शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

चोराचा पाठलाग करताना कल्याणमध्ये तरूणीचा मृत्यू

By admin | Updated: August 1, 2015 13:04 IST

लोकल प्रवासादरम्यान चोरट्याने पळवलेली बॅग परत मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या तरूणीचा लोकलची धडक बसून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली.

ऑनलाइन लोकमत
कल्याणा, दि. १ - लोकल प्रवासादरम्यान चोरट्याने पळवलेली बॅग परत मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या तरूणीचा लोकलची धडक बसून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली. प्राजक्ता गुप्ते असे त्या दुर्दैवी तरूणीचे नाव असून याप्रकरणी लोहमार्ग पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राजक्ता नवी मुंबईत एका आयटी कंपनीत काम करत होती. रोज कल्याण ते ठाणे व ठाणे ते नवी मुंबई असा प्रवास करणारी प्राजक्ता गुरूवारी रात्री कल्याणला परत येत असताना तिची गाडी काही काल पत्रीपुलाच्या अलीकडे थांबली. अंधाराचा फायदा घेत एका चोराने दरवाज्याजवळ उभी असलेल्या प्राजक्ताची पर्स हिसकावून पळ काढला. मात्र प्राजक्ताने घाबरून न जाता लोकलमधून उडी मारली आणि त्या चोराचा पाठलाग करण्यास सुरूवात केली. दुर्दैवाने मागून येणा-या लोकलची धडक प्राजक्ताला बसली व ती कोसळली. या घटनेत तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी रेल्वे लोहमार्ग पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी दाखल केला.
मात्र आपल्या मुलीचा मृत्यू लोकलच्या धडकेत झाला नसून कोणीतरी तिला लोकलमधून खाली फेकले असा आरोप प्राजक्ता वडिलांनी केली. तिच्या मृत्यूनंतर एक तरूण माझ्याकडे आला व प्राजक्ताला कोणीतरी खाली ढकलले असे त्याने सांगितले. दोन मुली त्या घटनेच्या साक्षीदार असून आपणही घटनेच्यावेळेस प्राजक्ताच्या मागच्याच डब्यात असल्याने आपणही तो प्रकार पाहिला, असा दावा त्या मुलाने केला, असे तिचे वडील म्हणाले. त्यामुळे या घटनेबद्दल संशय व्यक्त होत आहे. मात्र एकंदरच आजही रेल्वे प्रवास महिलांसाठी सुरक्षित नसल्याचे हे या घटनेवरून पुन्हा सिद्ध झाले आहे.