शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

महिला अत्याचार प्रतिबंध कक्षाला मिळाला वाली

By admin | Updated: July 4, 2017 05:49 IST

पूर्णवेळ प्रमुखाविना केवळ कागदावरच अस्तित्वात असलेल्या राज्य महिला अत्याचार प्रतिबंध कक्षाला आता एकदाचा पूर्णवेळ वाली मिळाला आहे.

जमीर काझी/ लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पूर्णवेळ प्रमुखाविना केवळ कागदावरच अस्तित्वात असलेल्या राज्य महिला अत्याचार प्रतिबंध कक्षाला आता एकदाचा पूर्णवेळ वाली मिळाला आहे. नागरी हक्क सुरक्षा विभागाच्या विशेष महानिरीक्षक आता त्याची धुरा कायमस्वरूपी सांभाळणार आहेत. त्यामुळे यासंबंधी प्रलंबित तक्रारींचा निपटारा व कार्यवाहीसाठी ‘मुहूर्त’ मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. महिला अत्याचाराच्या घटनांबाबत तत्परतेने कारवाई करणे, उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करणे आणि त्यासंबंधी राज्यातील विविध पोलीस घटकांशी समन्वय साधण्यासाठी थेट पोलीस महासंचालकांच्या नेतृत्वाखाली कार्यरत राहण्याची जबाबदारी या विभाग प्रमुखावर राहील. पीसीआरचे आयजी कैसर खलीद हे या कक्षाचे पहिले पूर्णवेळ प्रमुख बनले आहेत. राज्यात एकीकडे महिलांवरील गुन्ह्यांचा आलेख वाढत असताना सुमारे दीड वर्षापासून महिला अत्याचार प्रतिबंधक कक्षाला पूर्णवेळ अधिकारी मिळत नव्हता. त्यामुळे कक्षाच्या कामामध्ये सुसूत्रपणाचा अभाव होता. सुरुवातीला महिला अत्याचार प्रतिबंध कक्षाचे मुख्यालय हे पुण्यात होते. उपमहानिरीक्षक दर्जाचा अधिकारी त्याचा प्रमुख होता. मात्र गेल्या वर्षी जानेवारीत या विभागाचे कार्यालय पुण्यातून मुंबईत स्थलांतरीत झाले. त्याच्या प्रभारी पदाची श्रेणीवाढ करून विशेष महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे सोपविण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला. त्यानुसार सुरुवातीला हा विभाग सायबर गुन्हे विभागाशी जोडला. या विभागाचे प्रमुख ब्रिजेश सिंह होते. मात्र त्यांच्याकडे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालकपद तसेच राज्य सरकारचे प्रवक्तेपद आहे. महत्त्वाच्या पदाची जबाबदारी असल्यामुळे महिला अत्याचार प्रतिबंधक कक्षाला पूर्णवेळ देणे त्यांच्यासाठी अशक्य बनले होते. त्यामुळे हा विभाग सायबर गुन्हे विभागापासून विभक्त करण्याचा प्रस्ताव काही महिन्यांपूर्वी पोलीस महासंचालकांकडून गृह विभागाकडे पाठविण्यात आला होता. अशी असेल जबाबदारी महिलांवरील अत्याचारासंबंधी व्यक्तिगत व स्वयंसेवी संस्थांकडून आलेल्या तक्रारीचे निवारण करणे.उच्च न्यायालयाकडून यासंबंधीचे निर्देश व प्रतिज्ञापत्रे सादर करून योग्य कार्यवाही करणे राज्यभरातील विविध पोलीस आयुक्तालये व जिल्हा अधीक्षकांशी समन्वय ठेवत महासंचालकांच्या सूचनेनुसार कार्यवाही करणे