शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

श्रमजीवीने रोखली अल्पवयीनांची लग्ने

By admin | Updated: April 30, 2016 03:23 IST

तालुक्यातील कुडूस येथे शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता धनगर समाजातील ७ जोडप्यांची लग्ने होणार होती.

वाडा : तालुक्यातील कुडूस येथे शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता धनगर समाजातील ७ जोडप्यांची लग्ने होणार होती. मात्र यातील दोन जोडपी ही अल्पवयीन असल्याची माहिती श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांना मिळताच ते पोलिसांसह लग्न स्थळी पोहचून त्यांनी ही लग्ने रोखली. हा प्रकार येथे जोरदारपणे चर्चीला जात आहे. कुडूस गावाच्या हद्दीत धनगर समाजाच्या सात मुला मुलींची लग्ने शुक्रवारी सायंकाळी होणार होती. यासाठी गेल्या तीन दिवसां पासून जोरदार तयारी सुरू होती. मंडप टाकण्यात आले होते. डी जे ही वाजंत्री सुद्धा होती. नाशिक, अहमदनगर येथील पाहुणे मंडळी सुद्धा वधू वरांवर अक्षता टाकण्यासाठी हजर होते. या सात जोडप्यापैकी दोन जोडपी ही अल्पवयीन होती. शरद कोलपे (१९), अश्विनी हाके (१५) तसेच दत्ता हिरू मदणे (२०), सुधंराबाई कोलपे (१४) रा. ढवळपूरी अहमदनगर येथील रहिवासी असलेले वधूवर ही अल्पवयीन असल्याचे श्रमजीवी संघटनेचे जिल्हा नेते उल्हास भानुशाली, तालुका अध्यक्ष मिलिंद थुले, सरिता जाधव यांना समजताच त्यांनी थेट कुडूस पोलीस चौकी गाठली. येथील साहयक पोलीस उपनिरीक्षक संभाजी भोईर, पोलीस नाईक एस. वाय. चौधरी यांना घेऊन लग्न स्थळी पोहचले. तेथे वधू वरांच्या जन्म तारखा बघितल्यावर दोन जोडपी ही अल्पवयीन असल्याचे त्यांच्या पालकांना सांगितले. त्यानंतर पालकांनीही ही दोन लग्ने न लावता उर्वरित लग्ने लावण्याचा निर्णय घेतला. श्रमजीवी संघटनेच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. (वार्ताहर)