शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

विट्यातील दारूबंदीसाठी महिला मोर्चा

By admin | Updated: May 23, 2017 18:36 IST

विटा येथील साळशिंगे रस्त्यावरील मशिदीजवळ सुरू असलेले देशी दारूचे दुकान तातडीने बंद करण्यासाठी मंगळवारी विट्यातील महिला आक्रमक झाल्या.

ऑनलाइन लोकमत
विटा (सांगली), दि. 23 - विटा येथील साळशिंगे रस्त्यावरील मशिदीजवळ सुरू असलेले देशी दारूचे दुकान तातडीने बंद करण्यासाठी मंगळवारी विट्यातील महिला आक्रमक  झाल्या. गेल्या दीड ते दोन महिन्यापासून त्रास सहन करणाºया रणरागिणींनी नगरपालिका व उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढून, दुकान बंद करण्याची मागणी केली. यावेळी पालिकेने संबंधित देशी दारूच्या दुकानाचे नाहरकत प्रमाणपत्र (एनओसी) रद्द करण्याचा ठराव मंगळवारी मासिक सभेत घेतला.
येथील यशवंतनगरमध्ये देशी दारूचे दुकान आहे. सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यमार्गालगतची सर्व दारू विक्री बंद झाली असून पाचशे मीटरच्या बाहेर असलेले, आळसंदचे हिंमतराव जाधव यांचे एकमेव देशी दारूचे दुकान सुरू आहे. त्यामुळे विट्यासह ग्रामीण भागातील तळीरामांची संख्या येथे वाढली आहे. परिणामी, महिला व विद्यार्थ्यांना याचा त्रास होत आहे.
संतप्त महिलांनी मंगळवारी दुपारी पालिका व उत्पादन शुल्कच्या कार्यालयावर धडक दिली. नगराध्यक्षा सौ. प्रतिभा पाटील, उपनगराध्यक्ष किरण तारळेकर, मुख्याधिकारी महेश रोकडे यांना महिलांनी निवेदन देऊन, संबंधित दुकानाचे नाहरकत प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणी केली. त्यावेळी मुख्याधिकारी रोकडे यांनी, दुकान बंद करण्याचा अंतिम निर्णय उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारात आहे. मात्र, नाहरकत प्रमाणपत्र रद्दबाबत सभेत ठराव घेऊन तो संबंधित विभागाकडे पाठविला जाईल, अशी ग्वाही दिली.
त्यानंतर महिलांनी उत्पादन शुल्क कार्यालयाकडे मोर्चा वळविला. दुय्यम निरीक्षक एस. एन. पाटील यांना घेराव घालून, किती दिवसात दुकान बंद करणार, असा जाब विचारला. त्यावेळी पाटील यांनी, दुकान बंद करण्याची मागणी वरिष्ठांना कळविण्यात येईल, असे सांगितले.
यावेळी शैला दिवटे, देवता आळंदे, मंगल लोटके, अनिता चोथे, कालिंदी कांबळे, शोभा चोथे यांच्यासह महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.
नाहरकत प्रमाणपत्र रद्द-
नगरपालिकेने दुपारी मासिक सर्वसाधारण सभेत या दारूच्या दुकानाचे नाहरकत प्रमाणपत्र रद्द करण्याचा ठराव एकमताने मंजूर केला. हा ठराव उत्पादन शुल्क विभागाकडे पाठविण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले.