शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

लालबागमध्ये महिला पोलीस अधिकाऱ्याला मारहाण

By admin | Updated: September 6, 2016 20:49 IST

लालबागचा राजा येथे बंदोबस्तासाठी असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्याला धक्काबुक्की करत मारहाण केल्याची धक्कादायक घटना सोमवारी घडली.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 6 - लालबागचा राजा येथे बंदोबस्तासाठी असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्याला धक्काबुक्की करत मारहाण केल्याची धक्कादायक घटना सोमवारी घडली. काळाचौकी पोलिसांनी याप्रकरणी सागर मंगशे रहाटे (३०) विरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.विक्रोळी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या सहायक पोलीस निरीक्षक रेखा खजुरे या लालबागचा राजा येथे कर्तव्य बजावत होत्या. दुपारी एकच्या सुमारास त्याठिकाणी पोहचलेल्या सागर मंगशे रहाटे (३०) याने लालबागच्या प्रवेशद्वारातून जबरदस्तीने प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यावेळी महिला पोलीस अधिकारी खजुरे यांनी रहाटेला आत घुसण्यास विरोध केला.

रहाटे याने लालबाग राजा मंडळाचा कार्यकर्ता असल्याचे सांगून महिला पोलिसाला दमदाटी करत धक्काबुक्की केली. या हल्ल्यात खजुरे जखमी झाल्या.महिला पोलीस अधिकारी खजुरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून काळाचौकी पोलिसांनी आरोपी रहाटे विरोधा भादंवी कलम ३५३, ३३२ आणि ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. रहाटे हा काळाचौकी परिसरातील गणेशनगर इमारतीमध्ये राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले.तो मंडळाचा कार्यकर्ता नाहीमहिला पोलिसासोबत हुज्जत घालणारा अधिकारी आमचा कार्यकर्ता नाही. तो तेथील रहिवासी आहे. त्याच्याकडे रहिवासी पास नव्हता. त्यामुळे त्यांच्यात वाद झाला, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष बी. कांबळे यांनी दिली.