शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

सर्वच पक्षांत महिलांना संधी

By admin | Updated: February 5, 2017 23:45 IST

जिल्ह्यातील ३४ गट व ६४ गण हे महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत जिल्ह्यात सर्वच राजकीय पक्षांनी महिलांना संधी देत महिला सबलीकरणाचा संदेश दिला आहे.

विलास बरी, जळगावजिल्ह्यातील ३४ गट व ६४ गण हे महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत जिल्ह्यात सर्वच राजकीय पक्षांनी महिलांना संधी देत महिला सबलीकरणाचा संदेश दिला आहे. भाजपाने सर्वाधिक ११७ महिलांना उमेदवारी दिली आहे. आरक्षणानुसार अमळनेर, भडगाव व जामनेर तालुक्यात महिलाराज राहणार आहे. तर काँग्रेस व भाजपाने काही गट व गणांमध्ये पुरुषांचे आरक्षण असलेल्या जागी महिलांना संधी दिली आहे.जिल्ह्यातील ६७ जि.प. गटांपैकी ३४ जागांवर महिलांचे आरक्षण आहे. तर १५ तालुक्यांतील १३४ पंचायत समिती गणांपैकी ६४ ठिकाणी महिलांसाठी आरक्षण जाहीर झाले आहे. मुक्ताईनगर तालुक्यात चारही गटांमध्ये पुरुषांचे आरक्षण असताना भाजपाने या ठिकाणी दोन महिलांना संधी दिली आहे. एरंडोल तालुक्यात दोन गटांत महिलांचे तर एका गटात सर्वसाधारण आरक्षण होते. मात्र या ठिकाणी भाजपाने महिला उमेदवाराला संधी दिली आहे. राष्ट्रवादीकडून ७४ तर काँग्रेसकडून ३९ महिलाभाजपासोबत राष्ट्रवादी व काँग्रेसने उमेदवारी देताना महिला पदाधिकाऱ्यांचा विचार केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्यातील १३० गट व गणांमध्ये उमेदवार उभे केले आहेत. त्यापैकी ७४ ठिकाणी महिला उमेदवारांना संधी दिली आहे. अमळनेर व जळगाव तालुक्यात राष्ट्रवादीने महिलांना सर्वाधिक प्रतिनिधित्व दिले आहे. काँग्रेसने जिल्ह्यात गट व गणांमध्ये ६६ उमेदवार उभे केले आहेत. त्यापैकी ३९ जागांवर काँग्रेसने महिलांना संधी दिली आहे. जळगाव, एरंडोल, मुक्ताईनगर, बोदवड व चाळीसगाव येथे काँग्रेसने सर्वाधिक महिला उमेदवार दिले आहेत.