शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

जगातील सर्वांत लठ्ठ महिला मुंबईत दाखल

By admin | Updated: February 12, 2017 05:54 IST

जगातील सर्वांत लठ्ठ महिला असणाऱ्या इजिप्तच्या इमान अहमद हिला शनिवारी मुंबईत आणण्यात आले. मुंबई विमानतळावर सुमारे पहाटे ४.१०च्या दरम्यान तिचे विमान

मुंबई : जगातील सर्वांत लठ्ठ महिला असणाऱ्या इजिप्तच्या इमान अहमद हिला शनिवारी मुंबईत आणण्यात आले. मुंबई विमानतळावर सुमारे पहाटे ४.१०च्या दरम्यान तिचे विमान पोहोचले, त्यानंतर ५०० किलो वजन असलेल्या ३६ वर्षीय इमानला हलविण्यासाठी क्रेनचा वापर करण्यात आला. इमानवर करण्यात येणाऱ्या बेरिएट्रीक शस्त्रक्रियेनंतर इमानला सहा महिने डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे.इजिप्त एअरच्या विशेष एअरबसने आलेल्या इमानसोबत डॉ. अपर्णा भास्कर, डॉ. कमलेश बोहरा आणि त्यांची बहीण शायमा अहमद होत्या. या वेळी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या गेट क्र. ५मधून इमानला क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढले. त्यानंतर ओपन ट्रकमधून रुग्णवाहिका आणि पोलिसांच्या ताफ्यासह चर्नीरोड येथील सैफी रुग्णालयाकडे नेण्यात आले.इमानसाठी सैफी रुग्णालयात सुमारे २ कोटी रुपये खर्च करून तिच्यासाठी वेगळा कक्ष उभारण्यात आला आहे. इमानसाठी उभारण्यात आलेल्या ‘वन बेड हॉस्पिटल’मध्ये एक आॅपरेशन थिएटर, एक अतिदक्षता विभाग, डॉक्टरांसाठी खोली, दोन विश्रांतीगृहे आणि तळमजल्यावर एक व्हिडीओ कॉन्फरन्सिंग रूम असणार आहे. यामध्ये ७ फूट रुंद दरवाजे बांधण्यात आले आहेत तसेच तिच्यासाठी केलेला बेड ७ फूट रुंद असणार आहे. डॉ. मुजफ्फल लकडावाला हे इमानवर शस्त्रक्रिया करणार आहेत. काही दिवसांपूर्वी टिष्ट्वटरवर भारताच्या पररारष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना तिची मदत करण्याची विनंती केली होती. या विनंतीला मान देत स्वराज यांनी भारतात येण्यासाठी वैद्यकीय व्हिसा देऊ केला होता. (प्रतिनिधी)आई-बहिणीवर अवलंबूनइजिप्तमधल्या अलेक्झांड्रीयामध्ये राहणारी ३६ वर्षीय इमान ही जगातील सगळ्यात लठ्ठ महिला आहे. इमान ही गेल्या २५ वर्षांपासून घरातून बाहेरच पडलेली नाही, तिला बिछान्यावरून हलताही येत नाही. आपल्या दैनंदिन क्रियेसाठी ती पूर्णपणे आपल्या आई आणि बहिणीवर अवलंबून असते. इमानचे लहानपणापासूनच वजन हे तिच्या वयापेक्षा अधिक होते. जन्माच्या वेळीच तिचे वजन जवळपास पाच किलोच्या आसपास होते. ती ११ वर्षांची असल्यापासून वजनामुळे तिला नीट उभे राहता यायचे नाही. त्यातूनच अर्धांगवायूचा झटका आल्याने तिला शाळाही सोडावी लागली. गेल्या २५ वर्षांपासून तिची आई आणि बहीण तिची सेवा करीत आहेत. इमान पूर्णपणे त्यांच्यावर अवलंबून आहे. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फतेह अल सीसी यांच्याकडे वैद्यकीय साहाय्य मागितले होते.लवकरच उपचार सुरूइजिप्तहून मुंबईत यायला इमानला पाच तासांचा प्रवास करावा लागला. या प्रवासादरम्यान इमानची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. सैफी रुग्णालयात दाखल करताना इजिप्त दूतावासाचे अधिकारी अहमद खलिल उपस्थित होते. रुग्णालय प्रशासनाच्या माहितीनुसार, इमानला सुरक्षितरीत्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, लवकरच तिच्यावर उपचार सुरू करण्यात येतील.