाचविण्यासाठी उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने काढलेल्या  एका अधिसूचनेचा आधार घेण्याच्या हालचाली महाराष्ट्रात सुरू झाल्या आहेत. हायवेपासून ५०० मीटरच्या आतील दारू दुकाने व बार बंद करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या दिवशीच, ३१ मार्चला योगी आदित्यनाथ सरकारने अधिसूचनेद्वारे दारू दुकाने व बारना अभय दिले. या अधिसूचनेनुसार उत्तर प्रदेशातील राज्य महामार्ग आणि बायपास असलेला शहरी भाग हा आता जिल्हा महामार्गाचा भाग बनले आहेत. तसे करताना शहरांमधील वळण रस्त्यांना मात्र राज्य राजमार्ग घोषित करण्यात आले आहे, म्हणजे स्टेट हायवे झाले. या प्रकारे आदित्यनाथ यांनी कोर्टाच्या कचाट्यातून हायवे व त्यापासून ५00 मीटरच्या अंतरातील दारू दुकाने वाचवली. कारण स्टेट हायवेबाबत कोर्टाचा काहीच आदेश नाही.महाराष्ट्रातही याच पॅटर्नप्रमाणे ज्या महापालिका, नगरपालिका हायवे स्वत:कडे घेण्यास इच्छुक नसतील, तिथे त्यांचे जिल्हा महामार्गांत रूपांतर करण्याचा विचार मंत्रालय पातळीवर सुरू झाला आहे. न्यायालयाच्या निकालानंतर सरकारने राज्य महामार्ग स्थानिक स्वराज्य संस्थांना सुपुर्द केले वा जिल्हा महामार्ग म्हणून घोषित केले, तर तो सर्वोच्च न्यायालयाचा अवमान ठरेल का, असा प्रश्नही समोर आला आहे. तथापि, काही ज्येष्ठ विधिज्ञांच्या मते त्यामुळे अवमान होण्याचा प्रश्नच नाही. कारण राज्य महामार्गांची मालकी वा त्यांचे स्वरूप बदलण्याचा निर्णय हा ३१ मार्चनंतर घेतला, तरी त्याचे सरकारी परिपत्रक २००१ निघाले होते. ‘वळण रस्ता झालेला असेल, अशा ठिकाणचे राज्य व राष्ट्रीय महामार्ग हे स्थानिक स्वराज्य संस्थेकडे हस्तांतरित करता येतील,’ असे त्या परिपत्रकात म्हटले होते. >प्रश्न रस्त्यांच्या देखभालीचादारू दुकाने वाचविण्यासाठी राज्य महामार्ग महापालिका, नगरपालिकांकडे सोपविणे दारू दुकाने आणि त्यातून मिळणारा महसूल यासाठी व्यवहार्य असला, तरी या रस्त्यांची देखभाल, दुरुस्ती स्वत:च्या खजिन्यातून करणे या संस्थांना शक्य होईल का, हा प्रश्न आहे. >राष्ट्रीय महामार्गांलगत असलेली दुकाने/बार यांना अभय द्यायचे असेल, तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजे पर्यायाने केंद्र सरकारला निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गावरील दुकाने वाचवायची, तर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भूमिका महत्त्वाची असेल. >नितीन गडकरींची भूमिका महत्त्वाचीउत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बानवकुळे यांना याबाबत विचारले असता, ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आदर राखतानाच ही दुकाने वाचविण्यासाठी काय करता येईल, यावर विचार सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी आपण या संदर्भात चर्चा करू.