शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीश नेमणार का?

By admin | Updated: February 11, 2016 03:42 IST

चिक्की घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती करणार का?, अशी विचारणा करत उच्च न्यायालयाने याबाबत मुख्यमंत्र्यांना विचार

मुंबई : चिक्की घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती करणार का?, अशी विचारणा करत उच्च न्यायालयाने याबाबत मुख्यमंत्र्यांना विचार करायला सांगितले आहे.सुमारे २०६ कोटींच्या चिक्की घोटाळा प्रकरणाची चौकशी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांनी करावी, अशी मागणी याचिकाकर्ते संदीप अहिर यांनी केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. व्ही. एम. कानडे व न्या. रेवती मोहिते -डेरे यांच्या खंडपीठापुढे होती. मंगळवारच्या सुनावणीवेळी याचिकाकर्त्यांचे वकील अनिल अंतुरकर यांनी या घोटाळ्याची चौकशी मुख्य सचिवांनी करू नये. त्यांच्यावर दबाव असू शकतो. ते नि:पक्षपातीपणे चौकशी करू शकत नाहीत, याचिकाकर्त्याच्या वकिलांनी असे खंडपीठाला सांगितले.त्यावर महाअधिवक्ता श्रीहरी अणे यांनी आक्षेप घेतला. ‘मुख्य सचिवांशिवाय अन्य कोणतीही व्यक्ती योग्य असू शकत नाही. सरकारी यंत्रणेची माहिती त्यांना जास्त आहे. राजकारणापासून प्रशासन दूर ठेवा. निवृत्त न्यायाधीशांद्वारे चौकशी करण्यात काहीही हरकत नाही. मात्र प्रत्येक नागरिक प्रशासनावर शंकाच घेईल आणि उठसूठ न्यायालयीन चौकशीची मागणी करेल. तसेच या घोटाळयाची चौकशी निवृत्त न्यायाधीशांना करण्यास सांगितले तर मुख्य सचिव पारदर्शकपणे काम करत नाहीत, असा गैरसमज नागरिकांचा होईल, असे अ‍ॅड. अणे यांनी म्हटले.आमचे असे म्हणणे नाही. तरीही मुख्यमंत्र्यांनी निवृत्त न्यायाधीशांद्वारे या घोटाळयाची चौकशी करावी की नाही, यावर विचार करावा’ असे खंडपीठाने म्हटले. त्यावर अ‍ॅड. अणे यांनी याबाबत आपण मुख्यमंत्र्यांकडून सूचना घेऊ,’ असे अ‍ॅड. अणे यांनी खंडपीठाला सांगितले. (प्रतिनिधी)