शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

हवा, पाणी, ऊर्जा, हरित मिशनला यश

By admin | Updated: May 25, 2016 17:28 IST

विविध प्रकल्पांसाठी पर्यावरण मंजुरीत विलंब टाळण्यात आलेले यश याद्वारे २ वर्षांच्या कालावधीत २ हजार प्रकल्पांना पर्यावरण मंजुऱ्या दिल्या आहेत

- सुरेश भटेवरा, नवी दिल्ली
 
स्वच्छ हवा, पाणी, ऊर्जा, पर्यावरण आणि हरित भारत या पंचत्वाचे संरक्षण करताना वनसंपत्तीत वाढ, औद्योगिक प्रदूषणाच्या नियंत्रणासाठी परिणामकारक नियमन आणि विविध प्रकल्पांसाठी पर्यावरण मंजुरीत विलंब टाळण्यात आलेले यश याद्वारे २ वर्षांच्या कालावधीत २ हजार प्रकल्पांना पर्यावरण मंजुऱ्या दिल्या आहेत. त्यामुळे देशात १0 लाख कोटींची गुंतवणूक व १0 लाखांहून अधिक रोजगारनिर्मितीचा मार्ग प्रशस्त झाला आहे.
 
केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकरांनी २ वर्षांच्या कारकिर्दीचा लेखाजोखा सोमवारी सादर केला. विविध उपाययोजनांमुळे दोन वर्षांत वन संपत्तीत वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे, असा दावा करून, ते म्हणाले, विविध प्रकल्पांमुळे पर्यावरण व जंगल संपत्तीची होणारी हानी भरून काढण्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार विकासकांकडून नुकसानभरपाईपोटी विशिष्ट रक्कम गोळा केली जाते. त्याद्वारे आजवर गोळा झालेला ४२ हजार कोटींचा निधी बँकेत पडून होता. वन संपत्ती वाढवण्यासाठी या निधीचा परिणामकारक वापर करण्याचे आम्ही ठरवले आहे. भारताला दरवर्षी ४0 हजार कोटींचे लाकूड आयात करावे लागते तर दुसरीकडे ३0 दशलक्ष हेक्टर वन जमीन ओसाड आहे. या जागेवर वृक्षलागवड करून उत्पादनास या लाकडांचा वापर करण्यास खासगी क्षेत्राला अनुमती देण्याचे धोरण आहे. शहरांत वृक्षसंवर्धन, शाळांमधे नर्सरी करून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता, महामार्ग, नद्यांचे तीर व रेल्वेच्या जमिनीवर राज्यांच्या मदतीने व्यापक वृक्षलागवड या योजना आता राबवण्यात येत आहे.
 
विस्तीर्ण समुद्रकिनाऱ्यावरील ४२ जागा शोधून खारफुटी (मॅनग्रोव्ह)चे क्षेत्र १00 कि.मी.ने वाढवण्यात यश आले आहे. हवाई छायाचित्रणाने लाटांचा परिसर अधिसूचित करून सीआरझेड कायद्यात बदल करून तो अधिक व्यवहार्य करण्यात येणार आहे. एकूण ७६४ उद्योगांना प्रदूषण रोखण्यासाठी आधुनिक यंत्रणा बसवण्याची सक्ती करण्यात आली असून, वाहनांचे प्रदूषण कमी करण्यासाठी ६0 हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येत असल्याचा उल्लेखही जावडेकर यांनी केला.
 
वन्यजीवांचे रक्षण
 
वन्यजीवांचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी उपाय योजल्यामुळे जगातील ७0 टक्के वाघ, ३0 हजारांहून अधिक हत्ती व ३ हजारांहून अधिक गेंडे आज भारतात आहेत. वाघांच्या अभयारण्याजवळील २५ खेडी व ३ हजार कुटुंबांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. पश्चिम घाटातील संवेदनशील सजीवसृष्टीच्या रक्षणासाठी प्रयत्न सुरू असून, जंगलांतील रस्ते दुरुस्ती व सुधारणांना मंजुरी अशा निर्णयांमुळे वनसंपत्तीत वाढ करण्यात यश आले.