शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

पालिका सभागृहाचे कामकाज तहकूब

By admin | Updated: June 30, 2017 03:18 IST

महापालिकेच्या अंधेरी येथील के पूर्व विभागाचे सहायक आयुक्त देवेंद्रकुमार जैन यांच्या विभागातील विकासकामे रखडली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महापालिकेच्या अंधेरी येथील के पूर्व विभागाचे सहायक आयुक्त देवेंद्रकुमार जैन यांच्या विभागातील विकासकामे रखडली आहेत. येथील बांधकामांवर मनमानी कारवाई होत आहे; आणि सहायक आयुक्तांकडून लोकप्रतिनिधींना योग्य वागणूक दिली जात नाही; अशा तक्रारींचा पाढाच नगरसेवकांनी गुरुवारी सभागृहात वाचला. महत्त्वाचे म्हणजे तक्रारींचा पाढा वाचतानाच सहायक आयुक्तांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणीही केली.लोकप्रतिनिधींच्या मागणीची दखल घेत महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी या प्रकरणी चौकशी करत सभागृहात अहवाल सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. मात्र याच प्रकरणावरून सभागृहाचे कामकाजही तहकूब करण्यात आले. दरम्यान, जैन यांनी विकासकामांमध्ये खोडा घातल्याच्या निषेधार्थ २३ जूनची प्रभाग समिती सभा तहकूब करण्यात आली होती. आणि याआधीची सभाही याच कारणात्सव तहकूब करण्यात आली होती. तर दुसरीकडे सहायक आयुक्तांच्या कार्यालयात सीसीटीव्ही लावण्याची मागणीही सभागृहात करण्यात आली.मुंबईतील अवैध बांधकामांवर नियंत्रण ठेवण्यात यावे, यासाठी रात्रीच्या वेळेसही महापालिकेचा अतिक्रमण निर्मूलन विभाग सुरू ठेवावा, अशी मागणी भाजपाने ठरावाच्या सूचनेद्वारे पालिकेकडे केली. सूचनेला सभागृहाची मंजुरी मिळाली असली तरीदेखील ही सूचना आयुक्तांच्या अभिप्रायासाठी पाठवण्यात आली आहे. अभिप्रायानुसार अंमलबजावणी करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल.