शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
6
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
7
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
8
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
9
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
10
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
11
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
12
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
13
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
14
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
15
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
16
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
17
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
18
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
19
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
20
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ

उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू

By admin | Updated: April 6, 2017 02:31 IST

उपचारासाठी रुग्णालयात दाखल असलेल्या महिलेच्या मृत्यूने संतप्त नातेवाइकांनी रुग्णालयाला घेराव घातला होता.

नवी मुंबई : उपचारासाठी रुग्णालयात दाखल असलेल्या महिलेच्या मृत्यूने संतप्त नातेवाइकांनी रुग्णालयाला घेराव घातला होता. यामुळे रुग्णालय परिसरात तणाव निर्माण झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले, तर सदर मृत महिलेवर झालेल्या उपचाराची तज्ज्ञांमार्फत चौकशी करून तिच्या नातेवाइकांनी केलेल्या आरोपांची चौकशी केली जाणार आहे.बुधवारी सकाळी नेरूळ सेक्टर ८ येथील नेरूळ रुग्णालयात हा प्रकार घडला. सेक्टर ६ येथे राहणाऱ्या छाया शिंदे (४२) यांना सोमवारी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना श्वसनाचा त्रास होत होता. उपचारादरम्यान बुधवारी सकाळी त्यांच्या प्रकृतीत सुधार जाणवत होता. त्यानंतर काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. यामुळे छाया शिंदे यांच्या मृत्यूला डॉक्टरांचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप नातेवाइकांनी केला. याप्रकरणी त्यांनी रुग्णालय व्यवस्थापनाला धारेवर धरत जमाव जमवला होता. तसेच मृतदेह ताब्यात न घेता तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यास देखील नकार दिला. याची माहिती मिळताच नेरूळ पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली, परंतु पोलिसांनी विनंती करूनही संध्याकाळपर्यंत नातेवाइकांनी मृतदेह अडवून धरला होता. अखेर संध्याकाळी नातेवाइकांनी मृतदेह शवविच्छेदनाला पाठवण्यास अनुमती दिली. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. नातेवाइकांच्या आरोपानुसार मयत छाया यांच्यावर झालेल्या उपचाराची तज्ज्ञांमार्फत चौकशी केली जाणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक नाईक यांनी सांगितले. परंतु रुग्णालयाचे डॉक्टर अजित अन्सारी यांनी छाया यांना हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याचे सांगितले. तसेच मयत महिलेच्या नातेवाइकांचे आरोपही फेटाळले आहेत. (प्रतिनिधी)