शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याअभावी ऊस गाळपाविना शेतातच

By admin | Updated: March 6, 2017 01:32 IST

मुरूम (ता. बारामती) येथील म्हसोबावस्ती हद्दीमधील सुमारे ४० एकर क्षेत्रातील ऊस रस्ताच नसल्याने गाळपाअभावी शेतातच उभा आहे.

सोमेश्वरनगर : मुरूम (ता. बारामती) येथील म्हसोबावस्ती हद्दीमधील सुमारे ४० एकर क्षेत्रातील ऊस रस्ताच नसल्याने गाळपाअभावी शेतातच उभा आहे. याबाबत रस्त्याचा वाद मिटविण्याबाबत ग्रामस्थ हतबल झाल्यामुळे अखेर हा वाद तहसीलदारांकडे गेला आहे.मात्र, याबाबत अजूनही ठोस निर्णय घेण्यात आला नाही. मुरूम (ता. बारामती) गावच्या अंतर्गत येणाऱ्या म्हसोबावस्ती या ठिकाणी सुमारे अडीचशे एकर क्षेत्र आहे. यातील जवळपास २५ शेतकऱ्यांचा ४० एकर ऊस आहे. मात्र, हा रस्ता अडविला गेल्याने ४० एकर क्षेत्रातील ऊस शेतातच वाळून चालला आहे. तर दुसरीकडे सोमेश्वर कारखाना अजून केवळ दोन दिवस सुरू असल्याने रस्त्याचा वाद लवकरात लवकर मिटणे आवश्यक आहे. कारखाना बंद झाल्यास या शेतकऱ्यांना माळेगाव कारखान्याला ऊस घातल्याशिवाय पर्याय नाही. या ४० एकर क्षेत्रातील १५ एकर ऊस जळाला आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सध्या उसाला चांगला दर असून ४० एकरातील जवळपास दीड हजार टन रस्त्याअभावी शेतातच उभा आहे. जर रस्त्याचा वाद मिटला नाही तर या २५ शेतकऱ्यांचे जवळपास ५० लाख रुपयांच्या आसपास नुकसान होणार आहे. गावातील सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष आणि ग्रामस्थांनी अडविलेल्या रस्त्याबाबत अनेक वेळा मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यामध्ये त्यांना अपयश आले. यानंतर याबाबत बारामतीचे तहसीलदार हनुमंत पाटील यांनी मध्यस्थी करावी, अशी विनंती करण्यात आली. त्यानंतर तहसीलदार हनुमंत पाटील हे घटनास्थळी भेट देऊन ज्यांनी रस्ता अडविला आहे. त्यांनर रस्ता मोकळा करून द्यावा, असे सांगून पिकाचे नुकसान होऊ देऊ नका अशी विनंती केली. मात्र कालही रस्ता वाहतुकीस खुला न झाल्याने आज या २५ शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय गाठले. (वार्ताहर)>हा रस्ता कुठे गायब होतो...सोमेश्वर कारखाना १९६५मध्ये स्थापन झाला. तेव्हापासून मुरूम गावातील म्हसोबावस्ती याठिकाणी अडीचशे एकर क्षेत्राचा रस्ता सुरू होता. कारखाना स्थापनेपासून याच रस्त्याने सोमेश्वर कारखान्याला ऊस घातला गेला आहे. मग आत्ताच अचानक हा रस्ता कुठे गायब होतो, असा सवाल मुरूम ग्रामस्थांनी केला आहे.