शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

योग दिनापाठोपाठ आता ‘आयुर्वेद दिन’

By admin | Updated: November 10, 2015 02:11 IST

आयुर्वेद ही भारताची प्राचीन परंपरा आहे. आजही वैद्यांनी ही परंपरा जोपासली आहे. ही परंपरा, शास्त्र जगासमोर येण्याची आवश्यकता आहे

मुंबई : आयुर्वेद ही भारताची प्राचीन परंपरा आहे. आजही वैद्यांनी ही परंपरा जोपासली आहे. ही परंपरा, शास्त्र जगासमोर येण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आयुष मंत्रालय प्रयत्नशील आहे. आयुर्वेद शास्त्र जगासमोर येण्यासाठी ‘आयुर्वेद दिन’ साजरा करण्यात येईल, असे प्रतिपादन आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी मुंबईतल्या कार्यक्रमात केले. धनत्रयोदशीचे औचित्य साधून आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते चेंबूर येथे वैद्य किरण पंडित, वैद्य ऊर्मिला पिटकर, वैद्य विनायक डोंगरे, वैद्य दीपनारायण शुक्ला, वैद्य मंगेश पाटील, वैद्य संजय सातपुते या ६ ज्येष्ठ वैद्यांचा सोमवारी सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, आयुर्वेद भारताची जुनी ओळख आहे. पूर्वी आयुर्वेदाचा मोठ्या प्रमाणावर अभ्यास झालेला आहे. मात्र परकीय आक्रमणांमुळे देशात आयुर्वेदाचा अभ्यास मागे पडत गेला. पण, तरीही काही वैद्यांनी हे शास्त्र जपून ठेवले आणि पुढच्या पिढीला आयुर्वेदाचा वसा दिला. त्यामुळेच आजही आयुर्वेद टिकून आहे. अनेक वैद्य आयुर्वेद पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. आयुर्वेदातील पारंपरिक गोष्टींचा अभ्यास नव्याने केला पाहिजे. संशोधन करून वैज्ञानिक पद्धतीने औषधांची मीमांसा केली पाहिजे. आयुर्वेदाला पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)