शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

चुकीची नेत्र शस्त्रक्रिया : आणखी दोघे निलंबित

By admin | Updated: November 14, 2015 02:16 IST

२३ रुग्णांवर कायमस्वरूपी अंधत्व पत्करण्याची आली होती वेळ.

वाशिम: मोतीबिंदूची चुकीच्या पद्धतीने नेत्र शस्त्रक्रिया केल्यानंतर जंतुसंसर्ग झाल्यावरही योग्य उपचार न केल्यामुळे २३ रुग्णांवर कायमस्वरूपी अंधत्व पत्करण्याची वेळ आली होती. याप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक व नेत्रतज्ज्ञांना निलंबित केल्यानंतर पुन्हा दोन नेत्ररोग चिकित्सकांना निलंबित करण्यात आले. येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात १५ ऑक्टोबर रोजी आयोजित एका शिबिरामध्ये २३ पेक्षा जास्त रुग्णांवर नेत्ररोग तज्ज्ञांमार्फत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली; मात्र ही शस्त्रक्रिया चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे आठ रुग्णांना डोळे गमवावे लागले. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णांवर आंधळे होण्याची पाळी आल्यामुळे हे प्रकरण संपूर्ण राज्यभर गाजले. वाशिम जिल्ह्यातील आमदार राजेंद्र पाटणी, पालकमंत्री डॉ. रणजित पाटील व आरोग्यमंत्री सावंत यांनी रुग्णांची भेट घेऊन त्यांना न्याय देण्याचे आश्‍वासन दिले होते. या गंभीर प्रकरणाची आरोग्य मंत्रालयाने दखल घेत याप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेखा मेंढे आणि नेत्रतज्ज्ञ डॉ. प्रशांत चव्हाण यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात केली. या प्रकरणात दोषी असलेल्या आणखी डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी राजकीय पुढार्‍यांनी केली होती. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. चौकशीत दोषी आढळलेले वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयातील नेत्ररोग चिकित्सक जगदीश बाहेकर व हाके यांना निलंबित करण्यात आले. याप्रकरणी आता चार जणांना निलंबित करण्यात आले आहे.