शहरं
Join us  
Trending Stories
1
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
2
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
3
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
5
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
6
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
7
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
8
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
9
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
10
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
11
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
12
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
13
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
14
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
15
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
16
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
17
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
18
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
19
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
20
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)

अधिकारांसाठी भांडणारी पत्नी क्रूर नाही

By admin | Updated: February 18, 2017 04:03 IST

स्वत:चे अधिकार मिळविण्यासाठी पतीविरुद्ध न्यायालयात भांडणाऱ्या पत्नीला क्रूर म्हटले जाऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई

राकेश घानोडे / नागपूरस्वत:चे अधिकार मिळविण्यासाठी पतीविरुद्ध न्यायालयात भांडणाऱ्या पत्नीला क्रूर म्हटले जाऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे.प्रकरणातील पतीचे विवाहबाह्य संबंध असून, तो पत्नीचा हुंड्यासाठी छळ करीत होता. त्यामुळे ती पतीपासून वेगळी राहायला लागली. याचदरम्यान पत्नीने सासरच्या घरात राहण्याचा अधिकार व पोटगी मिळण्यासाठी कुटुंब न्यायालयात दाखल केलेली याचिका मंजूर झाली. त्यानंतर या वादाबाबत वर्तमानपत्रांत बातम्या प्रकाशित झाल्या. या बातम्या पत्नीनेच प्रकाशित करून घेतल्या असे पतीचे म्हणणे होते. त्याने पत्नीची ही कृती क्रूरतेत मोडणारी असल्याचा दावा करून या आधारावर घटस्फोट मिळण्यासाठी कुटुंब न्यायालयात याचिका दाखल केली होती.कुटुंब न्यायालयाने २२ जुलै २०१३ रोजी ही याचिका फेटाळून लावली. या निर्णयाविरुद्ध पतीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती वासंती नाईक व न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी हे अपील फेटाळून पत्नीने स्वत:चे अधिकार मिळविण्यासाठी न्यायालयात दाद मागणे म्हणजे क्रूरता नव्हे, असे स्पष्ट केले. तसेच, पत्नीने पतीसोबतच्या वादाच्या बातम्या वर्तमानपत्रात प्रकाशित केल्याचा आरोप पुरावे नसल्याने सिद्ध झाला नाही.