शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात महिलांमध्ये सायको किलरची दहशत

By admin | Updated: February 4, 2017 13:36 IST

चाकूहल्ला करून महिला-मुलींमध्ये दहशत निर्माण करणा-या सायको किलरच्या तातडीने मुसक्या बांधा, अशी मागणी करीत संतप्त जमावाने सक्करदरा पोलीस ठाण्याला घेराव घातला.

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. 4 - चाकूहल्ला करून महिला-मुलींमध्ये दहशत निर्माण करणा-या सायको किलरच्या तातडीने मुसक्या बांधा, अशी मागणी करीत संतप्त जमावाने शुक्रवारी रात्री सक्करदरा पोलीस ठाण्याला घेराव घातला. या प्रकारामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.  
 
30 जानेवारीच्या रात्री  चंद्रकला ढेंगे यांच्यावर रेशीमबाग मैदानाजवळ आणि तासाभरानंतर हनुमाननगर त्रिकोणी पार्कजवळ शोभा ठाकूर या महिलेवर सायको किलरने चाकूने वार करून या दोन्ही महिलांना गंभीर जखमी केले होते. तत्पूर्वी त्याने  हुडकेश्वर, अजनी, सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहा महिला-मुलींवर हल्ला करून त्यांना जखमी केले.
 
गुरुवारी सकाळी सिद्धेश्वर शाळेजवळ आणि शुक्रवारी सायंकाळी सक्करद-यात पुन्हा दोन महिलांवर हल्ले केल्याची वार्ता पसरली. यामुळे परिसरातील महिला-पुरूष संतप्त झाले. त्यांनी शुक्रवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास सक्करदरा ठाण्यावर धडक दिली. जोरदार घोषणाबाजी करीत सायको किलरला तातडीने अटक करा, अशी मागणी केली. या प्रकारामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. माहिती कळताच अनेक वरिष्ठ पोलीस ठाण्यात पोहोचले.
 
त्यांनी सायकोला पकडण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू असून, काही ठिकाणी ट्रॅप लावण्यात आल्याचेही सांगितले. त्याला लवकरच पडण्यात येईल, असे आश्वासन देऊन जमावाला शांत केले.