शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ: शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा सर्पदंशाने मृत्यू

By admin | Updated: July 18, 2016 16:26 IST

शासकीय आश्रमशाळेच्या प्रांगणात जेवणानंतर खेळणा-या सहावीच्या विद्यार्थ्याचा सर्पदंशाने बळी गेल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यात घडली.

ऑनलाइन लोकमत
यवतमाळ, दि. १८ - शासकीय आश्रमशाळेच्या प्रांगणात जेवणानंतर खेळणा-या सहावीच्या विद्यार्थ्याचा सर्पदंशाने बळी गेल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यांतर्गत येणाºया  अंतरगाव येथे रविवारी दुपारी घडली. शाळा परिसरात मोठ्या प्रमाणात झुडुपे वाढले असून या शाळा प्रशासनाचे मात्र त्याकडे दुर्लक्ष आहे. परिणामी एका निरागस बालकाला आपला जीव गमवावा लागला. 
आदित्य रवी टेकाम (११) रा. रुंझा (ता.पांढरकवडा) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. रविवार १७ जुलै रोजी शाळेला सुटी असल्याने दुपारच्या जेवणानंतर सर्व विद्यार्थी नेहमीप्रमाणे आश्रमशाळेच्या प्रांगणात खेळत होते. आदित्य टेकाम व त्याचे काही मित्र आश्रमशाळेच्या प्रांगणात असलेल्या रंगमंचाकडे खेळण्यासाठी गेले. हा संपूर्ण परिसर झुडुपाने व्यापलेला आहे. या ठिकाणी खेळत असताना काही तरी चावल्याचे आदित्यच्या लक्षात आले. त्याने हा प्रकार सोबतच्या सहकाºयांना सांगितला. थोड्या वेळातच त्याची प्रकृती गंभीर होत गेली. त्यावेळी सर्पदंश झाल्याचे स्पष्ट झाले. 
आश्रमशाळेतील कर्मचाºयांनी थोडाही विलंब न करता त्याला मेटीखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविले. प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री ८.३० वाजता त्याची प्राणज्योत मालवली. आदित्य हा रुंझा येथील एका गरीब कुटुंबातील मुलगा आहे. आठ दिवसापूर्वीच त्याने या आश्रमशाळेत प्रवेश घेतला होता. दरम्यान पांढरकवडा येथील आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी दीपककुमार मीना (आयएएस) यांनी आदित्यच्या कुटुंबाला ७५ हजार रुपये दिले जाणार असल्याचे सांगितले. (वार्ताहर)
वॉलकंपाऊंंड वाहून गेले
अंतरगाव शासकीय आश्रमशाळेचे वॉलकंपाऊंड पाच वर्षांपूर्वी पुराने वाहून गेले. पुन्हा उभे करण्याची सोय संबंधित विभागाने लावली नाही. याच परिसरात गवत वाढले असून तेथेच रंगमंच आहे. पहिली ते दहावीपर्यंत वर्ग असलेल्या या आश्रमशाळेत एकूण २२ कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये दोन अधीक्षक, मुख्याध्यापक, दहा शिक्षक, तीन स्वयंपाकी, चार कामाठी, एक चौकीदार आणि एक लिपिक आहेत. आदित्यला सर्पदंश झाल्यानंतर सर्व कर्मचाºयांनी तत्काळ रुग्णालयात हलविले. 
मुख्यमंत्र्यांनी अहवाल मागितला
वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, अंतरगाव आश्रमशाळेतील आदित्य रवी टेकाम याचा सर्पदंशाने झालेल्या मृत्यूची सरकारने गंभीर दखल घेतली आहे. संपूर्ण चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.