शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

नसरापूरकरांचे प्रश्न लावणार मार्गी

By admin | Updated: May 30, 2016 01:36 IST

भोर तालुक्यात महत्त्वाच्या असणाऱ्या नसरापूर बाजारपेठेतील विकासकामे, वाहतूक समस्या, पिण्याचे पाणी आदी प्रश्न लवकरच मार्गी लावले जातील

नसरापूर : भोर तालुक्यात महत्त्वाच्या असणाऱ्या नसरापूर बाजारपेठेतील विकासकामे, वाहतूक समस्या, पिण्याचे पाणी आदी प्रश्न लवकरच मार्गी लावले जातील, असे आश्वासन नसरापूर ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आले. मात्र, नसरापुरात अजूनही अनेक विभागांत नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत असल्याबाबत ‘लोकमत आपल्या दारी’ कार्यक्रमात नागरिक व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी विविध प्रश्नांवर चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला.नसरापूर गावाच्या विकासकामाला माझा कधीच विरोध नाही. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून चेलाडी - मढे घाट रस्ता संपादनाकरिता आततायीपणा करून घिसाडघाईचे धोरण अवलंबिले आहे. रस्ता संपादनाकरिता संबंधित बाधितांना विचारात न घेता दांडगाईने रस्त्याच्या दोन्ही बाजूला १५/१५ मीटर मार्किंग केले. मुळात या रस्त्याच्या दोन्ही बाजूस कशाच्या आधाराने मार्किंग केले अशी विचारणा भोर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका सहसचिव प्रकाश जंगम यांनी सार्वजनिक खात्याचे अभियंता एल. आर. ठाणगे यांना केली असता, त्यांनी या रस्त्याच्या कामाविषयी माहिती देण्याचा प्रयत्न केला, मात्र यातून तोडगा निघू शकला नाही, तरी ‘लोकमत आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या फलश्रुतीमुळे लवकरच या रस्त्यालगत असणाऱ्या नसरापूर येथील बाधितांची व सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांची बैठक घेतली जाणार असल्याचे या वेळी जाहीर करण्यात आले.या वेळी ग्रामपंचायत नसरापूरचे सरपंच डॉ. गणेश हिवरेकर, उपसरपंच सुमन घाटे, ग्रा.पं.सदस्य संदीप कदम, विक्रम कदम, माया शेटे, ग्रामविकास अधिकारी ए. डी. जगताप, डॉ. शाम दलाल, भोर तालुका कॉंग्रेसचे उपाध्यक्ष मुरलीधर दळवी, सामाजिक कार्यकर्ते यशवंत कदम, भोर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका सहसचिव प्रकाश जंगम, खरेदी विक्री संघाचे संचालक ज्ञानेश्वर झोरे, माजी सरपंच प्रकाश चाळेकर, नसरापूर मंडलाधिकारी रमेश सोनवणे, तलाठी सुधीर तेलंग, कृषी अधिकारी नाना डिंबळे, कृषी पर्यवेक्षक ए. के. जगताप, कृषी सहायक ए. ए. चव्हाण, वनपाल अनिल लांडगे, वैद्यकिय अधिकारी श्रुती साबणे, राजगड पोलीस ठाणे गोपनीयचे विशाल नगरे, पी.डी.सी.सी. बँकेचे शाखा व्यवस्थापक आशिष मारणे, उषा राशिनकर, ज्ञानोबा वाल्हेकर, रमेश कदम, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष गोपाळ ननावरे, शिवहर पंडित, शरद भुतकर, अग्निहोत्रचे दत्तात्रय वाल्हेकर, महावितरणचे विशाल गवळी, भालचंद्र गायकवाड, मनोज कुंभार, किरण भदे, दिलीप डेरे, विजय जंगम, प्रवीण शेटे, रामचंद्र शेटे, पोपट पालकर, नीलेश पवार, सुधीर शेडगे, आरोग्य सहायक प्रताप पाटील, गोट्या शेटे, विद्याधर राशिनकर, गणेश पानसरे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.(वार्ताहर)