शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

होय, आम्ही रेती चोरतो !

By admin | Updated: October 19, 2016 03:37 IST

हो, आम्ही रेती चोरी करतो. या कटात पोलीस आणि महसूल खात्याचे अधिकारीही सामील आहे.

शशी करपे,

वसई- हो, आम्ही रेती चोरी करतो. या कटात पोलीस आणि महसूल खात्याचे अधिकारीही सामील आहे. आमचा गुन्हा आम्ही कबुल करतो. पण, आमच्यासोबत महसूल आणि पोलिसांनाही सहआरोपी करा, या मागणीसाठी रेती व्यावसायिक श्रमजीवी संघटनेचे नेते विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी वसईच्या तहसिलवर मोर्चा नेणार आहेत. यावेळी रेतीचा धंदा करण्यासाठी मदत करणाऱ्या पोलीस आणि महसूल अधिकाऱ्यांची नावे जाहिर केली जाणार आहेत. गेल्या आठवड्यात पोलिसांनी दोन वेळा रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या ३४ ट्रकवर कारवाई केली होती. त्यानंतर रेती व्यावसायिकांनी आता पोलीस आणि महसूल खात्याविरोधात दंड थोपटले आहेत. त्यामुळे वसईत नव्या संघर्षाला तोंड फुटले आहे. रेती उत्खननाची परवानगी नाकारल्याने रेती व्यवसायात असलेले भूमीपुत्र संकटात सापडले आहेत. पर्यायी रोजगार नसल्याने आणि सरकार परवानगी देत नसल्याने आम्हाला चोरी करावी लागत आहे, अशी कबुली रेती व्यावसायिकांनी श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून दिली आहे. इतकेच नाहीतर संघटनेने रेतीची चोरटी वाहतूक करण्यासाठी कुणाला किती पैसे द्यावे लागतात याची यादी जाहिर केली आहे. मांडवी पोलीस चौकी, विरार पोलीस स्टेशन, वालीव पोलीस स्टेशन, शिरसाड ट्रॅफिक पोलीस, चारोटी ट्रॅफिक पोलीस, काशिमीरा पोलीस स्टेशन, काशिमीरा ट्रॅफिक पोलीस, दहिसर चेक नाका यांच्यासह महसूल खात्याला गाडी मागे किमान दहा हजार रुपये द्यावे लागतात, असा आरोप करण्यात आला आहे. >‘त्या’पोलीस आणि महसूल अधिकाऱ्यांनाही सहआरोपी कराचोरीची वाहतूक करण्यास पोलीस आणि महसूल खाते मदत करीत असताना आरोपी मात्र रेती व्यावसायिकांनाच का करता? असा सवाल श्रमजीवी संघटनेने केला आहे. आम्ही चोरी करतो, अशी कबुली यावेळी रेती व्यावसायिक देणार आहेत. पण, या कटात सहभागी असलेल्या पोलीस आणि महसूल अधिकाऱ्यांनाही सहआरोपी करण्यात यावे, अशी मागणी करण्यासाठी कबुली मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून यावेळी वेळी संबंधितांची नावे जाहिर केली जाणार, असल्याची माहिती तालुका अध्यक्ष आत्माराम ठाकरे यांनी दिली.