शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

माझ्या आईपासून अधिकारी काही बोध घेतील का?

By admin | Updated: December 10, 2014 00:41 IST

माझी आई ग्रामसेविका होती, मग मुख्य सेविका झाली. तिच्या राज्यभरात अनेक ठिकाणी बदल्या झाल्या. त्या तिने निमूटपणे स्वीकारल्या. सगळीकडे सारखेच समरसून काम केले. आजचे अधिकारी बदल्या

निवृत्त आयएएस जोशींचा बदल्या टाळणाऱ्यांना सवालयदु जोशी - नागपूरमाझी आई ग्रामसेविका होती, मग मुख्य सेविका झाली. तिच्या राज्यभरात अनेक ठिकाणी बदल्या झाल्या. त्या तिने निमूटपणे स्वीकारल्या. सगळीकडे सारखेच समरसून काम केले. आजचे अधिकारी बदल्या टाळण्यावर भर देतात, याची खंत वाटते. आपल्या आईपासून कोणी याबाबत बोध घेईल का, असा आर्त सवाल माजी सनदी अधिकारी आणि राज्याचे माजी माहिती आयुक्त डॉ. सुरेश जोशी यांनी आज केला. वर्षानुवर्षे मुंबई, ठाणे, पुण्यात ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांच्या गडचिरोली, गोंदियासह विदर्भात आणि मराठवाड्यात बदल्या करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवात केली असल्याचे वृत्त लोकमतने आज दिल्यानंतर डॉ. जोशी यांनी लोकमतजवळ आपली भावना व्यक्त केली. ते म्हणाले, माझी आई लीलाताई ग्रामसेविका झाली व नंतर १९५९ मध्ये मुख्य सेविका. केंद्रीय समाज कल्याण बोर्डाच्या अध्यक्ष तेव्हा दिग्गज नेते आणि अर्थतज्ज्ञ सी.डी. देशमुख यांच्या पत्नी दुर्गाबाई देशमुख होत्या. माझी आई बदलीनिमित्त गावोगावी फिरली. चंद्रपूर, बुलडाणा, अमरावती, औरंगाबाद, नाशिक, उस्मानाबाद, परभणी, वर्धा आदी जिल्ह्यांमधील खेडी, आदिवासी गावे तिने अक्षरश: पालथी घातली आणि समाज कल्याण केंद्रांची स्थापना केली. पगार अर्थातच तुटपुंजा होता; पण ती कार्याने भारावलेली होती आणि त्यासाठी तिने कुटुंबाचे हितही बाजूला ठेवले, अशी आठवण डॉ. जोशी यांनी सांगितली.अधिकाऱ्यांनी बदलीच्या ठिकाणी गेलेच पाहिजे. शासकीय नोकरीत बदल्या हा अविभाज्य भाग आहे आणि त्यात कोणीही टाळाटाळ करू नये, असा सल्लाही डॉ. जोशी यांनी दिला. सुरेश जोशी यांच्या आईच्या शेवटच्या तीन बदल्या झाल्या तेव्हा स्वत: जोशी हे आयएएस अधिकारी होते. ते १९७० चे आयएएस अधिकारी. त्यांच्या आई १९७९ मध्ये निवृत्त झाल्या. आपल्या आईची बदली त्यांना सहज रद्द करता आली असती. पण तो विचारही आपल्या मनात तेव्हा आला नाही आणि आईने एक शब्दाने मला बदली रद्द करायला सांगितले नाही, हे सांगताना जोशी यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.