शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

माङया आईपासून अधिकारी काही बोध घेतील का ?

By admin | Updated: December 10, 2014 01:47 IST

माझी आई ग्रामसेविका होती, मग मुख्य सेविका झाली. तिच्या राज्यभरात अनेक ठिकाणी बदल्या झाल्या. त्या तिने निमूटपणो स्वीकारल्या.

बोध : निवृत्त आयएएस जोशींचा बदल्या टाळणा:यांना सवाल
यदु जोशी - नागपूर
माझी आई ग्रामसेविका होती, मग मुख्य सेविका झाली. तिच्या राज्यभरात अनेक ठिकाणी बदल्या झाल्या. त्या तिने निमूटपणो स्वीकारल्या. सगळीकडे सारखेच समजून काम केले. आजचे अधिकारी बदल्या टाळण्यावर भर देतात, याची खंत वाटते. आपल्या आईपासून कोणी याबाबत बोध घेईल का, असा आर्त सवाल माजी सनदी अधिकारी आणि राज्याचे माजी माहिती आयुक्त डॉ. सुरेश जोशी यांनी मंगळवारी केला. 
वर्षानुवर्षे मुंबई, ठाणो, पुण्यात ठाण मांडून बसलेल्या अधिका:यांच्या गडचिरोली, गोंदियासह विदर्भात आणि मराठवाडय़ात बदल्या करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवात केली असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने मंगळवारी दिल्यानंतर डॉ. जोशी यांनी ‘लोकमत’जवळ आपली भावना व्यक्त केली.
ते म्हणाले, माझी आई लीलाताई ग्रामसेविका झाली व नंतर 1959 मध्ये मुख्य सेविका. केंद्रीय समाज कल्याण बोर्डाच्या अध्यक्ष तेव्हा दिग्गज नेते आणि अर्थतज्ज्ञ सी. डी. देशमुख यांच्या पत्नी दुर्गाबाई देशमुख होत्या. माझी आई बदलीनिमित्त गावोगावी फिरली. चंद्रपूर, बुलडाणा, अमरावती, औरंगाबाद, नाशिक, उस्मानाबाद, परभणी, वर्धा आदी जिल्ह्यांमधील खेडी, आदिवासी गावे तिने अक्षरश: पालथी घातली आणि समाज कल्याण केंद्रांची स्थापना केली. पगार अर्थातच तुटपुंजा होता; पण ती कार्याने भारावलेली होती आणि त्यासाठी तिने कुटुंबाचे हितही बाजूला ठेवले, अशी आठवण डॉ. जोशी यांनी सांगितली. अधिका:यांनी बदलीच्या ठिकाणी गेलेच पाहिजे. शासकीय नोकरीत बदल्या हा अविभाज्य भाग आहे आणि त्यात कोणीही टाळाटाळ करू नये, असा सल्लाही डॉ. जोशी यांनी दिला. 
 
च्सुरेश जोशी यांच्या आईच्या शेवटच्या तीन बदल्या झाल्या तेव्हा स्वत: जोशी हे आयएएस अधिकारी होते. ते 197क्चे आयएएस अधिकारी. त्यांच्या आई 1979 मध्ये निवृत्त झाल्या. 
च्माझी आई लीलाताई ग्रामसेविका झाली व नंतर 1959 मध्ये मुख्य सेविका. केंद्रीय समाज कल्याण बोर्डाच्या अध्यक्ष तेव्हा दिग्गज नेते आणि अर्थतज्ज्ञ सी. डी. देशमुख यांच्या पत्नी दुर्गाबाई देशमुख होत्या. 
च्आपल्या आईची बदली त्यांना सहज रद्द करता आली असती. पण तो विचारही आपल्या मनात तेव्हा आला नाही आणि आईने एका शब्दाने मला बदली रद्द करायला सांगितले नाही, हे सांगताना जोशी यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.