शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
3
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
4
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
5
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
6
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
7
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
8
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
9
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
10
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
11
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
12
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!
13
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
14
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
15
स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली 'ही' तीन ध्येय साध्य केली तर आपला पराभव होऊच शकणार नाही!
16
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
18
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
19
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले

शेतकऱ्यांबाबतचा दुजाभाव खपवून घेणार नाही!

By admin | Updated: August 31, 2015 01:29 IST

मूठभर असलेले स्टील उत्पादक अडचणीत आल्यानंतर त्यांचे कर कमी करण्यासाठी केंद्र सरकार लगेच तयार झाले, मात्र कोट्यवधींच्या संख्येने असलेल्या शेतकऱ्यांसाठीच्या मदतीसाठी पुढाकार

पुणे : मूठभर असलेले स्टील उत्पादक अडचणीत आल्यानंतर त्यांचे कर कमी करण्यासाठी केंद्र सरकार लगेच तयार झाले, मात्र कोट्यवधींच्या संख्येने असलेल्या शेतकऱ्यांसाठीच्या मदतीसाठी पुढाकार घेण्यास सरकार तयार नाही. महागाई कमी करण्याच्या नावाखाली शेतमालास कमी भाव देण्याचे प्रकार सरकारकडून सुरू आहेत. हा दुजाभाव खपवून घेतला जाणार नाही, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी येथे केले.महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघातर्फे आयोजित ५५ व्या अधिवेशनाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. पवार यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त द्राक्ष बागाईतदार संघातर्फे ज्येष्ठ साहित्यिक ना. धों. महानोर व माजी मंत्री विनायक पाटील यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.पवार म्हणाले, की महागाई कमी करण्यास आमचा विरोध नाही. शेतकऱ्यांना लागणारी खते, बी-बियाणे यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत़ त्याच्या किमती शासनाने अगोदर कमी कराव्यात. शेतकऱ्यांना स्वस्तात चांगली आरोग्यसेवा मिळावी, त्यांच्या मुलांना चांगले शिक्षण उपलब्ध व्हावे. शेतकऱ्यांच्या गरजेच्या वस्तूंच्या किमती कमी कराव्यात. शेती अर्थव्यवस्थेचा विचार करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांकडे पैसा आला तर बाजारातील मंदीचे वातावरण दूर होऊ शकेल. दीर्घ मुदतीची कर्जे कमी व्याजदराने उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. सध्या शेतीचा सगळ्यात मोठा प्रश्न पाणी हा आहे. जुलै, आॅगस्ट कोरडा गेला आता सगळी मदार सप्टेंबरवर आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शासनाने प्रत्येक तालुक्यामध्ये ५० हजार शेततळी उभारण्याचे काम हाती घेतले पाहिजे. कांद्याचे दर वाढले की लगेच त्याची मोठ्या प्रमाणावर चर्चा होते. मात्र सर्वसामान्य माणसाचा कांद्यावर होणारा दररोजचा खर्च अगदीच नगण्य आहे याचा विचार केला पाहिजे. शेतमालाला चांगली किंमत मिळणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांसाठी पवार यांचे योगदान मोठे असल्याचे गौरवोद्गार ना. धो. महानोर यांनी काढले. संघाचे अध्यक्ष अशोक गायकवाड यांनी प्रास्ताविक केले.