शासनाच्याही पुढे एक पाऊ ल : मकरधोकडा केंद्र्रात मोफत तपासण्या नागपूर : असुविधामुळे अनेक जण सरकारी रुग्णालयात उपचार घेण्याचे टाळतात. परंतु उमरेड तालुक्यातील मकरधोकडा प्राथमिक आरोग्य केंद्र याला अपवाद ठरले आहे. रुग्णांना सुसज्ज सुविधा मिळाव्या यासाठी वेळप्रसंगी वेतनातील रक्कम खर्च करून कर्तव्य जाणिवेतून येथील डॉक्टरांनी चमत्कार घडविला आहे. बुधवारी या केंद्र्राला प्रत्यक्ष भेट दिली असता याचा प्रत्यय आला. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शरद डोणेकर यांनी येथील डॉक्टरांची प्रशंसा करून त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. प्राथमिक आरोग्य केंद्रात पाच प्रकारच्या तपासण्या होतात. परंतु येथे २५ तपासण्या केल्या जातात. त्याही अवघ्या २ रुपयाच्या शासकीय शुल्कात. उपचारासाठी आवश्यक यंत्रसामुग्री व औषधे उपलब्ध आहे. नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया, कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया यासाठी शासनाच्या निधीची प्रतीक्षा न करता रुग्णांची व्यवस्था करतो, अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ. मुकुंद ढबाले यांनी दिली. यात तालुका आरोग्य अधिकारी सुरेश माने, डॉ. प्राजक्ता वराडे यांच्यासह कर्मचाऱ्यांचाही तितकाच सहभाग असतो. आम्ही सर्वजण कर्तव्याच्या जाणिवेतून सरकारी नोकरी करीत आहे. यातूनच हा कायापालट झाला आहे. एखाद्या खासगी रुग्णालयात नसतील अशा सुविधा या केंद्रात आहे. सफाई कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. परंतु याची चिंता नाही. डॉक्टर व कर्मचारी आपापला कक्ष व परिसर स्वत: स्वच्छ ठेवतात. त्यामुळे आरोग्य केंद्रात सर्वत्र टापटीप व स्वच्छता आहे. एकात्मिक किटक व्यवस्थापन असो वा राष्ट्रीय कार्यक्रम यात मकरधोकडा केंद्र जिल्ह्यात अग्रेसर असल्याचे त्यांनी सांगितले. मकरधोकडा गावची लोकसंख्या ५ हजार आहे. दररोज १०० ते १२५ रुग्ण तपासणीसाठी येतात. येथे २२ पदे मंजूर असून त्यातील ११ रिक्त आहेत. परंतु याचा रुग्ण सेवेवर कोणताही परिणाम नाही. विशेष म्हणजे येथून १२ किलोमीटर अंतरावर उमरेड शहर आहे. परंतु डॉ. मुख्यालयी वास्तव्यास आहेत. स्वच्छतेसोबतच परिसरात बगिचा सुंदर बगिचा फुलविला आहे. आजूबाजूच्या गावात तपासणी मोहीम राबविण्यासोबतच डेंग्यूला आळा घालण्यासाठी गप्पी माशांचे संगोपन केले जाते. यासह विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. चांगल्या कामासाठी जि.प.पाठीशी असल्याची ग्वाही उपाध्यक्षांनी यावेळी दिली. (प्रतिनिधी)आनंदीबाई जोशी पुरस्कारमकरधोकडा केंद्राच्या कार्याची शासनानेही दखल घेतली आहे. शासनाकडे शिफारस न करता या केंद्राला प्रतिष्ठेचा आनंदीबाई जोशी पुरस्कार दोनवेळा प्राप्त झाला आहे. या के द्राचा अपडेट डाटा इतर केंद्रासाठी मार्गदर्शक ठरला आहे. उद्दिष्टात अग्रेसरकुटुंबकल्याण शस्त्रक्र्रिया व नेत्र तपासणी व शस्त्रक्रियेचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याचा मान या केंद्राने मिळविला आहे. नागपूरसारख्या शहरात डेंग्यूला आळा बसलेला नाही. पण या केंद्रामार्फंत राबविण्यात आलेल्या उपाययोजनामुळे या परिसरात एकही डेग्यूचा रुग्ण आढळला नाही.
कर्तव्याच्या जाणिवेतून घडविला चमत्कार !
By admin | Updated: November 28, 2014 01:01 IST