शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

यंदा संघर्षची दहीहंडी रद्द

By admin | Updated: August 21, 2015 01:02 IST

आॅगस्ट महिना उलटला तरीही राज्यात अजूनही समाधानकारक पाऊस झाला नसल्याने यंदाचा उत्सव रद्द करण्याचा निर्णय राष्ट्रवादीचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर केला

ठाणे : आॅगस्ट महिना उलटला तरीही राज्यात अजूनही समाधानकारक पाऊस झाला नसल्याने यंदाचा उत्सव रद्द करण्याचा निर्णय राष्ट्रवादीचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर केला. हंडीसाठी खर्च केला जाणारा निधी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना देण्यात येणार असल्याचेही त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. ठाण्यातील ओपन हाऊस येथे संघर्ष या संस्थेच्या माध्यमातून दहीकाला उत्सवाचे आयोजन केले जाते. दहीहंडीच्या माध्यमातून स्पेनच्या कॅसलर्सना त्यांनीच ठाण्यात आणले होते. तसेच, अनेक गोविंदा पथकांनाही प्रशिक्षणासाठी त्यांनी स्पेनला पाठविले होते. मोठमोठ्या बक्षिसांसाठी संघर्षची दहीहंडी प्रसिद्ध आहे. मात्र, राज्यात सध्या दुष्काळी स्थिती असल्यामुळेच त्यांनी ही दहीहंडी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकार उदासीन आहे. थरांची मर्यादा, मंडपबंदी यामुळे उत्सव होईल की नाही, याबाबत साशंकता निर्माण झालेली आहे. त्यातच राज्य सरकारला या दुष्काळग्रस्तांबाबत कोणत्याही प्रकारचे गांभीर्य नाही. सरकारकडून अद्यापही शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य जाहीर करण्यात आलेले नाही. तसेच, कर्जमाफीचाही निर्णय घेतला जात नाही. त्यामुळेच आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांसाठी विशेषत: त्या भगिनींसाठी ही दहीहंडी रद्द करून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. शिवाय, दहीहंडीमध्ये होणारा पाण्याचा अपव्ययही रोखण्याचा आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)