शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

डिसेंबरपर्यंत सात रेल्वे स्थानकांत वायफाय

By admin | Updated: October 25, 2016 04:31 IST

स्मार्ट फोनवर जलद आणि मोफत इंटरनेट सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी मध्य व पश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगरीय स्थानकांत वायफाय सुविधा सुरू करण्यात आली.

मुंबई : स्मार्ट फोनवर जलद आणि मोफत इंटरनेट सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी मध्य व पश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगरीय स्थानकांत वायफाय सुविधा सुरू करण्यात आली. ११ स्थानकांत वायफाय उपलब्ध करण्यात आल्यानंतर आता आणखी ७ रेल्वे स्थानकांत येत्या डिसेंबरपर्यंत सुविधा देण्यात येईल. गर्दीच्या रेल्वे स्थानकांवर वायफाय सुविधा देण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. यासाठी रेलटेल आणि गुगलमार्फत वायफाय सुविधा पुरवण्यात येत आहे. २0१८पर्यंत देशभरातील एकूण ४00 स्थानकांवर वायफाय सेवा देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सुरुवातीला २०१६पर्यंत १00 स्थानकांवर टप्प्याटप्प्याने वायफाय देण्यात येणार आहे. वायफाय सुविधेचा पहिला मान हा मुंबई सेंट्रल स्थानकाला मिळाला. या स्थानकात वायफाय सुविधा २0१६च्या जानेवारीत सुरू झाली. त्यानंतर आॅगस्ट महिन्यात आणखी १० स्थानकांवर सुविधा देण्यात आली. यामध्ये चर्चगेट, दादर, वांद्रे टर्मिनस, वांद्रे (लोकल), खार रोड आणि मध्य रेल्वेवरील एलटीटी, दादर, कल्याण, भायखळा, पनवेलचा समावेश आहे. (प्रतिनिधी)डिसेंबरपर्यंत वायफाय मिळणारी ७ स्थानकेपश्चिम रेल्वे - खार, अंधेरी, बोरीवली मध्य रेल्वे - ठाणे, कल्याण, कुर्ला, घाटकोपर उपनगरीय स्थानकांवर जानेवारी आणि त्यानंतर आॅगस्ट महिन्यात वायफाय सुरू झाल्यावर प्रत्येक आठवड्याला चार ते पाच लाख प्रवाशांकडून त्याचा लाभ घेण्यात येत आहे.