शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद, पंचायत समितीतील काम ठप्प

By admin | Updated: July 20, 2016 00:26 IST

जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांनी सुरू केलेले बेमुदत लेखणीबंद आंदोलन मंगळवारी पाचव्या दिवशीही सुरूच होते.

पुणे : ग्रेड पे वेतनात सुधारणा करण्यासाठी उपसचिवांची समिती नेमून इतर मागण्या महिनाभरात सोेडविण्याचे आश्वासन देऊनही त्याकडे दुर्लक्ष केल्याने जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांनी सुरू केलेले बेमुदत लेखणीबंद आंदोलन मंगळवारी पाचव्या दिवशीही सुरूच होते. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीतील कामकाजावर त्याचा परिणाम दिसू लागला आहे. जिल्ह्यातील ९६७ कर्मचारी गेले ५ दिवस आंदोलनात असल्याने कार्यालयीन व प्रशासकीय काम ठप्प झाले आहे. फायली जागेवरच पडून असून, टपालाचा खच पडला आहे. हे कर्मचारी सकाळी व संध्याकाळी गेटवर जाऊन शासनाच्या विरोधात घोषणा देत असून, दिवसभर जागेवरच बसून राहतात; मात्र काम करीत नाहीत. या संदर्भात सामन्य प्रशासनाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे यांच्याशी संपर्क साधला असता, या आंदोलनाचा निश्चितच कामावर परिणाम झाला आहे. टपाल घेणे-देणे बंद आहे. फायली पुढे सरकत नाहीत. सर्वसामान्यांची कामे रखडली आहेत. विकासकामांवर याचा परिणाम होत आहे. प्रशासन दररोज शासनाला याचा अहवाल पाठवीत असल्याचे सांगितले. आपल्या विविध मागण्यांसाठी अनेक वर्षांपासून हे कर्मचारी शासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. वारंवार आश्वासने देऊन त्यांची फसवणूक केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे व राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्याबरोबर बैैठक होऊन त्यांनी योग्य तो निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात ग्रेड पेबाबत सुधारणा करता येणार नसल्याचे कळविले. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी ३ मे रोजी मुंबईत आझाद मैदानावर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण व निदर्शने केली. त्यानंतर केसरकर यांच्या दालनात पुन्हा बैैठक झाली, त्या वेळी ग्रेड पे वेतनात सुधारणा करण्यासाठी दोन दिवसांत उपसचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापून महिनाभरात इतर मागण्या सोडविण्याचे आश्वासन दिले. मात्र, कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे राज्यभरातील हे कर्मचारी आंदोलन करीत आहेत. कर्मचाऱ्यांच्या एकूण १५ मागण्या असून, यात ग्रेड पे सुधारणा, बदल्यांचे धोरण रद्द करणे, जॉबचार्ट / कर्तव्यसूची निश्चित करणे, पाल्यास नि:शुल्क शिक्षण, एमपीएससीसाठी ४५ वयापर्यंत बसण्यास सवलत, जुनीच निवृत्तिवेतन योजना चालू करावी, वर्ग २ चे प्रशासन अधिकारीपद तयार करावे आदी मागण्यांचा समावेश आहे.(वार्ताहर)>संघटनेचे जिल्हाध्यक्ष शेखर गायकवाड यांनी अद्याप शासनाने आमची दंगल घेतली नाही. त्यामुळे जोपर्यंत राज्य संघटना आदेश देत नाही, तोपर्यंत लेखणीबंद आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले.