शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

महिलांना हवे शनिचे विश्वस्तपद

By admin | Updated: December 11, 2015 02:30 IST

शनीच्या चौथऱ्यावर जाऊन एका तरुणीने पूजा केल्यावर सर्वत्र काहूर उठले होते. या घटनेनंतर लगेचच शनिदेवाला दुधाचा अभिषेक घालण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर आम्हाला शनिदेवाची सेवा करण्याची संधी मिळावी

सोनई (जि. अहमदनगर) : शनीच्या चौथऱ्यावर जाऊन एका तरुणीने पूजा केल्यावर सर्वत्र काहूर उठले होते. या घटनेनंतर लगेचच शनिदेवाला दुधाचा अभिषेक घालण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर आम्हाला शनिदेवाची सेवा करण्याची संधी मिळावी, अशी भूमिका घेत शिंगणापूरमधील अनेक महिलांनी विश्वस्तपदासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे हे धाडसी पाऊल ठरण्याची चिन्हे आहेत.शनिशिंगणापूरच्या देवस्थानचे विश्वस्त होता यावे, यासाठी पोलीस प्रशासनाकडून चारित्र्य पडताळणी करण्यासाठी इच्छुकांचे हेलपाटे सुरू झाले आहेत. उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला आदी अनेक कागदपत्रांसाठी हे इच्छुक धावाधाव करीत आहेत. शिंगणापूरला उच्चभ्रू घरातील अनेक महिला भाविक शनिदेवाच्या दर्शनासाठी येतात. यासाठी महिला विश्वस्त असावेत, असा विचारकरीत दरंदले, बानकर, शेटे, लांडेया घरातील महिलांनी विश्वस्तपदासाठी अर्ज भरण्याचा निर्णय घेतला आहे.देवस्थान परिसरात महिला सुरक्षा कर्मचारी आहेत, महिला पोलीस आहेत. मग महिला विश्वस्त का नाहीत, असा प्रश्न या महिलांनी उपस्थित केला आहे. धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या नियमावलीत विश्वस्तपदासाठी अर्ज भरणाऱ्या व्यक्ती असे म्हटले आहे. पुरुष अथवा महिला असे स्पष्टपणे म्हटलेले नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत या महिलांना विश्वस्तपद मिळेल का? हा खरा प्रश्न आहे. (प्रतिनिधी)>>> लोकशाही प्रक्रियेत सर्वांना समान अधिकार आहेत. त्यामुळे शिंगणापूर देवस्थानच्या विश्वस्तपदाच्या निवड प्रक्रियेत महिलाही अर्ज भरू शकतात, मुलाखती देऊ शकतात. त्यामुळे यात कोणाची काहीच हरकत नसावी. उलट महिला आल्या तर काही विश्वस्त जबाबदारीने वागतील. - उदयकुमार बल्लाळ, कार्यकारी अधिकारी, शिंगणापूर देवस्थान